सावधान, उंदरांमुळे किडनी आणि लिव्हर फेल, दोन जणांचा मृत्यू, एक अत्यवस्थ
उंदरांच्या प्रादुर्भावाने केवळ शेतकऱ्यांचे नुकसान होते हे आपण ऐकून होतो. परंतू उंदरांमुळे आपल्या किडनी आणि लिव्हरवर देखील मोठा आघात होऊ शकतो. त्यामुळे उंदरांचा ताबडतोब बंदोबस्त करायला हवा. आजूबाजूचा परिसर स्वच्छ राखायला हवा असे डॉक्टरांनी सावध करताना म्हटले आहे.
मध्य प्रदेश | 20 मार्च 2024 : उंदीराच्या प्रजातीने आपल्या शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होत असते हे आपण ऐकून आहोत. आपल्या देशात अन्नधान्याची साठवण करण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने आपले अर्धेअधिक धान्य हे उंदरांकडून नासधुस केल्याने नष्ट होत असते. परंतू उंदराचा हा त्रास येथपर्यंतच थांबत नाही तर आता उंदरामुळे माणसांना प्राणघातक आजार होत आहेत. मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यात उंदराच्या प्रकोपाने लेप्टोस्पायरोसिस नावाच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. या आजाराने आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एकाचे प्राण अत्यवस्थ असून त्याच्यावर जबलपूर मेडीकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा आजार उंदरामुळे पसरतो. या आजाराने एका 13 वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षीया मुलीचा मृत्यू झाला आहे. तर एका 35 वर्षीय युवकाचा मृत्यूशी संघर्ष सुरु आहे.
लेप्टोस्पायरोसिस या आजाराला उंदराच्या शरीरात असलेले व्हायरस जबाबदार असतात. उंदीर मलमुत्रातूनही हे विषाणू मानवाच्या शरीरात प्रवेश करु शकतात. उंदीरानी उष्ठवलेले अन्न खाऊनही देखील हा आजार होऊ शकतो असे जिल्हा रुग्णालयात तैनात इपिडिमोलॉजिस्ट अनिल सिंह यांनी सांगितले आहे. उंदराच्या मलमूत्राने दुषित झालेला बिछाना आणि कपडे यांचा वापर आपण केला तरी हे विषाणू त्वचेतून आपल्या शरीरात शिरकाव करू शकतात असेही त्यांनी म्हटले आहे.
लिव्हर आणि किडनीवर परिणाम
एकदा का उंदीराच्या मलमुत्रातील या आजाराचे विषाणू मानवी शरीरात घुसले की लोकांना ताप, अंग दुखणे, उल्टी, जुलाब, किंवा शरीरावर लाल चट्टे उमटणे अशी लक्षणे दिसू लागतात. हा आजार लवकर बरा होत नाही. त्यामुळे माणसाच्या लिव्हर आणि किडनीवर याचा हल्ला होतो. माणसाचे वजन झपाट्याने घटते. शरीर कमजोर होते. आजाराने रक्त दुषित होते. आणि मनुष्य सातत्याने कमजोर होत जातो.
दहा दिवसाने अहवाल येतो
हा आजार झाल्यानंतर त्याची तपासणी करावी लागते. त्याची चाचणी केल्यानंतर आजाराचे निदान करण्यासाठी वेळ लागतो. येथे मध्य प्रदेशात याची चाचणी जबलपूरला होते. आजूबाजूला येथे कुठेही या आजाराच्या चाचणीची सुविधा नाही. याचा अहवाल दहा दिवसात येतो. उमरीया जिल्ह्यात नमूने 5 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान घेतले गेले, त्याचा अहवाल आला आहे. दोन जणांचा मृत्यू झाला आहे. एकाची अवस्था गंभीर असल्याचे डॉ. अनिल सिंह यांनी सांगितले.
दुर्लक्ष महागात पडेल
या आजाराकडे दुर्लक्ष झाले तर माणसाचा एक ते दीड महिन्यात मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांची भेट तातडीने घेऊन योग्य उपचार सुरु केले पाहीजेत, अन्य औषधांसह एंटीबायोटीक औषधे घ्यायला हवीत, हा आजार संसर्गजन्य नाही. त्यामुळे तो स्पर्शाने पसरत नाही. हा आजार रोखण्यासाठी आजू बाजूचा परिसर स्वच्छ राखावा, घरात उंदरांना येऊ देऊ नये. उंदरांनी उष्ठवलेले अन्न खाऊ नये. त्याच्या मलमूत्रापासून दूर राहावे. हा ज्युनिटीक डिसीज आहे. यापासून सावध रहावे असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.