Health : ‘या’ आजारामुळे पोटात भरतं पाणी, वेळीच घ्या उपचार नाहीतर… जाणून घ्या

जलोदरमुळे आपले लिव्हर निकामी होऊ शकते. तर हा आजार नेमका आहे तरी काय याबाबत आता आपण जाणून घेणार आहोत. तसंच या आजारापासून संरक्षण करण्यासाठी काय गोष्टी करणे गरजेचे आहे याबाबत देखील जाणून घेणार आहोत.

Health : 'या' आजारामुळे पोटात भरतं पाणी, वेळीच घ्या उपचार नाहीतर... जाणून घ्या
Follow us
| Updated on: Sep 30, 2023 | 10:20 PM

मुंबई : लिव्हर हे आपल्या शरीराचा महत्त्वाचा अवयव आहे. त्यामुळे त्याची काळजी घेणं देखील तितकच गरजेचं आहे. कारण लिव्हर हे आपल्या शरीराच्या इतर भागांना आधार देण्याचे काम करत असते. पण लिव्हर जेव्हाही योग्यरीत्या काम करत नाही तेव्हा अनेक आजार निर्माण होण्याची शक्यता असते. जसे की शरीरात पित्त रस वाढू शकतो किंवा काही गंभीर आजार निर्माण होऊ शकतात, हानिकारक पदार्थ शरीरात जमा होतात अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यातील आणखीन एक समस्या म्हणजे आपल्या पोटात पाणी भरणे, ज्याला जलोदर असं म्हणतात.

लिव्हरची संबंधित समस्यांमुळे आपल्या पोटात पाणी साचून राहते याला जलोदर असे म्हणतात. पोटात पाणी साचल्यामुळे रुग्णाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्याला चालणं देखील कठीण होऊन जातं. तसंच लिव्हर जेव्हा त्याचे कार्य करणे थांबवते तेव्हा पोटात पाणी साठण्याची समस्या उद्भवते. तर जे लोक जास्त प्रमाणात मद्यपान करतात किंवा ज्यांना कावीळ झाली आहे अशा लोकांना ही समस्या उद्भवण्याची शक्यता जास्त असते.

लिव्हर मधील जलोदर हा आजार टाळायचा असेल तर योग्य आहार घेणे गरजेचे आहे. तसेच आपल्या जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे. यामुळे तुमचे लिव्हर निरोगी राहण्यास मदत होईल. तसेच तुम्हाला काविळीचा त्रास झाल्यास तातडीने डॉक्टरांकडे जावे आणि योग्य तो उपचार घ्यावा. कारण तुम्ही वेळीच उपचार नाही घेतला तर हिपेटायटिसची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच मद्यपान करणे देखील टाळावे जेणेकरून या गंभीर आजाराचा सामना तुम्हाला करावा लागणार नाही.

जर तुमच्या शरीरात जलोदराशी संबंधित काही लक्षणे दिसू लागल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य तो उपचार घ्यावा. कारण तुमच्या पोटात पाणी साचल्यामुळे ते पाणी तुमच्या फुफ्फुसापर्यंत पोहोचू शकते, त्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास देखील त्रास होऊ शकतो. त्यामुळे वेळीच डॉक्टरांकडून योग्य तो उपचार घेणे गरजेचे आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.