Health : जनरिक आधारच्या उपक्रमांतर्गत 51 नवीन औषधे लाँच, किफायतशीर दरात मिळणार औषधी

सध्या भारत जनरिक औषधांचा पुरवठा करणार्‍या आघाडीच्या देशांपैकी एक आहे. या कंपनीने देशभरात 1500 मायक्रो उद्यमी तसेच 8000 प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगाराच्या शक्यता निर्माण केल्या आहेत. याविषयी अधिक जाणून घ्या...

Health : जनरिक आधारच्या उपक्रमांतर्गत 51 नवीन औषधे लाँच, किफायतशीर दरात मिळणार औषधी
जनरिक आधारच्या उपक्रमांतर्गत 51 नवीन औषधे लाँच.Image Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 6:09 AM

मुंबई : भारतात (India) हेल्थकेअर (Health) परवडण्याजोगे करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत, जनरिक (Generic) आधारचा संस्थापक आणि CEO असलेल्या 20 वर्षीय अर्जुन देशपांडेने आज उपभोक्त्यांसाठी 51 नवीन औषधे लाँच केल्याचे जाहीर केले. ही औषधे आता लोकांना 80 टक्के कमी भावात उपलब्ध होतील. या प्रसंगी स्वातंत्र्य दिन आणि हेल्थकेअरमधील क्रांती साजरी करण्यासाठी उपस्थित होते, आंतरराष्ट्रीय पहिलवान द ग्रेट खली आणि बॉलीवूडमधला लोकप्रिय खलनायक गुलशन ग्रोव्हर. जनरिक आधार या भारतातील आघाडीच्या फार्मास्युटिकल स्टार्टअपने जुन्या फार्मास्युटिकल जगतात एक नवी ईकोसिस्टम आणली आहे. अर्जुन देशपांडे याने अवघ्या 16 व्या वर्षी सुरू केलेल्या जनरिक आधार या कंपनीने थेट उत्पादकांशी भागीदारी करून आपल्या फ्रँचाईज स्टोर्सच्या माध्यमातून ग्राहकांना किफायतशीर दरात चांगल्या गुणवत्तेची औषधे प्रदान करून फार्मा उद्योगात क्रांती घडवून आणली आहे.

लोक महामारी आणि वाढत्या महागाईच्या दुहेरी मार्‍याला तोंड देत आहेत, अशा काळात जनरिक आधार औषधांवरील अनावश्यक प्रचार खर्च टाळून, इतर ब्रॅंडेड औषधांपेक्षा 80 टक्के कमी भावात थेट एंड यूझर्सना दर्जेदार जनरिक औषधे पुरवीत आहे. उदाहरणार्थ, फ्लूकोनझोल 150एमजी हे औषध एरवी 13 रुपयाला मिळते, त्याची जनरिक आधार किंमत फक्त 4.53 रु. आहे. तसेच, नॉर्ट्रिप्टीलाइन 10एमजी + मेथिलकोबालमाईन 1500एमजी + प्रेगाबलिन 75एमजी जे सुमारे 195 रुपयात मिळते, ते जनरिक आधार अंतर्गत केवळ 38.85 (80% सवलतीच्या दरात) रुपयात मिळते.

याचे फार्मसी-अ‍ॅग्रीगेटर फ्रँचाइझ मॉडेल उपभोक्त्यांना जनरिक आधार अ‍ॅपमार्फत औषधे मागवण्यास सक्षम करते आणि त्यांना अवघ्या 2 तासांत ती औषधे पोहोचवली जातात. ग्राहक थेट दुकानात देखील जाऊ शकतात. फेब्रुवारी 2019 मध्ये लॉन्च झाल्यापासून जनरिक आधारने देशातील 150 पेक्षा जास्त शहरांत 1500 फार्मसीजशी हातमिळवणी केली आहे.

जनरिक आधारचा संस्थापक आणि CEO अर्जुन देशपांडे म्हणतो, “टियर II आणि टियर III शहरांवर विशेष फोकस ठेवून जनसामान्यांपर्यंत कमीत कमी किंमतीत औषधे पोहोचविण्यासाठी जनरिक आधार वचनबद्ध आहे. हे व्हिजन ठेवून वाटचाल करत आम्ही जनरिक आधार मंचावर नवीन 51 औषधे लॉन्च केली आहेत. यामध्ये पित्ताशयातील स्टोन, न्यूरोपॅथिक वेदना, सामान्य सर्दी-खोकला, अ‍ॅलर्जी, फंगल इन्फेक्शन आणि यांसारख्या सामान्य आजारांवरील औषधे समाविष्ट आहेत. आम्ही देशातील 130 कोटी जनतेसाठी उच्च गुणवत्तेची औषधे उपलब्ध करून देत आहोत. यासाठी उद्योजकतेची मागणी निकडीची आहे आणि अनेक भावी यशोगाथांमध्ये आमचे योगदान असल्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो.”

सध्या भारत जनरिक औषधांचा पुरवठा करणार्‍या आघाडीच्या देशांपैकी एक आहे आणि जागतिक फार्मास्युटिकल बाजारपेठेत भारताचे योगदान 20% आहे. आपल्या फ्रँचाइझ मॉडेलमार्फत जनरिक आधार रोजगार निर्मितीबरोबरच अनेक मायक्रो उद्यमी देखील तयार करत आहे. या कंपनीने देशभरात 1500+ मायक्रो उद्यमी तसेच 8000+ प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष रोजगाराच्या शक्यता निर्माण केल्या आहेत.

(हेडलाईन व्यतिरीक्त सदर वृत्तातील मजकूर tv9marathi ने संपादीत केलेला नसून उपरोक्त माहिती ही सिंडीकेटेड फीडमधून प्रकाशित करण्यात आली आहे.)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.