अर्ध्याहून अधिक भारतीयांची झोप उडवण्यास कारणीभूत आहेत ‘डास’, सर्वेक्षणातून माहिती समोर
सरासरी प्रत्येक 2 पैकी 1 प्रौढ व्यक्ती डासांना त्यांच्या अस्वस्थ झोपेचे प्रमुख कारण मानतात. पश्चिम भागातील लोकांना याचा सर्वाधिक त्रास होतो. या भागातील 61% लोकांची झोप डास चावल्यामुळे आणि डासांच्या भूणभूणीमुळे विचलित होते किंवा त्यांना शांत व स्वस्थ झोप मिळत नाही.
मुंबई : पुरेश्या झोपेचे महत्व (importance of sleep) आणि त्याचा एखाद्याच्या आरोग्यावर आणि निरोगीपणावर कसा परिणाम होतो याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 17 मार्च रोजी जागतिक झोपेचा दिवस (world sleep day) म्हणून साजरा केला जातो. काही तब्येतीविषयक परिस्थिती, जीवनशैली, ताणतणाव ही झोपेच्या विकारांची कारणे असली तरी इतर बाह्य घटक ही आहेत ज्यामुळे स्वस्थ झोप लागत नाही आणि त्यांच्याकडे नेहमी दुर्लक्ष होते. अयोग्य किंवा आरामदायी नसलेल्या गाद्या किंवा उश्या, हवामान, आणि अगदी डाससुद्धा (mosquito)अशा वेगवेगळ्या घटकांमुळे अस्वस्थ झोपेचा त्रास होऊ शकतो.
गुडनाइटने केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले की, 55% भारतीयांना वाटते की, डास चावणे आणि त्यांची भूणभूण हे शांत व चांगली झोप न लागण्याचे आणि झोप सारखी विचलित होण्याचे कारण आहे. गोदरेज कन्झ्यूमर प्रोडक्टस लिमिटेड (GCPL) च्या गुडनाइट (Goodknight) ने झोपेच्या पद्धतींवर डासांचा प्रभाव समजून घेण्यासाठी मार्केट रिसर्च आणि डेटा अॅनालिटिक्स फर्म ‘यू गव्ह’ (YouGov) यांच्या संयुक्त विद्यमाने एक सर्वेक्षण केले. संपूर्ण भारतातील 1011 हून जास्त लोकांना घेऊन हे सर्वेक्षण करण्यात आले.
सर्वेक्षण स्पष्टपणे दर्शविते की, जवळ जवळ 60% प्रौढ लोक या ‘लहानश्या धोक्याला’ झोपेत अडथळा आणणारा किंवा चांगल्या झोपेच्या कमतरतेस कारणीभूत असलेला मानतात. हवामानातील बदल (अति उष्ण किंवा अति थंड हवामान) हा घटक ही तेवढाच कारणीभूत घटक आहे; पण झोपेत अडथळा आणणारा या दृष्टीने हा ‘गुणगुणणारा राक्षस’ च सर्वात जास्त कारणीभूत असलेला घटक ठरला.
भौगोलिक प्रदेशांच्या संदर्भात उत्तर आणि मध्य भारतातील 55% प्रतिसादक, दक्षिण भारतातील 53% प्रतिसादक आणि पूर्व व ईशान्य भारतातील 50% प्रतिसादकांनी डास चावणे आणि त्यांची भूणभूण हे झोप विचलित करणारे आणि चांगली झोप न मिळण्यास कारणीभूत असलेले प्रमुख घटक असल्याचे नमूद केले. विशेष म्हणजे, पश्चिम भारत हा सर्वात जास्त प्रभावित क्षेत्र आहे आणि या भागातील 61% लोक खराब झोपेचे कारण डासांच्या चावण्याला आणि त्यांच्या भूणभूणीला मानतात. सरासरीने प्रत्येक 2 प्रौढांपैकी 1 व्यक्तीने झोपेच्या विकारांचे प्रमुख कारण डासांनाच मानले आहे.
गोदरेज कन्झ्यूमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL) च्या घरगुती किटकनाशके विभागाचे श्रेणी प्रमुख (कॅटेगरी हेड) श्री. शेखर सौरभ म्हणाले, “इतर अनेक कारणांपैकी डासांचा धोका हे निद्रानाशाचे एक प्रमुख कारण असल्याचे उघड झाले आहे आणि पर्यायाने, भारताच्या आरोग्य गुणांकावर त्याचा परिणाम होत आहे. लोकांना जाणीव होत आहे की, डास हे महत्त्वाचे घटक आहेत जे त्यांच्या आणि त्यांच्या प्रियजनांच्या आरोग्यावर व निरोगीपणावर नकारात्मक परिणाम करीत आहेत. या सर्वेक्षणाचे निष्कर्ष डास नियंत्रणाच्या सर्वसमावेशक उपायांच्या आवश्यकतेला बळकटी देतात. घरगुती कीटकनाशकांच्या श्रेणीत बाजारात अग्रगण्य असलेल्या गुडनाइटला शांत झोपेचे महत्व समजते. आणि सर्व भारतीय घरांमध्ये सुरक्षित व किफायतशीर डास प्रतिबंधके प्रदान करण्यासाठी गुडनाइट वचनबद्ध आहे.”