Working Hours | आठवड्याचे सहा दिवस नऊ तासांची शिफ्ट, हृदयरोगाला आमंत्रण, WHO ने बजावले

2016 मध्ये 3 लाख 98 हजार जणांचा स्ट्रोकमुळे मृत्यू झाला. तर 3 लाख 47 हजार जणांनी हृदयरोगामुळे प्राण गमावले. या व्यक्तींनी आठवड्याला किमान 55 तास काम केले होते (Long working hours WHO)

Working Hours | आठवड्याचे सहा दिवस नऊ तासांची शिफ्ट, हृदयरोगाला आमंत्रण, WHO ने बजावले
Long working hours
Follow us
| Updated on: May 17, 2021 | 12:50 PM

न्यूयॉर्क : जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization- WHO) आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (International Labour Organization) यांनी प्रकाशित केलेल्या ताज्या अंदाजानुसार 2016 मध्ये दीर्घ तास काम केल्यामुळे स्ट्रोक (stroke) आणि इस्केमिक हृदयरोगामुळे (ischemic heart disease) 7 लाख 45 हजार जण मृत्युमुखी पडले. 2000 सालच्या तुलनेत तब्बल 29 टक्क्यांनी मृतांमध्ये वाढ असल्याची आकडेवारी आहे. त्यानुसार तुम्हीही आठवड्याचे सहा दिवस नऊ तासांची शिफ्ट करत असाल, तर हृदयरोगाला आमंत्रण देत आहात. (Long working hours increasing deaths from heart disease and stroke says WHO ILO research)

2016 पर्यंतची आकडेवारी काय सांगते? 

कामाच्या तासांचे आरोग्य आणि मृत्यूशी असलेल्या संबंधाविषयी पहिल्या जागतिक संशोधनात ही माहिती समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटना यांच्या अंदाजानुसार 2016 मध्ये 3 लाख 98 हजार जणांचा स्ट्रोकमुळे मृत्यू झाला. तर 3 लाख 47 हजार जणांनी हृदयरोगामुळे प्राण गमावले. या व्यक्तींनी आठवड्याला किमान 55 तास काम केले होते. 2000 ते 2016 या काळात दीर्घ कामाच्या तासांमुळे हृदयविकाराने मृत्यू पडलेल्या व्यक्तींचा आकडा 42 टक्क्यांनी वाढला, तर स्ट्रोकने बळी पडलेल्या व्यक्तींचा आकडा याच कालावधीत 19 टक्क्यांनी वधारला आहे.

कोणाला धोका अधिक? 

कामाशी निगडित आजार हे पुरुषांमध्ये अधिक जाणवतात. कारण मृतांपैकी 72% पुरुष होते. पश्चिम पॅसिफिक आणि दक्षिण-पूर्व आशियाई प्रदेशातील देशांचा यात समावेश आहे. हे कर्मचारी विशेषतः मध्यमवयीन किंवा वयस्क होते. आठवड्याला किमान 55 तास काम केलेल्या 60 ते 79 या वयोगटाला सर्वाधिक धोका जाणवला.

निष्कर्ष काय?

आठवड्याला 55 किंवा त्याहून अधिक तास काम केले, तर स्ट्रोकचा धोका 35 टक्के अधिक आहे, तर हृदयरोगाचा धोका 17 टक्क्यांनी जास्त आहे. म्हणजेच आठवड्याचे सहा दिवस दररोज नऊ तास काम करणारे कर्मचारी (आठवड्याला अंदाजे 54 तास) सीमारेषेवर आहेत. ही तुलना आठवड्याला 35 ते 40 काम करणाऱ्या व्यक्तींसोबत आहे. (पाच दिवसांचा आठवडा, दररोज आठ कार्यालयीन तासांचे काम)

जगात दीर्घ तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. जागतिक लोकसंख्येपैकी 9 टक्के व्यक्ती आठवड्याला 55 किंवा त्याहून अधिक तास काम करतात. यामुळे अपमृत्यूची रिस्क वाढत आहे. कोव्हिड पॅनडेमिकमुळे लोकांच्या कामकाजाची पद्धत बदलत चालली आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेचे महानिदेशक डॉ टेड्रॉस अधनॉम घेब्रेयिसस (Dr Tedros Adhanom Ghebreyesus) मानतात. घर आणि काम यांच्यातील सीमारेखा टेलिवर्किंगमुळे धूसर होत आहेत. अनेक व्यवसाय शटडाऊन करण्याची वेळ आली आहे. बेरोजगारीमुळे स्ट्रोक किंवा हृदयरोगाची तलवार अधिकच धारदार झाली आहे. त्यामुळे सरकार, कंपनी चालक आणि कर्मचारी यांनी आरोग्याच्या दृष्टीने तातडीने पावलं उचलायला हवीत, असं व्हूने सुचवलं आहे. (Long working hours increasing deaths from heart disease and stroke says WHO ILO research)

जागतिक आरोग्य संघटनेने सुचवलेल्या उपाययोजना

  1. कामकाजाच्या तासाची जास्तीत जास्त मर्यादा सुनिश्चित करणारे कायदे, नियम आणि धोरणे लागू करुन सरकारने अंमलबजावणी करावी, जेणेकरुन ओव्हरटाईमला आळा बसेल
  2. नियोक्ता आणि कामगार संघटनांमधील द्विपक्षीय किंवा सामूहिक करार कामकाजाची वेळ अधिक लवचिक होण्याची व्यवस्था करु शकतात
  3. कामकाजाचे तास आठवड्यातून 55 किंवा त्याहून अधिक होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी कर्मचारी कामाचे तास शेअर करु शकतात.

संबंधित बातम्या :

World Hypertension Day 2021 : ‘सायलेंट किलर’ची सहा लक्षणे, हायपर टेंशनबाबत कशी बाळगावी सावधगिरी?

भारतात कोरोनाची परिस्थिती आणखी भयंकर होण्याची शक्यता; WHO कडून धोक्याचा इशारा

(Long working hours increasing deaths from heart disease and stroke says WHO ILO research)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.