Morning Foods : रोज सकाळी उठल्याबरोबर खा ‘या’ गोष्टी; शरीराला ठेवा आरोग्यदायी

मॉर्निंग फूड्स : चांगल्या आरोग्यासाठी दिवसाची सुरुवात हेल्दी ब्रेकफास्टने करणे फार महत्वाचे आहे. आपल्या शरीराला सकाळी चांगल्या पोषणाची गरज असते. जाणून घेऊया सकाळी नाश्त्यात कोणत्या गोष्टी खाव्यात.

Morning Foods : रोज सकाळी उठल्याबरोबर खा ‘या’ गोष्टी; शरीराला ठेवा आरोग्यदायी
Image Credit source: medicinenet.com
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 2:24 PM

Health : सकाळची पहिली गोष्ट काय खावी आणि काय खाऊ नये याबाबत लोकांच्या मनात संभ्रम (Confusion in the mind) असतो. काही लोक सकाळी उठल्याबरोबर नट्स खातात, तर काही लोक फळे किंवा एक कप चहा पिऊन आपल्या दिवसाची सुरुवात करतात. पण तुम्हाला माहित आहे का की, सकाळी खाणे आरोग्यदायी मानले जाते. दिवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी न्याहारी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. बरेच लोक सकाळचा नाश्ता सोडून देतात, पण काही लोक असे असतात ज्यांना सकाळी काहीतरी खाण्याची गरज असते. जर तुम्ही न्याहारीचा आनंद घेत असाल, तर तुम्ही अशा गोष्टी निवडाव्या ज्या तुम्हाला दिवसभर ऊर्जा (Energy throughout the day) देऊ शकतील. नाश्ता केल्यावर बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटेल. त्यामुळे जर, तुम्हीही सकाळी काय खावे याबाबत गोंधळात असाल तर, जाणून घ्या, सकाळच्या न्याहारीतील (For breakfast) आरोग्यदायी पदार्थ.

  1. अंडी- अंडी हा एक सोपा नाश्ता आहे. अंडी खाणे खूप आरोग्यदायी देखील मानला जाते. हे प्रोटीनचे खूप चांगले स्त्रोत मानले जातात. ते पचायला वेळ लागतो, त्यामुळे अंडी खाल्ल्यानंतर तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते. अंडी देखील कोलीनचा एक चांगला स्रोत मानला जातो, जो तुमच्या मेंदू आणि लिव्हरसाठी खूप फायदेशीर आहे.
  2. ग्रीक दही – ग्रीक दही हा झटपट नाश्त्यासाठी खूप चांगला पर्याय आहे. ग्रीक दह्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते आणि ते प्रथिनांचा एक चांगला स्रोत मानला जातो. 1 कप दह्यामध्ये 25 ग्रॅम प्रथिने आणि 149 कॅलरीज असतात. शिवाय, ग्रीक दही कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 12, जस्त, पोटॅशियम आणि फॉस्फरस सारख्या फायदेशीर पोषक तत्वांनी समृद्ध आहे.
  3. पपई- सकाळी रिकाम्या पोटी पपई खाणे खूप चांगले मानले जाते. पपई पोट साफ करण्यास मदत करते. पपई खाताना काही गोष्टींचीही काळजी घ्यावी लागते. ते खाल्ल्यानंतर किमान तासभर इतर काहीही खाऊ नये. पपई खाल्ल्याने वाईट कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
  4. दलिया- दलिया हा खूप चांगला नाश्ता मानला जातो. ओट्समध्ये ग्लूटेन नावाचा एक अद्वितीय फायबर असतो. हे फायबर कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. तसेच, यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते ज्यामुळे तुम्ही जास्त खाणे टाळू शकता. ओट्स लोह, बी जीवनसत्त्वे, मॅंगनीज, मॅग्नेशियम, जस्त आणि सेलेनियमचा चांगला स्रोत आहे.
  5. हे सुद्धा वाचा
  6. पनीर- नाश्त्यासाठी पनीर हा उत्तम पर्याय आहे. एक कप पनीरमध्ये 24 ग्रॅम प्रोटीन असते. नाश्त्यामध्ये पनीरचे सेवन केल्याने तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. पनीरमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते. एक कप पनीरमध्ये 180 कॅलरीज आढळतात.
  7. गव्हाच्या पिठाचा बनवलेला टोस्ट- जर तुम्हाला नाश्त्यात काही साधं खायचं असेल तर तुम्ही गव्हाच्या पिठाचा टोस्ट खाऊ शकता. गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या टोस्टमध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. हे खूप हळू पचते आणि रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढण्यास प्रतिबंध करते. तुम्ही शेंगदाणा बटर, अंडी, एवोकॅडो टोस्टसोबत हा टोस्ट खाऊ शकता.
  8. ग्रीन टी- सकाळी ग्रीन टीचे सेवन करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. ग्रीन टीमध्ये असलेले कॅफिन तुम्हाला सतर्क करते आणि मूडही योग्य ठेवते. एका कप ग्रीन टीमध्ये 35 ते 70 मिलीग्राम कॅफिन आढळते. ग्रीन टीचे सेवन केल्याने केवळ मूड सुधारत नाही तर चिंताही कमी होते. सकाळच्या न्याहरीत काय खावे ही प्रत्येकाची आवड असली तरी, वरील सर्व पदार्थांने तुमचे आरोग्य उत्तम राहते. याबाबत आजतक हिंदी ने सविस्तर वृत्त प्रसारीत केले आहे.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.