Depression: ऑफीसमध्ये जास्त वेळ काम केल्याने येऊ शकते नैराश्य; असा करा ताण दूर!

एका अभ्यासानुसार असे नमूद करण्यात आले आहे की, खराब ऑफीस कल्चरमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्याचा धोका तिप्पट वाढतो. कोणताही ब्रेक घेतल्याशिवायय कित्येक तास सलग काम केल्याने मानसिक स्वास्थ्य बिघडू शकतं.

Depression: ऑफीसमध्ये जास्त वेळ काम केल्याने येऊ शकते नैराश्य; असा करा ताण दूर!
कामाचा ताण Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 16, 2022 | 11:50 AM

गेल्या आठवड्यात ‘ बॉम्बे शेव्हिंग कंपनी’चे सीईओ शंतनू देशपांडे यांनी लिंक्डइनवर लिहीलेल्या एका पोस्टमुळे टॉक्सिक वर्क कल्चरवर (Work Culture) चर्चा रंगली होती. या पोस्टमध्ये शंतनू यांनी फ्रेशर्स आणि जेन झेड वर्कफोर्स यासाठी सल्ला दिला होता, तक्रार न करता दिवसातून 18 तास काम करण्याची शिफारस शंतनू यांनी केली होती. मात्र त्याचा हा मुद्दा लोकांना मुळीच पटला नाही. ऑफिसमध्ये जास्त वेळ सलग काम केल्याने (long working hours) मानसिक आरोग्य (mental health) बिघडू शकतं, असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याशिवाय लठ्ठपणासारख्या (obesity) समस्याही उद्भवू शकतात. एका अभ्यासानुसार, ऑफीसमध्ये सपोर्टिव्ह वर्क एनव्हॉयर्मेंट ( सकारात्मक वातावरण ) नसेल तर त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्थितीवर होऊ शकतो. खराब ऑफीस कल्चरमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्याचा (Depression) धोका तिप्पट वाढतो, असेही या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

नैराश्याची सौम्य प्रकरणे बाजूला करत जेव्हा संवेदनशील विश्लेषण करण्यात आले तेव्हा LWH (41-48 आणि ≥55- तास / आठवडा) हे भविष्यातील नैराश्याच्या लक्षणांशी संबंधित असल्याचे आढळले. PSCमध्ये (Psychological Safety Climate) कमतरता ही कामाच्या दीर्घ तासांमुळे (LWH- Log Working hours) नव्हती , असे दिसून आले. पीएससीचा कामाच्या दीर्घ तासांशी संबंध नव्हता.

जास्त काळ डेस्कवर काम करणे ठरू शकते धोकादायक –

संशोधकांनी बसून काम करण्याची वेळ आणि इतर क्रिया यांच्या स्तरासाठी 13 अभ्यासांचे विश्लेषण केले. जे लोक किंवा ज्या व्यक्ती कोणतीही शारीरिक हालचाल न करता दिवसात 8 तासांपेक्षा जास्त वेळ बसून राहतात, त्या व्यक्तींना लठ्ठपणा आणि धूम्रपान केल्याने होतो, तितकाच मृत्यूचा धोका असतो. तथापि, इतर अभ्यासातून 10 लाखांहून अधिक लोकांचे विश्लेषण करून मिळालेल्या माहितीनुसार, असे आढळले की, 60 ते 75 मिनिटे शारीरिक हालचाल करणे हे (व्यायाम, चालणे) एका दिवसात बराच काळ बसून राहिल्यामुळे जे परिणाम होतात, त्याविरोधात प्रभावी ठरते. ज्यांचा सिटिंग टाईम सर्वात जास्त ॲक्टिव्ह (सक्रिय) असतो, त्यांच्या मृत्यूचा धोका कमी होतो.

हे सुद्धा वाचा

या उपायांनी ताण होईल दूर –

गुरुग्राम येथील ‘ स्टेप्स सेंटर फॉर मेंटल हेल्थ’ चे बाल आणि किशोरवयीन मानसोपचार तज्ज्ञ आणि वैद्यकीय संचालक डॉ. प्रमीत रस्तोगी यांच्या सांगण्यानुसार, खूप वेळ काम करत असताना स्वत:ची काळजी घेण्यासाठी काही वेळ ब्रेक घ्यावा. दिवसभरात थोडी-थोडी हालचाल करावी. काम करताना थोडा ब्रेक घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याशिवाय आपलं शरीर हायड्रेटेड ठेवणंही महत्वाचं आहे. बरेचसे लोक याकडे दुर्लक्ष करतात. एअर कंडीशन असलेल्या ऑफीसमध्ये सतत बसून काम केल्याने जास्त तहान लागत नाही, त्यामुळे नीट पाणी प्यायले जात नाही व परिणामी थकवा येतो. त्यामुळे थोड्या -थोड्या वेळाने पाणी पित राहणे, महत्वाचे आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.