हाता-पायाला येतो सारखा घाम ? हे असू शकते त्यामागचे कारण..

घाम येणे ही नैसर्गिक गोष्ट आहे, मात्र काही लोकांच्या हाता-पायाला सतत घाम येत असतो. काही हालचाल केल्याविनाही त्यांना घाम येतो. यामागचे कारण जाणून घेऊया.

हाता-पायाला येतो सारखा घाम ? हे असू शकते त्यामागचे कारण..
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 10:00 AM

नवी दिल्ली : उन्हाळ्यात व्यायाम करताना किंवा जास्त शारीरिक हालचाली करताना घाम येणे (sweat) अपरिहार्य असते. पण, काहीही न करता नुसतं बसूनही घाम येऊ लागला, तर सतर्क होण्याची गरज आहे. विशेषत: हातापायाच्या तळव्यांना सारखा घाम येत (sweat on palms) असेल तर विशेष लक्ष दिले पाहिजे. हे जगभरातील अनेक लोकांसोबत घडते. या समस्येला हायपरहायड्रोसिस (Hyperhidrosis)म्हणतात. लोक सहसा याबद्दल चिंतेत असतात. अशा वेळी अस्वस्थता, लाजिरवाणेपणा यासारख्या समस्या पीडित व्यक्तीमध्ये दिसून येतात.

सामान्यतः शरीर घामाद्वारे तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न करते, परंतु हायपरहायड्रोसिसने ग्रस्त लोकांना हिवाळ्यातही हाता-पायांनाही घाम येत असतो. हायपरहायड्रोसिस आजाराची कशामुळे होतो, त्याची कारणे कोणती व डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा हे जाणून घेऊया.

हे सुद्धा वाचा

हायपरहायड्रोसिसची लक्षणे

जर तुमच्या हाताच्या आणि पायाच्या तळव्यांना नेहमी घाम येत असेल आणि तुम्हाला याचे कोणतेही कारण समजत नसेल तर ते हायपरहायड्रोसिसचे लक्षण आहे. तुम्हाला कोणत्याही ऋतूमध्ये किंवा कोणतीही शारीरिक हालचाल न करताही घाम येत असेल, तर तुम्ही सतर्क राहण्याची गरज आहे. हायपरहायड्रोसिसची बहुतेक प्रकरणे तळवे, तळवे आणि अंडरआर्म्सशी संबंधित आहेत.

कधी रहावे अधिक सतर्क ?

जेव्हा सतत घाम येत असतो तेव्हा शरीरात इतर अनेक लक्षणे देखील दिसू लागतात, ज्यावरून त्याचे गांभीर्य दिसून येते. उदाहरणार्थ, जास्त घाम येत असेल, छातीत दुखत असेल आणि उलट्या होणे, अशा समस्या असतील तर अशा परिस्थितीमध्ये पूर्ण सतर्क राहून लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

घाम येण्यासाठी स्वेट ग्लँड्स असतात कारणीभूत

आता हे का घडते ते समजून घेऊ. शरीराचे तापमान नियंत्रित करणे, हे घामाचे कार्य आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, आपल्या शरीरातील स्वेट ग्लँड्स (Sweat Gland) म्हणजेच घामाच्या ग्रंथी या घाम सोडतात. शरीरातील एक नर्व्ह ही या ग्रंथीला घाम (सोडण्याचे) निर्देश देते. पण जेव्हा स्वेट ग्लँड अतिक्रियाशील असते तेव्हा जास्त घाम येऊ लागतो. या स्थितीला हायपरहायड्रोसिस असे म्हणतात. मात्र हायपरहायड्रोसिसचे नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नाही.

या व्यतिरिक्त, असे (सतत घाम येणे) होण्यामागे इतर अनेक कारणे असू शकतात. मधुमेह, लो ब्लड शुगर, विशिष्ट प्रकारचे कॅन्सर, हृदयविकाराचा झटका येणे, एखादा संसर्ग आणि थायरॉईडचा त्रास असेल तर त्यावेळीही सारखा घाम येण्याची समस्या उद्भवू शकते. बऱ्याच प्रकरणांमध्ये हा रोग अनुवांशिकपणे पिढ्यानपिढ्या (चालत) आलेला दिसून येतो.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.