तो पुन्हा येतोय…; कोरानापासून बचाव करण्यासाठी काय उपाययोजना कराल?

How To Protect Yourself From Corona jn 1 Variant : महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ‘जेएन1’ या व्हेरिएंटचा पहिला रूग्ण महाराष्ट्रात आढळला आहे. त्यामुळे यंत्रणा अलर्टमोडवर आल्याचं पाहायला मिळतंय. या सगळ्यात स्वत:ची काळजी कशी घ्याल? कोरोनापासून बचाव कला कराल? वाचा...

तो पुन्हा येतोय...; कोरानापासून बचाव करण्यासाठी काय उपाययोजना कराल?
corona
Follow us
| Updated on: Dec 21, 2023 | 8:56 AM

मुंबई | 21 डिसेंबर 2023 : कोरोना… ज्यामुळे तुम्हा आम्हा साऱ्यांनाच दोन वर्षांसाठी घरात राहावं लागलं. या दोन वर्षात प्रचंड नुकसान झालं. अनेकांचा रोजगार गेला. तर काहींनी आपल्या जिवलगांना गमावलं. आयुष्यातील सर्वाधिक खडतर वेळेपैकी एक म्हणजे हा कोरोना काळ… पण आता पुन्हा आपल्याला या सगळ्यातून जावं लागू शकतं का? असा प्रश्न निर्माण झालाय. कारण तो पुन्हा येतोय… होय कोरोना पुन्हा सक्रीय झालाय. कोरोचा नवा व्हेरियंट समोर आलाय आणि त्याचा रूग्णही महाराष्ट्रात आढळलाय. पण या कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोणत्या उपाय योजना कराव्यात? वाचा…

महाराष्ट्रात ‘जेएन1’ चा पहिला रुग्ण

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा उपप्रकार असलेल्या ‘जेएन1’ सध्या सक्रीय झाला आहे. या व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळला. केरळच्या थिरूवअनंतपुरममधील काराकुलम इथं 8 डिसेंबरला आढळला. त्यानंतर आता महाराष्ट्रातील सिंधुदुर्गात ‘जेएन1’ चा एक रुग्ण आढळला आहे. गोव्यातही ‘जेएन1’ रुग्णांची नोंद झाली आहे. गोव्यात 19 संशयित रुग्णांची नोंद झालीय.

यंत्रणा अलर्टवर…

कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला आहे. त्यामुळे याची सरकारी पातळीवरही दखल घेण्यात आली आहे. राज्य सरकारने सर्व रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. डिसेंबरच्या सुरुवातीपासून अमेरिका, चीन आणि सिंगापूर या देशांमध्ये ‘जेएन1’ या नव्या व्हेरियंट रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतायेत. त्या पार्श्वूभूमीवर भारत आणि महाराष्ट्र अलर्टवर आहे.

स्वत:ची काळजी कशी घ्याल?

कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. एकाला कोरोनाची लागण झाली आणि त्याच्या संपर्कात दुसरी व्यक्ती आली तर त्या दुसऱ्या व्यक्तीलाही कोरोना होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी काही उपाय योजना करणं गरजेचं आहे.

शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं. जर का घरून एखादं काम होत असेल तर त्यासाठी घराबाहेर जाणं टाळा. बाहेर जाताना मास्कचा वापर करा. स्कार्फ बांधून घराबाहेर पडा. सॅनिटायझरचा वापर करा. बाहेरून घरी आल्यानंतर हात स्वच्छ धुवा. अंघोळ करा. जेणे करून तुम्हाला कोरोनाची लागण होणार नाही.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.