Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cornavirus: काँडम जसा HIV पासून वाचवतो, तसाच मास्क कोरोनापासून वाचवतो

एचआयव्हीच्या सुरुवातीच्या काळात लोक मास्कप्रमाणे काँडम वापरायलाही तयार नव्हते. | Condom Sex Lockdown Mask

Cornavirus: काँडम जसा HIV पासून वाचवतो, तसाच मास्क कोरोनापासून वाचवतो
Follow us
| Updated on: May 01, 2021 | 12:26 PM

नवी दिल्ली: एडस् रोखण्यात निरोध ( Condom) वापरणे जितके महत्त्वाचे असते, त्याप्रमाणेच कोरोना रोखण्यासाठी मास्क (Mask) गरजेचा असतो, असे मत प्रसिद्ध साथरोगतज्ज्ञ डॉ. थेक्ककारा जॅकब जॉन (Thekkekara Jacob John) यांनी व्यक्त केले. तुम्ही एचआयव्हीचा संसर्ग रोखण्यासाठी काय करता? संभोग करतच नाही की सुरक्षित संभोग करता? अनेकदा मन वळवल्यानंतर लोकांनी सुरक्षित सेक्सचा पर्याय निवडला. त्याप्रमाणेच कोरोनाच्याबाबतीत मास्क हा उपाय आहे, लॉकडाऊन नव्हे, असे डॉ. थेक्ककारा जॅकब जॉन यांनी सांगितले. (The Mask Is For Covid What The Condom Was For HIV, Say Experts)

गेल्यावर्षी मार्च महिन्यात देशात पहिल्यांदा लॉकडाऊन झाला तेव्हाही मी विरोध केला होता. कारण माणूस हा सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे सामाजिक संपर्कावर निर्बंध लादल्यास त्याचा परिणाम माणसाच्या मनस्थितीवर होतो, ही बाब ध्यानात घेतली पाहिजे. सामाजिक देवाणघेवाणीशिवाय माणूस जगू शकत नाही. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी लोक उल्लंघन करतील किंवा त्यांना हतबल वाटेल, असे नियम करण्याची काय गरज आहे? त्याऐवजी मास्क वापरणे गरजेचे आहे, ही गोष्ट लोकांच्या मनावर बिंबवली गेली पाहिजे, असा सल्ला डॉ. थेक्ककारा जॅकब जॉन यांनी दिला.

‘तेव्हादेखील लोक मास्कप्रमाणे कंडोम वापरायला तयार नव्हते’

डॉ. वसंथपुरम रवी यांनीही कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नसल्याचे मत नोंदवले. लोकांवर बंधने टाकून त्यांच्या वागणुकीत बदल घडवता येत नाही. एचआयव्हीच्या सुरुवातीच्या काळात लोक मास्कप्रमाणे काँडम वापरायलाही तयार नव्हते. अशावेळी लोकांना सेक्स करुच नका असे सांगण्यापेक्षा सुरक्षित सेक्स करा, हे पटवून देणे हाच एकमेव मार्ग होता. आजही अनेक लोक असुरक्षित सेक्स करतात. मात्र, सरकारने आजही काँडम वापरणे किती महत्त्वाचे आहे, याबद्दल जनजागृती करणे सोडलेले नाही.

लॉकडाऊनमुळे कोरोनाचा संसर्ग थोड्यावेळापुरता थांबेल. परंतु, त्यामुळे अर्थव्यवस्थेला फटका बसेल. लोकांनी मास्क घालण्यासाठी शेवटपर्यंत नकार दिला तर मग आपल्याकडे लसीकरण हाच मार्ग उरतो, असे डॉ. वसंथपुरम रवी यांनी म्हटले.

गेल्या 24 तासांत देशात चार लाखांहून अधिक नवे कोरोना रुग्ण

भारतात गेल्या 24 तासात कोरोनाचे 4 लाख 01 हजार 993 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1 कोटी 91 लाख 64 हजार 969 वर गेली आहे. 3 हजार 523 कोरोनाग्रस्तांना कालच्या दिवसात प्राण गमवावे लागले. एकूण कोरोनाबळींचा आकडा 2 लाख 11 हजार 853 झाला आहे.

संबंधित बातम्या:

देशातील कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय समिती स्थापन करावी: संजय राऊत

Coronavirus India : येत्या दोन-तीन दिवसांत देशातील कोरोना संसर्ग शिगेला पोहोचणार; शास्त्रज्ञांचा अंदाज

Corona Cases India | देशात चार लाखांहून अधिक नवे कोरोना रुग्ण, एका दिवसात 3 हजार 523 कोरोनाबळी

(The Mask Is For Covid What The Condom Was For HIV, Say Experts)