Health : या 5 आजारांचा थेट पाण्याच्या कमतरतेशी संबंध, सांधेदुखीपासून बीपीपर्यंतचा आजांराची कारण!
आपले स्नायू देखील कमकुवत होतात. तर आता पाण्याच्या कमतरतेमुळे आपल्याला कोणत्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
मुंबई : आज-काल धावपळीच्या जगात बहुतेक लोक स्वतःकडे दुर्लक्ष करतात. मग ते वेळेवर खात नाहीत किंवा वेळेवर पाणी देखील पीत नाहीत. आजकाल बहुतेक लोक पाणी खूप कमी प्रमाणात पितात. मग कामात व्यस्त असताना ते पाणी पिणे देखील विसरून जातात. पण पाण्याच्या कमतरतेमुळे आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. पाणी कमी पिल्यामुळे त्याचा आपल्या शरीराच्या अनेक भागांवर परिणाम होतो. पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचेची संबंधित समस्या, हृदयाशी संबंधित समस्या किंवा मूत्रपिंडाची समस्या अशा अनेक समस्या निर्माण होतात.
शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे रक्तदाबाची समस्या निर्माण होते. जेव्हा शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असते तेव्हा आपल्या शरीरात रक्ताभिसरण नीट होत नाही. तसेच पाणी कमी पिल्यामुळे बीपी कमी होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे शरीरात मुबलक प्रमाणात पाणी असणे गरजेचे आहे. तर प्रत्येकाने दररोज जास्त प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे जेणेकरून या समस्यांचा सामना करावा लागणार नाही.
बहुतेक लोकांना पाणी कमी पिल्यामुळे मुतखड्याची समस्या निर्माण होते. मुतखड्याची समस्या निर्माण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पोट दुखते. तसेच याचा तुमचा किडनीवर देखील परिणाम होतो. पाण्याच्या कमतरतेमुळे तुमच्या मूत्रपिंडातील विषारी पदार्थ नीट साफ होत नाहीत. ते मूत्रपिंडात जमा होतात, त्यामुळे मुतखड्याचा त्रास निर्माण होतो. त्यामुळे या समस्येपासून सुटका हवी असेल तर भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे.
शरीरात पाणी असणे भरपूर गरजेचे आहे. जर तुमच्या शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असेल तर इलेक्ट्रोलाईटची देखील कमतरता असते. यामुळे तुम्हाला झटके येण्याची शक्यता असते. शरीरात पाणी कमी असल्यामुळे तुमच्या मेंदूपर्यंत पोटॅशियम, सोडियम योग्य प्रकारे पोहोचत नाही. त्यामुळे तुमच्या मेंदूची क्रिया देखील बिघडते. त्यामुळे तुम्हाला झटके येण्याची शक्यता जास्त असते. तर शरीरात पाण्याचे प्रमाण जास्त असणे गरजेचे आहे.