Health : बद्धकोष्ठतेची प्रमुख लक्षणे आणि उपाय जाणून घ्या

Health : शौच करताना आतड्यांवर ताण येणे, शौचास जाऊन आल्यानंतरही पोट पूर्णपणे रिकामे न वाटणे आणि आठवड्यातून तीनपेक्षा कमी मलविसर्जन करणे यांचा समावेश आहे. मात्र बद्धकोष्ठतेबाबत अनेक गैरसमज पसरत आहेत ते दूर करुन यामागचे नेमके कारण जाणून घेणे गरजेचे आहे.

Health : बद्धकोष्ठतेची प्रमुख लक्षणे आणि उपाय जाणून घ्या
Constipation1
Follow us
| Updated on: Dec 18, 2023 | 10:25 PM

मुंबई : बद्धकोष्ठता ही आपल्या पचनक्रियेशी निगडित एक समस्या आहे, ज्यामुळे हा त्रास असलेल्या व्यक्तीला सकाळी मलविसर्जनामध्ये समस्या येते. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला जीवनात कधी ना कधी याचा अनुभव येतो. बहुतांश घटनांमध्ये, मोठ्या आतड्यात येणाऱ्या अन्नातील पाणी जास्त शोषल्यामुळे ही समस्या उद्भवते. आपल्या आतड्यांमधून (Colon) जेवढे हळू अन्न पुढे जाते, तेवढेच जास्त पाणी आपले मोठे आतडे अन्नातून शोषून घेतात. यामुळे आपले मल कोरडे आणि कडक होते. याबाबत पोटविकार तज्ज्ञ डॉ. दीपक अहिरे यांनी सांगितलं आहे.

जेव्हा असे होते, तेव्हा शौचाच्या वेळी आपल्याला खूप त्रास सहन करावा लागतो. दर आठवड्याला तीनपेक्षा कमी वेळा शौचास जाणे हे बद्धकोष्ठतेचे प्रमुख लक्षण आहे आणि आतड्यांच्या हालचालींची कमी वारंवारता अधिक गंभीर बद्धकोष्ठता दर्शवते. बध्दकोष्ठकेच्या धोक्याच्या चिन्हांमध्ये कोरडे मल, मल विसर्जनास त्रास होणे.

बद्धकोष्ठतेची समस्या ही केवळ वृध्दांमध्येच दिसून येते असा मोठा गैरसमज आहे. वास्तविक पाहता बद्धकोष्ठतेची समस्या ही सर्वच वयोगटातील व्यक्तींमध्ये दिसून येते. बद्धकोष्ठता ही कायस्वरुपीची समस्या आहे हा देखील गैरसमज अनेकांमध्ये दिसून येतो. मात्र योग्य जीवनशैली बाळगणे, संतुलित आहार आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने ओषधांचे सेवन केल्यास बध्दकोष्ठतेची समस्या टाळता येते.

आहारातील फायबरचे सेवन वाढवल्याने अनेक व्यक्तींच्या बाबतीत बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते हा देखील एक गैरसमज आहे. केवळ फायबरचे सेवन वाढविल्याने काही व्यक्तींमध्ये बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊ शकतो. प्रत्येकासाठी हा दृष्टीकोन प्रभावी ठरु शकत नाही आणि संभाव्यतः समस्या वाढवू शकतो. आपल्या आहारात अधिक फायबर समाविष्ट करण्याव्यतिरिक्त, हायड्रेशन राखणे आणि व्यायामाला महत्त्व देणे हे देखील बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यास मदत करु शकतात.

बद्धकोष्ठता फक्त फायबर, द्रव पदार्थांचे सेवन आणि औषधांनी व्यवस्थापित केली जाते. हा एक गैरसमज असून बद्धकोष्ठता केवळ फायबर, द्रवपदार्थ आणि औषधांपुरती मर्यादित न राहता विविध पद्धतींद्वारे दूर करता येते. जसे की पेल्विक फ्लोर फिजिओथेरपी किंवा योग्य बाऊल मुव्हमेंटमुळे देखील बद्धकोष्ठतेपासून आराम मिळू शकतो.

बद्धकोष्ठता केवळ चूकीच्या आहाराच्या सवयीमुळे होते हा एक गैरसमज असून वास्तविक पाहता जास्त प्रमाणात चरबीयुक्त मांस, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि अपुरे फायबरच्या सेवनामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते, ही स्थिती इरीटेड बाऊल सिंड्रोम(आयबीएस), आतड्यांसंबंधी रोग, निर्जलीकरण, गर्भधारणा, शारीरिक हालचालींचा अभाव आणि कोलन कॅन्सर यासह इतर विविध घटकांमुळे देखील उद्भवू शकते. शौचास रोखून धरु नका. असे केल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास आणखी वाढू शकतो. जेव्हा शौचाची तीव्र इच्छा उद्भवते, तेव्हा विलंब न करता शौचालयाचा वापर करा.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.