Male Fertility : ऑफिससाठी तयारी करताना पुरूषांनी टाळावी ही चूक, अन्यथा वाढू शकतो नपुंसकत्वाचा धोका
ऑफिसला जाताना चांगली, नीट तयारी करण्यात काही गैर नाही, पण जर तुम्ही एका खास गोष्टीची काळजी घेतली नाही तर शुक्राणूंची (स्पर्म) संख्या कमी होऊ शकते.
नवी दिल्ली : लग्नानंतर बहुतांश जोडपी आई-बाबा (parents) बनण्याचे स्वप्न पहात असतात. सर्वच पुरूषांना असं वाटत की त्यांनीही (आपल्या वडिलांप्रमाणे) चांगला पिता (good father) बनावं. पण काही वेळेस अशा अनेक शारीरिक समस्या दिसू लागतात, ज्यामुळे त्याचे स्वप्न भंग पावते. पुरुषांची नपुंसकता (infertility) ही भारतातील एक मोठी समस्या बनली आहे, ज्याबद्दल ते लाजेखातर बोलणे टाळतात. सहसा, या समस्या आपल्या स्वतःच्या काही चुकांमुळे उद्भवतात, त्यात बिघडलेली जीवनशैली आणि आरोग्यदायी खाण्यापिण्याच्या अभाव, अशा सवयींचा समावेश होतो. त्यामध्ये सुधारणा करण्यावर नेहमी भर दिला जातो, परंतु एक वाईट सवय देखील आहे जी बहुतेक लोकांच्या लक्षात येत नाही. ती कोणती हे जाणून घेऊया.
या वाईट सवयीचा पुरूषांना धोका
ऑफिसला जाताना सर्वजण नीट तयार होऊन जातो, पुरुष बरेचदा चांगले कपडे घालतात, जेणेकरून त्यांच्या लूकमध्ये कोणतीही कमतरता भासू नये. पण काही पुरूष त्यांचा बेल्ट खूप जास्त घट्ट लावतात, हे तुम्ही पाहिले असेल. जर तुम्हालाही ही सवय बऱ्याच काळापासून असे तर त्याचा आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. खरंतर, आपण पोटाच्या खालच्या भागात पट्टा लावतो तेथे शरीरातील महत्त्वाचे अवयव आणि रक्तवाहिन्या असतात.
पुरुष घट्ट बेल्टचा वापर का करतात ?
काही लोक त्यांचे वाढलेले पोट आणि लठ्ठपणा लपविण्यासाठी टाईट बेल्टचा वापर करतात. लठ्ठपणा लपविण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे बेल्ट आहेत, जे स्लिम दाखवण्याचा दावा करतात. यामुळे तुम्ही काही काळ जरी स्लिम दिसू लागलात तरी दीर्घकाळापर्यंत पोट घट्ट ठेवण्याचे काही तोटे असतात, ज्याबद्दल वेळीच जाणून घेणे शहाणपणाचे ठरते.
कमी होईल स्पर्म काऊंट
जर एखाद्या पुरुषाने बराच काळ घट्ट बेल्ट लावला तर हळूहळू त्याची प्रजनन क्षमता कमी होऊ लागते. याचे कारण म्हणजे घट्ट बेल्ट घातल्यामुळे पेल्विक एरियावर अनावश्यक दबाव येतो. या भागात पुरुषांचा खासगी भाग असतो, जो पुनरुत्पादनासाठी महत्वाचा असतो. याशिवाय घट्ट पँटमुळे या भागांमध्ये हवा खेलती रहात नाही, त्यामुळे तेथील तापमान वाढते आणि शुक्राणूंची संख्या (Sperm Count) कमी होण्यास कारणीभूत असल्याचे मानले जाते. त्यामुळे पुरूषांनी पँट किंवा जीन्स वापरताना जास्त घट्ट बेल्ट वापरू नये, असा सल्ला तज्ज्ञ देतात. अन्यथा त्याचे दुष्परिणाम सहन करावे लागू शकतात.