पालक बनण्याच्या स्वप्नात तुमची ‘हीच’ सवय ठरेल अडथळा, जागरणामुळे होऊ शकतो Fertility वर परिणाम

रात्रीची झोप नीट पूर्ण झाली नाही तर त्याचा फर्टिलिटी अर्थात प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, असे एका अभ्यासात आढळले आहे. महिला व पुरूष या दोघांमध्येही ही समस्या दिसून आली आहे.

पालक बनण्याच्या स्वप्नात तुमची 'हीच' सवय ठरेल अडथळा,  जागरणामुळे होऊ शकतो Fertility वर परिणाम
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 4:16 PM

नवी दिल्ली : निरोगी आयुष्यासाठी सकस आहार आणि व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय आरोग्य तज्ञही आरोग्यासाठी चांगली झोप घेण्याचा सल्ला देतात. झोप आपल्या आरोग्यासाठी (Health)पौष्टिक आहार आणि व्यायामाइतकीच महत्त्वाची आहे. झोपेच्या कमतरतेमुळे अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात. स्ट्रेस-डिप्रेशनसारखा (stress or depression) त्रासही होऊ शकतो. त्यामुळे रक्तदाब, हृदयविकाराचा धोकाही वाढू शकतो. यामुळेच प्रत्येकाला 6 ते 8 तास पुरेशी झोप घेण्याचा सल्ला दिला जातो. झोपेच्या कमतरतेमुळे प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम (sleep affects fertility) होण्यासह अनेक समस्या उद्भवतात.

झोपेच्या कमतरतेचा प्रजनन क्षमतेवर परिणाम

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या मते, जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही तर त्याचा तुमच्या प्रजननासंबंधित हार्मोन्सवर (reproductive hormones) परिणाम होऊ शकतो. मेंदूचा जो भाग ‘स्लीप वेक हार्मोन’ नियंत्रित करतो. त्या भागाचा झोपेच्या कमतरतेमुळे स्त्रियांमध्ये ओव्हुलेशन आणि पुरुषांमधील शुक्राणूंवर (sperms) याचा नकारात्मक परिणाम होतो. अभ्यासानुसार, जर महिलांनी दीर्घकाळ झोप पूर्ण केली नाही तर इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, प्रोलॅक्टिन आणि ल्युटेनिझिंग यांसारख्या प्रजनन हार्मोन्सवर थेट परिणाम होतो आणि यामुळे वंध्यत्वाची समस्या उद्भवू शकते.

हे सुद्धा वाचा

तज्ज्ञ काय सांगतात ?

शास्त्रज्ञांच्या सांगण्यानुसार, पुरुषांमध्ये निरोगी शुक्राणूंच्या निर्मितीमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन सर्वात महत्वाची भूमिका बजावते. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा हा हार्मोन फक्त झोपेच्या वेळी बाहेर पडतो. बोस्टन युनिव्हर्सिटीच्या रिसर्च टीम आणि एपिडेमियोलॉजीच्या प्रोफेसर लॉरेन वाईज यांच्या मते, अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की पुरेशी झोप घेतलेल्या लोकांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी पुनरुत्पादनासाठी योग्य राहते. त्याच वेळी, कमी झोपेमुळे प्रजनन समस्यांचा धोका जास्त असतो.

रिसर्चमध्ये काय नमूद करण्यात आले आहे ?

बोस्टन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थने एका अभ्यासासाठी 790 जोडप्यांवर संशोधन केले. अनेक स्तरांवर संशोधन केल्यानंतर असे आढळून आले की, जे लोक दररोज 6 तास झोप घेतात, त्यांना गर्भधारणेशी संबंधित समस्यांचा धोका जास्त असतो. जे पुरुष खूप कमी किंवा जास्त वेळ झोपतात त्यांना 42% जास्त प्रजनन समस्या असल्याचे आढळून आले आहे.

पुरेशी झोप घेण्यासाठी काय करावे ?

– आरोग्य तज्ञांच्या मते, तुमची दैनंदिन दिनचर्या अशा प्रकारे बनवा की तुम्हाला पुरेशी झोप मिळेल.

– रोज व्यायाम अथवा वर्कआउट करा.

– झोपण्याची आणि उठण्याची एक ठराविक वेळ निश्चित करा आणि दररोज त्याचे अनुसरण करा.

– बेडरूममध्ये शांतता आणि मंद प्रकाश ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला चांगली झोप लागेल.

– मद्यपान करण्यापासून लांब रहा. दारूचा झोपेवर आणि आरोग्यावरही परिणाम होतो.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.