Corona Third Wave : महाराष्ट्राला दिलासा? कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी नवी माहिती, तज्ज्ञ म्हणतात…

| Updated on: Aug 22, 2021 | 1:00 PM

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती आणि शक्यता लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकार आरोग्य सेवा उभारणी करण्याच्या तयारीत आहेत. कालचं, तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता असल्यानं मुंबईत बाल कोविड सेंटर उभारण्यात आलं आहे.

Corona Third Wave : महाराष्ट्राला दिलासा? कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी नवी माहिती, तज्ज्ञ म्हणतात...
CORONA
Follow us on

नवी दिल्ली: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती आणि शक्यता लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकार आरोग्य सेवा उभारणी करण्याच्या तयारीत आहेत. कालचं, तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता असल्यानं मुंबईत बाल कोविड सेंटर उभारण्यात आलं आहे. दुसरीकडे, तज्ज्ञांच्या मतानुसार तिसरी लाट येण्याची शक्यता फारशी नाही. ऑक्टोबरच्या आसपास तिसरी लाट आली तरी ती दुसऱ्या लाटेपेक्षा कमी प्रभावी असेल आणि त्यामुळे कमी प्रमाणात जीवितहानी होईल.

केंद्र सरकारच्या टास्क फोर्सचे सदस्य यावर भाष्य करण्याचे टाळत आहेत. पण, काही सदस्यांकडून देण्यात येत असलेल्या माहितीनुसार तिसरी लाट येणार नाही आणि जर आली, तर त्याचा प्रसार फारसा होणार नाही.

महाराष्ट्र आणि केरळसाठी गुड न्यूज

सेंट्रल कोरोना टास्क फोर्सचे काही वरिष्ठ सदस्यांच्या मतानुसार कोरोनाचे नवे रुग्ण हळू हळू कमी होतं आहेत. ऑगस्टच्या अखेरीस महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वेगानं कमी होईल, असा अंदाज आहे. देशातील काही राज्ये वगळता, बहुतेक राज्यांमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झालीय.ऑगस्टच्या अखेरीस, भारतातील कोरोना प्रत्येक दिवसाची रुग्णसंख्या 20 हजारांपेक्षा कमी असेल. ऑगस्ट अखेर भारतातील 65 कोटी लोकांचं किमान एका डोसचं लसीकरण झालेलं असेल.

तीन आठवड्यानंतर अंदाज बांधता येईल

लसीकरणाचं प्रमाणं वाढल्यानं कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या पूर्णपणे कमी होईल. कोरोना संसर्ग झाला तरी रुग्णालयात दाखल होण्याची गरज राहणार नाही, असा अंदाज तज्ज्ञांचा आहे. पुढील तीन आठवड्यांनंतरच तिसऱ्या लाटेबद्दल खरा अंदाज बांधता येणार आहे.

तिसरी लाट कमी तीव्र असेल

जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या यांच्या मतानुसार तिसरी लाट येईल की नाही हे निश्चित सांगता येत नाही. म्हणून, तिसऱ्या लाटेच्या आगमनाच्या शक्यतेबद्दल निश्चितपणे काहीही सांगितले जाऊ शकत नाही. पण तिसरी लाट आली तरी ती दुसऱ्या लाटे इतकी प्राणघातक ठरणार नाही, हे नक्की असल्याचं सौम्या म्हणतात. आपल्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागणार नाही. मात्र, नागरिकांनी निष्काळजी राहू नये कारण कोरोना अजून संपलेला नाही, त्यामुळे कोरोना विषयक नियमांचं पालन करणं आवश्यक आहे.

इतर बातम्या:

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 30 हजाराच्या घरात, सक्रिय रुग्णसंख्येतही मोठी घट

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्प वाढ, मात्र सक्रिय रुग्णसंख्या 150 दिवसांतील निचांकी

Maharashtra Corona update sources said experts claimed third wave not came in state