तुम्हीही मागच्या खिशात ठेवता का पाकिट ? होऊ शकता या सिंड्रोमचे शिकार
घरातून बाहेर पडताना बहुतांश पुरुष हे त्यांचे पैशांचे पाकिट जीन्स किंवा पॅन्टच्या मागच्या खिशात ठेवतात. पण पाकीट मागच्या खिशात ठेवण्याचे अनेक तोटे असू शकतात. यामुळे पुरुषांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते.
नवी दिल्ली – घरातून बाहेर पडताना आपण सर्वजण आपली पर्स किंवा पाकीट घेऊन बाहेर पडतो. बहुतांश पुरुष हे त्यांचे पैशांचे पाकिट जीन्स किंवा पॅन्टच्या मागच्या खिशात ठेवतात. पण तुम्हाला माहिती आहे का, की मागच्या खिशात पाकीट (wallet) ठेवल्याने तुम्हाला खूप नुकसान (side effects) सहन करावे लागू शकते. तसेच मागच्या खिशात पर्स ठेवल्याने पुरुषांच्या आरोग्याच्या अनेक समस्या (health problems) उद्भवू शकतात.
पुरुष सहसा त्यांच्या पाकिटामध्ये आवश्यक असलेल्या सर्व वस्तू ठेवतात. रोख रकमेपासून ते कार्ड आणि कागदांपर्यंतच्या बहुतांश गोष्टी पुरुषांच्या पाकिटात सहज दिसतात. त्यामुळे पुरुषांचे पाकिट खूप जाड होते. हे पाकिट मागच्या खिशात ठेवण्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. ते काय आहेत हे जाणून घेऊया.
वेदनांचा त्रास
मागच्या खिशात पाकीट ठेवल्याने पुरुषांच्या शरीरात वेदना होतात. तज्ज्ञांच्या मते, मागच्या खिशात जाड पाकिट ठेवल्यामुळे, बहुतेक पुरुषांना सुमारे तीन महिने पाठदुखी आणि पाय दुखण्याचा सामना करावा लागू शकतो.
नस कमकुवत होते
पँटच्या मागच्या खिशात जाड पाकिट ठेवल्याने पुरुषांच्या नसा लहान वयातच कमकुवत होऊ लागतात. विशेषत: पाठीच्या खालच्या भागात आणि स्लिप डिस्कच्या मज्जातंतूंना इजा होण्याचा धोका असतो. आणि बहुतेक पुरुष पर्स उजव्या खिशात ठेवतात. ज्यामुळे पुरुषांच्या उजव्या सायटिक व्हेनवर दाब येऊन मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो.
फॅट वॉलेट सिंड्रोम
ऑफिसमध्ये जास्त वेळ काम करत असतानाही पुरुष अनेकदा त्यांच्या मागच्या खिशात पाकीट ठेवतात. ज्यामुळे स्नायू दाबले जातात. त्याच वेळी, सायटिक मज्जातंतू देखील पिरिफॉर्मिस स्नायूंमधून जाताच. अशा स्थितीत पाकीटामुळे सायटिक व्हेनही दाबली जाते. त्यामुळे पुरुषांना आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकता
असा मिळवा आराम
मागच्या खिशात पाकिट ठेवल्यामुळे होणाऱ्या आरोग्याच्या सर्व समस्या टाळण्यासाठी तुम्ही काही सोप्या पद्धतींची मदत घेऊ शकता. बसल्यानंतर मागच्या खिशातून पाकिट काढून ठेवावे आणि पाठदुखीचा त्रास होण्यापासून रोखावे. तसेच पिरिफॉर्मिस स्नायूंचे स्ट्रेचिंग व्यायाम करून, तुम्हाला काही दिवसांत वेदनांपासून आराम मिळू शकतो.