बहुतांश महिलांना यामुळे होतो गुडघेदुखीचा त्रास, तुम्हाला माहीत आहेत का ‘ही’ कारणं ?

बऱ्याच वेळेस लोकं या वेदनांकडे दुर्लक्ष करतात, पण त्यामुळे भविष्यातील हा त्रास आणि वेदना आणखीनच वाढू शकतात.

बहुतांश महिलांना यामुळे होतो गुडघेदुखीचा त्रास, तुम्हाला माहीत आहेत का 'ही' कारणं ?
Follow us
| Updated on: Mar 22, 2023 | 11:25 AM

नवी दिल्ली : आजकाल बहुतांश महिला या गुडघेदुखीच्या समस्येने त्रस्त असलेल्या दिसतात. आधुनिक जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी हे यासाठी कारणीभूत ठरू शकते. स्नायूंचा ताठरपणा आणि सांध्यांमध्ये वेदना यामुळे काही लोकांना रात्रभर त्रास होताना दिसतो. मात्र बरेचजण त्याकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे भविष्यात ही समस्या आणि वेदना आणखीनच वाढू शकतात. तुम्हालाही गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर सर्वप्रथम त्यामागचे कारण आणि बचावाचे उपाय जाणून घ्या.

या कारणांमुळे पुरुषांपेक्षा महिलांना जास्त होतो गुडघेदुखीचा त्रास

– महिलांची शरीराची संरचना काही अशी असते ज्यामुळे त्यांच्या सांध्यांची हालचाल अधिक होते व त्यांचे लिगामेंट्सही अधिक लवचिक असतात. ज्यामुळे त्यांची गुडघ्यांची मूव्हमेंटही अधिक होते. व त्यामुळे वेदनाही आणखीन वाढू शकतात.

हे सुद्धा वाचा

– गुडघे हेल्दी रहावेत यासाठी एस्ट्रोजन हे फीमेल हार्मोन महत्वपूर्ण भूमिका निभावते. पण मासिक पाळी दरम्यान आणि मेनोपॉज नंतर एस्ट्रोजन हार्मोनची पातळी कमी होते. एस्ट्रोजनचा स्तर कमी झाल्यामुळे सांध्यांना सपोर्ट करणाऱ्या कार्टिलेजवरही परिणाम होतो.

– जास्त वजन असणे – पुरुषांच्या तुलनेत महिला लठ्ठपणाची जास्त शिकार होतात, त्यामुळे दाब पडून गुडघे खराब होतात. वजन वाढल्याने गुडघ्यांवर जास्त दाब पडतो, तुमचं वजन जितकं जास्त त्यापेक्षा पाचपट अधिक दाब पडतो. म्हणजेच जर तुमचे वजन नॉर्मल रेंजपेक्षा पाच किलो जास्त असेल तर तुमच्या गुडघ्यांवर 25 किलो अधिर दबाव पडतो.

– वेदनांकडे सतत दुर्लक्ष तेल्यानेही गुडघ्यांचा त्रास वाढू शकतो. गुडघे सतत दुखत असतील, सूज येत असेल किंवा ते वाकवण्यास त्रास होत असेल तर त्याकडे बिलकूल दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांना दाखवून वेळीच उपचार करून घ्या.

– गुडघ्याला काही लागले असेल , जखम झाली असेल तर त्यावर तत्काळ उपचार करावेत. वेळीच उपचार झाले नाहीत तर भविष्यात वेदना वाढण्याचा धोका असतो. गुडघ्याच्या लिगामेंट्स खेचल्या गेल्या किंवा तुटल्या तर त्यामुळेही गुडघे खराब होऊ शकतात.

– गरजेपक्षा जास्त व्यायाम करणे हेही गुडघ्यांसाठी हानिकारक ठरू शकते. जास्त व्यायाम आणि धावणे यामुळे नी-कॅप व टेंडन यावर अत्याधिक दाब पडतो, ज्यामुळे ते डॅमेज होण्याची शक्यता वाढते.

गुडघ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी करा हे उपाय

संतुलित वजन ठेवा

शरीराच्या जास्त वजनामुळे गुडघ्यांवर अतिरिक्त दाब पडू शकतो. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे महत्वाचे ठरते.

लो इम्पॅक्ट व्यायाम करा

गुडघ्यांच्या कार्टिलेजचे रक्षण करण्यासाठी पोहणे आणि सायकल चालवणे यासारखा व्यायाम फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या दुखापतीपासूनही रक्षण होते.

अति-उत्साह चांगला नाही

जुंबा, फंक्शनल वर्कआऊट, सूर्यनमस्कार , योगासने करताना सावध रहा. अति उत्साहामुळे दुखापत होऊ शकते.

डॉक्टरांचा सल्ला घ्या

गुडघ्यात वेदना, सूज येणे असा त्रास जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. गुडघ्याच्या वेदनांकडे दुर्लक्ष केल्यास समस्या आणखी वाढू शकते.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.