Health : Heart Attack पासून वाचण्यासाठी सकाळी उठल्यावर फक्त करा फक्त 3 गोष्टी, जाणून घ्या
प्रत्येकानं आरोग्यदायी आहार घेतला पाहिजे, व्यायाम केला पाहीजे अशा अनेक गोष्टी केल्या पाहीजेत. तर आता आपण हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी सकाळी उठल्यानंतर कोणत्या गोष्टी केल्या पाहीजेत याबाबत जाणून घेणार आहोत.
सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत. हिवाळ्याच्या या दिवसांमध्ये अनेक शारीरिक समस्या निर्माण होताना दिसतात. मग सर्दी, खोकला, ताप असे अनेक आजार मोठ्या प्रमाणात निर्माण होत असतात. तसंच थंडीच्या दिवसांमध्ये हृदयविकाराचा धोका देखील निर्माण होतो. त्यामुळे प्रत्येकानं स्वत:ची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी अनेक गोष्टी पाळणं गरजेचं असतं.
नेमकी कोणती काळजी घ्यावी?
सकाळी उठल्या उठल्या अंघोळ करणं टाळावं – बहुतेक लोकांना सकाळी लवकर उठून अंघोळ करण्याची सवय असते. पण तुम्हाला माहितीये का की, हिवाळ्यात सकाळी उठल्या उठल्या अंघोळ करणं तुमच्यासाठी घातक ठरतं. जर तुम्हाला हृदयाशी संबंधित आजार असतील तर सकाळी उठल्यानंतर लगेच अंघोळ करू नका. कारण थंड पाणी तुमच्या हृदयासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे सकाळी आंघोळ करताना कोमट पाण्याने अंघोळ करा. तसंच झोपेतून उठल्यानंतर लगेच अंघोळीला जाऊ नका. उठल्यानंतर अर्ध्या तासानंतर अंघोळकरा.
पाणी जास्त पिऊ नका – पाणी हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. तसंच डॉक्टर प्रत्येकाला जास्त पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण थंडीच्या दिवसांमध्ये सकाळी उठल्यानंतर जास्त पाणी पिऊ नका. बहुतेक लोक उठल्या उठल्या 1 ते 2 बाटल्या पाणी पितात. पण हे हृदयाशी संबंधित आजार असलेल्या लोकांसाठी घातक ठरू शकतं. कारण सकाळी उठल्यानंतर आपलं शरीर थंड असतं, त्यात तुम्ही थंड पाणी पिलं तर तुमचा रक्तदाब आणि रक्तातील साखर कमी होते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते
लवकर उठून व्यायाम करू नये – व्यायाम हा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. त्यामुळे प्रत्येकानं व्यायाम करणं खूप गरजेचं असतं. पण हृदयाशी संबंधित आजार असलेल्या लोकांनी हिवाळ्यात सकाळी लवकर उठून व्यायाम करू नये. ते त्यांच्यासाठी धोकदायक ठरू शकतं. कारण सकाळी लवकर उठून व्यायाम केल्यामुळे त्यांच्या हृदयावर दबाव निर्माण होतो. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. तसंच बहुतेक लोक पहाटे ४ किंवा ५ ला उठून व्यायम करतात. पण यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. त्यामुळे अशा लोकांनी ७ किंवा ८ वाजेच्या दरम्यान हलका व्यायाम करावा.