ऑक्सिमीटरला भन्नाट पर्याय, आता मोबाईल अॅपवर तपासा शरीरातील ऑक्सिजन पातळी!

कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. CarePlix Vital App option For Oximeters

ऑक्सिमीटरला भन्नाट पर्याय, आता मोबाईल अॅपवर तपासा शरीरातील ऑक्सिजन पातळी!
CarePlix Vitals
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 11:44 AM

नवी दिल्ली: कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. या काळामध्ये नागरिकांनी ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऑक्सिमीटर खरेदी करण्यास सुरुवात केली. अचानक मागणी वाढल्यामुळे उत्पादकांकडून किमती देखील वाढविण्यात आल्या. एका ऑक्सिमीटरची किंमत तब्बल 2 हजार रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली. ऑक्सिमीटरची मागणी कमी करण्यासाठी पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील आरोग्यविषयक स्टार्टअपने पुढाकार घेत त्यांनी केअरप्लिक्स वायटल ( CarePlix Vital App ) या नावाचं ॲप तयार केलं. या ॲपद्वारे तुमच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी, पल्स रेट आणि रेस्पिरेशन रेट तपासले जाऊ शकतात. (Kolkata based Startup launch CarePlix Vital App option For Oximeters will monitor blood oxygen pulse rate)

ॲप कसं काम करतं?

बीजीआरने दिलेल्या रिपोर्ट नुसार हे ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फोनच्या रिअर कॅमेरावर आणि फ्लॅश लाईटवर बोट ठेवावी लागतात 40 सेकंद बोट ठेवल्यानंतर रक्तामधील ऑक्सिजन पातळी, पल्स आणि रेस्पिरेशन रेटची माहिती मिळते. गेल्या काही दिवसांमध्ये लोकांनी पल्स आणि ऑक्सिमीटर आणि स्मार्टवॉच याचा वापर ऑक्सिजनची पातळी तपासण्यासाठी केला होता. यामुळे आम्ही ॲपची निर्मिती फोटोफ्लॅटइस्मोग्राफी म्हणजेच पीपीजी ग्राफ या तंत्रज्ञानावर केल्याची माहिती शुभ्रता पॉल यांनी इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या माहितीमध्ये सांगितलं. शुभ्रता यान केअरनाऊ हेल्थकेअरच्या सहसंस्थापक आहेत.

आम्ही स्मार्टफोनचा रियर कॅमेरा आणि फ्लॅशलाईट चा वापर करून ऑक्सिजन पातळी तपासण्याचं काम करतो. यामध्ये ॲपचा वापर करत असताना व्यक्तीला किमान 40 सेकंद त्याची बोट फ्लॅश लाइट आणि कॅमेरावर ठेवावी लागतात. प्रकाशाच्या सहाय्यानं आणि पीपीजी ग्राफच्या मदतीने ऑक्सिजन पातळी, पल्स रेटची माहिती गोळा केली जाते असे, देखील त्यांनी सांगितले.

केअरप्लिक्स वाटयटल वापरण्यासाठी काय करावे?

हे अ‌ॅपर वापरण्यासाठी नोंदणी करावी लागते.केअरप्लिक्स वायटल आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या तत्त्वावर काम करते. यामध्ये कॅमेरा आणि फ्लॅश लाईट वरती बोटं ठेवावी लागतात. व्यवस्थितपणे बोट ठेवल्यास याची अचूक माहिती आपल्याला उपलब्ध होते. अवघ्या 40 सेकंदांमध्ये तुम्हाला शरीरातील ऑक्सिजनची पातळी स्क्रीनवर दिसेल. ही माहिती तुम्ही इंटरनेटच्या मदतीने क्लाऊडवरही सेव्ह करु शकता.

अ‌ॅपची संकल्पना कशी सूचली

भारतात मोठ्याप्रमाणावर हृदय आणि धमन्यांमध्ये होणाऱ्या बिघाडामुळे हजारो लोकांचा मृत्यू होता. याच गोष्टीमुळे आम्हाला या मोबाईल अॅपची संकल्पना सुचली. कोलकातामधील सेठ सुखलाल कर्नानी मेमोरियल रुगणालयात 1200 रुग्णांवर यशस्वी ट्रायल केल्यानंतर हे अॅप लाँच करण्यात आल्याची माहिती केअरप्लिक्स व्हायटलचे संस्थापक मोनोसीज सेनगुप्ता यांनी दिली.

या मोबाईल अॅपची चाचणी मुख्यत: ओपीडी सेक्शनमधील रुग्णांवर करण्यात आली. त्यानंतर ऑक्सिजन तपासण्याच्या पारंपरिक चाचण्यांमधील निष्कर्षांशी ट्रायलमधील निकाल पडताळण्यात आले. यामध्ये केअरप्लिक्स व्हायटल अॅप हृदयाच्या ठोक्यांची 96 टक्के तर रक्तातील ऑक्सिजन पातळीची 98 टक्के अचूक माहिती देत असल्याचे दिसून आल्याचेही पॉल यांच्याकडून सांगण्यात आले.

संबंधित बातम्या:

कोव्हिड लसीकरणातील Co- win ॲप आजपासून पुन्हा अ‌ॅक्टिव्ह, शुभारंभावेळीच अ‌ॅप झालं होतं डाऊन

तुम्ही मोबाईल अ‍ॅपमधून कर्ज घेतलंय? तुमचा छळ होतोय? सावध करणारी ही बातमी तुमच्यासाठी

(Kolkata based Startup launch CarePlix Vital App option For Oximeters will monitor blood oxygen pulse rate)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.