Special Story | ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर मशीनसह इतर उपकरणांचा उपयोग फायदेशीर की नुकसानकारक?

पण या उपकरणांचा वापर खरचं योग्य आहे का? अशा प्रश्न सध्या उपस्थित होऊ लागला आहे. (Medical Gadgets Equipment)

Special Story | ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर मशीनसह इतर उपकरणांचा उपयोग फायदेशीर की नुकसानकारक?
मेडिकल उपकरणं
Follow us
| Updated on: Feb 06, 2021 | 7:37 AM

मुंबई : ‘शुभं करोती कल्याणम्, आरोग्यम् धनसंपदा’ हा श्लोक आपण लहानपणापासून ऐकतो. ‘आरोग्य हीच खरी संपत्ती आहे’ असा याचा अर्थ होता. या श्लोकाप्रमाणे आरोग्याची काळजी घेणे, वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. यंदा कोरोना काळात आरोग्याची नियमित तपासणी करावी, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांकडून दिला जातो. कोरोना काळात विशेष काळजी घेण्यासाठी थर्मल स्कॅनर (इन्फ्रारेड टेम्परेचर गन), पल्स ऑक्सिमीटर, ब्लड प्रेशर मशीन, ईसीजी मॉनिटर, डिजीटल वॉच ही सर्व उपकरणं आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. त्यामुळे या उपकरणांना दिवसेंदिवस मागणीही वाढत चालली आहे. (Medical Gadgets Equipment Advantage or disadvantage)

पण या उपकरणांचा वापर खरचं योग्य आहे का? अशा प्रश्न सध्या उपस्थित होऊ लागला आहे. या उपकरणामुळे आपण कुठे ना कुठे डॉक्टरांकडे किंवा आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे टाळत असल्याचेही बोललं जात आहे.

सध्या बर्‍याच रुग्णालयात कोरोनावर उपचार सुरु आहेत. त्यामुळे आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात जाणं असुरक्षित वाटू लागलं आहे. त्यामुळे अनेकांनी ही वैद्यकीय साधनं घरातचं ऑर्डर करुन वापरण्यास सुरुवात केली आहे. काहींसाठी ती फार उपयुक्त ठरत आहेत. या उपकरणांच्या मदतीने डॉक्टरांकडे फक्त चेकअपसाठी जाण्यास अनेक जण टाळाटाळ करतात. पण ही उपकरणं वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला हा अत्यंत गरजेचे आहे.

?कोणत्या उपकरणांचा उपयोग??

thermometer

thermometer

?नॉन कॉन्टॅक्ट इन्फ्रारेड थर्मामीटर (Thermometer)

सध्या सर्व ठिकाणी नॉन कॉन्टॅक्ट इन्फ्रारेड थर्मामीटरचा उपयोग केला जातो. शरीराचे तापमान मोजण्यासाठी हे उपकरणं वापरले जाते. थर्मामीटरच्या मदतीने आपण स्वतःचे आणि आपल्या घरातील सदस्यांचे शरीराचे तापमान सहज तपासू शकता.

blood pressure monitor

blood pressure monitor

?डिजीटल मॉनिटर ब्लडप्रेशर मशीन (blood pressure monitor)

डिजीटल मॉनिटर ब्लडप्रेशर मशीनच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी रक्तदाब तपासू शकता. या मशीनच्या मदतीने तुम्ही प्लस रेटही मोजू शकता. ही मशीन बाजारात सहजरित्या उपलब्ध आहे.

pulse oximeter

pulse oximeter

?पल्स ऑक्समीटर (Fingertip pulse oximeter)

पल्स ऑक्समीटरच्या सहाय्याने तुमच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी मोजता येते. हे मशीन लहान असेल, तरी अतिशय उपयुक्त ठरते. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर याचा वापर आपल्याला करता येतो. (Medical Gadgets Equipment Advantage or disadvantage)

Glucometer

Glucometer

?ग्लुकोमीटर (Glucometer)

ग्लुकोमीटरच्या मदतीने आपण शरीराच्या ग्लुकोज पातळी शोधू शकता. याच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी रक्तातील साखरेची पातळी तपासू शकता. मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी हे उपकरण अत्यंत उपयुक्त आहे.

ECG monitor

ECG monitor

?पोर्टेबल पर्सनल ईसीजी मॉनिटर (ECG monitor)

पोर्टेबल पर्सनल ईसीजी मॉनिटरच्या मदतीने आपण ईसीजी मॉनिटर करु शकतो. मात्र या उपकरणाचा वापर करतेवेळी डॉक्टरांचा सल्ला उपयोगी ठरतो.

?मागणी किती??

कोरोनापूर्वी या सर्व उपकरणांची नावंही सर्वसामान्य लोकांना माहिती नव्हती. अनेकांनी केवळ डॉक्टरकडेच ही उपकरण बघितली असतील. मात्र कोरोना काळात या सर्व उपकरणांची मागणी प्रचंड वाढली आहे. कोरोनापूर्वी ही सर्व उपकरणं अगदी तुरळक विकली जात होती. मात्र सध्या या सर्व उपकरणांची खप प्रचंड होत आहे.

काही महिन्यापूर्वी ही जवळपास 10 ते 20 च्या संख्येत विकली जात होती. मात्र आता दर दिवसाला 500 उपकरणांची विक्री होत असल्याचेही बोललं जात आहे. लोकांमध्ये आरोग्यप्रती जागरुकता वाढली आहे. त्यामुळेच या उपकरणांची विक्री वाढल्याचे स्पष्ट होत आहे.

घरी तापमान आणि ऑक्सिजन पातळी मोजण्यासाठी अनेकांनी ही उपकरणं खरेदी केली आहे. काही जण तर खिशातच ऑक्सिमीटर घेऊन फिरतात. तर काही जण डिजीटल वॉचच्या मदतीने हार्ट रेट, स्ट्रेस लेव्हल चेक करतात. त्यामुळे आता ही उपकरणं प्रत्येकाच्या जीवनाचे अविभाज्य घटक बनलं आहे. (Medical Gadgets Equipment Advantage or disadvantage)

?डॉक्टरांचा सल्ला काय?? 

सध्या वापरल्या जाणाऱ्या या उपकरणांची किंमत कमी असते. मात्र याचा खप वाढला की याच्या किंमती अनेकदा अव्वाच्या सव्वा वाढवून सांगितल्या जातात. त्यामुळे ग्राहकांना याचा अतिरिक्त पैसे मोजावे लागतात. तसेच अनेकदा ही उपकरण चालू स्थितीत आहेत का? ती योग्य निदान दाखवतात की नाही? याचा आपल्याला काहीही अभ्यास नसतो. त्या संबंधित उपकरणाने दाखवलेले निदान योग्य आहे, असा समज आपण करुन घेतो.

कित्येकदा ही उपकरणं कशी वापरायची याची रुग्णाला किंवा त्यांच्या नातेवाईकांना काहीही माहिती नसते. त्यामुळे इंटरनेट किंवा सोशल मीडियाच्या मदतीने आपण त्या उपकरणाचा वापर करतो. त्याने दाखवलेल्या निदानाचा नेमका अर्थ काय? हे देखील आपण ऑनलाईनच्या माध्यमातून जाणून घेतो. मात्र तो बरोबर आहे की चुकीचा, याची माहिती तज्ज्ञांइतकी आपल्याला नसते. त्यामुळे ही घरगुती मेडिकल उपकरण वापरताना डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.

एखादे घरगुती मेडिकल उपकरण नेमकं कसे वापरतात? त्याच्या निदानाचा अर्थ काय? रुग्णाला याचा फायदा किती आहे? या सर्व प्रश्नांची नीट माहिती घेऊनच आपण त्याचा वापर करायला हवा.

विशेष म्हणजे ही मेडिकल उपकरणं काही विशिष्ट प्रोगामिंगच्या आधारे बनवले जातात. जर यात काही त्रुटी आढळल्यास किंवा बग निर्माण झाल्या ते रुग्णांसाठी हानिकारक ठरु शकते. जर या मशीने एखाद्या रुग्णाचे चुकीचे निदान दर्शवले आणि त्या निदानाप्रमाणे त्या रुग्णाने उपचार घेतले तर त्या रुग्णांची तब्ब्येतीवर परिणाम होऊ शकतात.

?उपकरणांचा वापर फायदेशीर की नुकसानकारक??

या मेडिकल उपकरणांचा वापर हा फायदेशीर की नुकसानकारक हे सांगणं फार अवघड आहे. काळाची गरज म्हणून बनवण्यात आलेली ही उपकरण अनकेदा फायदेशीर ठरतात. मात्र कित्येदा या उपकरणांचा अतिरेक फार धोकादायक धरु शकतो. त्यामुळे या मेडिकल उपकरणांचा वापर कधी आणि कुठे करायचा याबाबत तज्ज्ञांचा सल्ला फायदेशीर ठरतो. (Medical Gadgets Equipment Advantage or disadvantage)

संबंधित बातम्या : 

Health Checkup | वयाची तिशी पार केलीत? मग ‘या’ मेडिकल टेस्ट नक्की करा

Study | टक्कल पडण्याची समस्या लवकरच नाहीशी होणार! वाचा काय म्हणतोय संशोधकांचा नवा अभ्यास…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.