नळाच्या पाण्याने नाक-तोंड धुणं पडलं महागात, नाकात घुसलेल्या अमीबाने घेतला जीव ! Brain eating Amoeba मुळे वाढली चिंता

Brain Eating Amoeba : मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे अमेरिकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मात्र ही परिस्थिती कशी उद्बवली, तो अमीबा नेमका शरीरात घुसला कसा, हे जास्त धक्कादायक आहे.

नळाच्या पाण्याने नाक-तोंड धुणं पडलं महागात, नाकात घुसलेल्या अमीबाने घेतला जीव ! Brain eating Amoeba मुळे वाढली चिंता
Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 11:19 AM

वॉशिंग्टन : बाहेरून घरात आल्यानंतर हात-पाय, तोंड धुवायची सवय (washing hands) आपल्या सर्वांनाच असते. बाहेरच्या वातावरणातील धूळ, माती , आपल्या शरीरावर. हाता-पायांवर, चेहऱ्यावर लागलेली असते. ती स्वच्छ व्हावी व रोग पसरू नयेत म्हणून आपण ही काळजी घेतो. पण याच सवयीमुळे जीव धोक्यात आला तर ? वाचून धक्का बसला ना ? पण हे खरं आहे, अशी एक घटना अमेरिकेतील फ्लोरिडा (Florida) येथे घडली आहे. साऊथ फ्लोरिडा येथील एका व्यक्तीचा नळाच्या पाण्याने नाक-तोंड धुतल्याने मृत्यू घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फ्लोरिडातील आरोग्य विभागाने या घटनेची पुष्टी केली असून मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे (Brain Eating Amoeba) त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, फ्लोरिडा आरोग्य विभागाने पुष्टी केली आहे की साऊथ फ्लोरिडा येथील शार्लोट काऊंटी येथे राहणा-या एका व्यक्तीचा नायग्लेरिया फॉउलेरी या अमिबामुळे मृत्यू झाला आहे. सामान्य भाषेत त्याला ‘ब्रेन इटिंग अमिबा’ (Brain Eating Amoeba)असे म्हणतात. हे एक प्रकारचे इन्फेक्शन किंवा संसर्ग म्हणू शकतो. नळाच्या पाण्याने नाक धुतल्यामुळे ती व्यक्ती संसर्गाच्या संपर्कात आल्याचा संशय आहे, असे विभागाचे म्हणणे आहे. नाकातून अथवा तोंडातून या अमीबाला मज्जातंतूद्वारे मेंदूपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सापडतो. यामुळे तो मानवांच्या मेंदूपर्यंत पोहोचण्यास सक्षम आहे आणि मेंदूपर्यंत पोहचून तो मेंदूचे प्रचंड नुकसान देखील करतो. त्यामुळे मेंदूला सूज येते. हे प्राणघातक ठरू शकते.

हे सुद्धा वाचा

कुठे आढळतो हा अमिबा ?

लक्षात घेण्यासारखी (विशेष) गोष्ट म्हणजे हा अमिबा घाणेरड्या पाण्यातून नव्हे तर साफ, स्वच्छ पाण्यात आढळतो आणि लोक त्याला बळी पडतात. हा अमिबा तलाव, नद्या आणि गरम पाण्याचे झरे यांसारख्या उबदार किंवा गोड्या पाण्याच्या स्त्रोतांमध्ये आणि मातीमध्ये आढळू शकतो. त्यामुळे स्विमिंग पूल किंवा वॉटर पार्कमध्ये लोक त्याला बळी पडतात. हा संसर्ग नेमका कसा झाला याचा अमेरिकेतील अनेक सरकारी संस्था तपास करत आहेत, असे आरोग्य विभागाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

हा संसर्ग झाल्यानंतर सुरूवातीला त्या व्यक्तीला डोकेदुखी, ताप, मळमळ, उलट्या, संतुलन गमावणे, दिशाभूल होणे, चक्कर येणे अशी लक्षणे जाणवतात. मात्र ही स्थिती गंभीर झाल्यास मानसिक स्थितीत वारंवार बदल, भ्रम जाणवू शकतो तसेच व्यक्ती कोमात सुद्धा जाऊ शकते.

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या सांगण्यानुसार, हे संक्रमण दुर्मिळ आहे. 2012 आणि 2021 दरम्यान, यूएसमध्ये 31 नेग्लेरिया फाउलेरी संसर्गाची नोंद झाली. परंतु हवामान बदलामुळे निर्माण होणारा प्रचंड दुष्काळ आणि उष्णतेमुळे अमिबाची पाण्यामध्ये वाढ होणे सोपे झाले आहे.

शरीरात जाणवतात कोणती लक्षणे ?

नायग्लेरियायुक्त अमीबा असलेल्या पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर एक ते 12 दिवसांनी रोगाची लक्षणे दिसून येतात. एकदा का हा अमीबा मेंदूपर्यंत पोहोचला की, यामुळे माणसांमध्ये अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटिस नावाचा आजार होतो. हा संसर्ग झाल्यानंतर सुरूवातीला त्या व्यक्तीला डोकेदुखी, ताप, मळमळ, उलट्या, संतुलन गमावणे, दिशाभूल होणे, चक्कर येणे अशी लक्षणे जाणवतात. मात्र ही स्थिती गंभीर झाल्यास मानसिक स्थितीत वारंवार बदल, भ्रम जाणवू शकतो तसेच व्यक्ती कोमात सुद्धा जाऊ शकते, ज्यामुळे मृत्यू होऊ शकतोतो.

सीडीसीच्या सांगण्यानुसार, 1962 ते 2021 पर्यंत अमेरिकेत एकूण 154 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यामध्ये केवळ चार लोक मृत्यूवर मात करू शकले आहेत.

दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तज्ज्ञांनी शार्लोट काउंटी येथील सर्व रहिवाशांना, नळाचे पाणी नाक व चेहरा धुण्यासाठी न वापरण्याचा सल्ला दिला आहे. तरीही असे पाणी वापरण्याची वेळ आलीच तर प्रथम ते पाणी उकळून घेण्याचा व नंतर वापरण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.