शारीरिक संबंधानंतर लघवी करणे का जरूरी ? न केल्यास असतो हा धोका
बरेचसे लोक हे शारीरिक संबंधानंतर झोपून जातात, ते बाथरूमला जात नाही. मात्र याचा आरोग्यावर परिणाम होऊन अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो.
नवी दिल्ली : आपलं खाण-पिणं कसं आहे, यावर आपलं आरोग्य (health) अवलंबून असतंच पण त्याचप्रमाणे आपली जीवनशैली, जगण्याच्या सवयी यावरही अनेक गोष्टी असतात. वैयक्तिक स्वच्छता(cleanliness), चांगल्या सवयी यांचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो. पण प्रकरण उलटं असेल तर त्याचा परिणामही तसाच होणार ना. अशीच एक सवय आहे ती खासगी भागातील स्वच्छतेची. अनेकांना या विषयावर बोलायला आवडत नाही. पण आपल्या शरीराच्या इतर भागांप्रमाणेच आपले खासगी भागही (private parts) महत्वाचे असतात.
प्रायव्हेट पार्ट्सची तेवढीच स्वच्छता ठेवणे, नीट काळजी घेणे महत्वाचे असते. काही लोकांना शारीरिक संबंधांनंतर लघवीला न जाण्याची सवय असते. ते तसेच झोपून जातात. मात्र हे अयोग्य आणि तेवढेच धोकादायक आहे. जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवताना अनेक गोष्टींची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. जर त्यावेळी तुम्ही काही गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. शारीरिक संबंध ठेवणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. शारीरिक संबंधांनंतर अथवा समागमानंतर लघवी न केल्याने संसर्ग होण्याचा धोका असतो. हे विशेषतः स्त्रियांना लागू होते. त्यांना बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका जास्त असतो.
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, महिलांचा मूत्रमार्ग लहान असल्याने जिवाणू सहजपणे मूत्राशयात जाऊ शकतात. त्यामुळे नीट स्वच्छता न बाळगल्यास स्त्रियांना मूत्रमार्गाचा संसर्ग होऊन त्रास होऊ शकतो.
यूटीआयचा असतो धोका
समागमानंतर नीट साफसफाई न केल्यामुळे आणि लघवी न केल्यामुळे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजेच UTI होण्याचा धोका असतो. अनेक महिलांना समागमानंतर युरिन इन्फेक्शनच्या समस्येला सामोरे जावे लागते. कारण संभोग करताना बॅक्टेरिया त्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्रवेश करतात आणि यामुळे बॅक्टेरिया वाढतात. म्हणूनच महिलांनी समागमानंतर लगेचच लघवी करणे महत्वाचे ठरते.
काय करावे ?
जर तुम्हाला शारीरिक संबंधांपूर्वी करण्यापूर्वी लघवी करण्याची इच्छा होत असेल, तरीही तुम्ही ते टाळत असाल तर हे देखील योग्य नाही. समागमानंतर लघवी करणे अधिक महत्वाचे होते. लघवी केल्यानंतर पूर्णपणे स्वच्छता करावी आणि नंतरच झोपावे. अन्यथा मूत्रमार्गाचा संसर्ग होऊ शकतो. आणि हे स्त्री व पुरुष दोघांनाही लागू होते.
पुरूषांना धोका अत्यंत कमी
समागमानंतर पुरूषांना लघवी करण्याची काही विशेष गरज नाहीये. त्यांना बॅक्टेरियाचा धोका खूप कमी प्रमाणात असतो. यामुळे पुरूषांपेक्षा महिलांना याबाबत अधिक काळजी घेण्याची गरज आहे. मात्र स्वच्छतेच्या कारणास्तव त्यांनी प्रायव्हेट पार्ट्सची स्वच्छता करणे फायदेशीर ठरते.