Health : कमरेच्या खाली वेदना होत असतील तर ‘या’ गंभीर आजाराची लक्षणे
पाठदुखीकडे दुर्लक्ष करणं तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. कारण पाटीच्या खालचा भाग दुखणे हे अनेक गंभीर आजारांचे लक्षण असू शकतं. तर हे आजार कोणते याबाबत आता आपण जाणून घेणार आहोत.
मुंबई : बहुतेक लोकांना पाठदुखीचा त्रास असतो. आजकाल फक्त ज्येष्ठ लोकांनाच पाठ दुखीचा त्रास नसतो तर आजकाल तरुणाईला देखील पाठ दुखीची समस्या त्रास देताना दिसते. पाठ दुखीमुळे लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. मग त्यांना झोपताना देखील वेदना होतात किंवा वाकल्यानंतर देखील त्यांना खूप त्रास होतो. काहींना पाठदुखीचा इतका त्रास असतो की त्यांना हालचाल करणं देखील कठीण होऊन जातं.
ज्या लोकांच्या पाठीच्या खालचा भाग दुखत असतो अशा लोकांना ऑस्टियोपोरोसिसची समस्या असू शकते. ऑस्टियोपोरोसिस तुमच्या पाठीच्या खालच्या भागावर परिणाम करते. यामध्ये तुमची हाडे आतून पोकळ होतात त्यामुळे पाठीच्या खालच्या भागात मोठ्या प्रमाणात वेदना होते. तसेच तुमच्या पाठीतील हाडे पोकळ झाल्यामुळे आणखी गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन योग्य तो उपचार घेणे गरजेचे आहे.
डिस्क ही मणक्याच्या हाडांमध्ये उशीप्रमाणे काम करत असते. पण याच डिस्कवर दबाव पडला तर तुम्हाला पाठ दुखीची समस्या निर्माण होऊ शकते. तर डिस्कवर परिणाम झाल्यामुळे तुम्हाला पाठीच्या खालच्या भागात अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तर अशावेळी मणक्याचा सिटीस्कॅन किंवा एक्स-रे काढणे गरजेचे असते आणि डॉक्टरांकडून योग्य तो उपचार घेणे गरजेचे आहे.
बहुतेक लोकांना संधीवाताचा त्रास असतो. संधी-वातामुळे पाठीच्या खालच्या भागात वेदना होतात. तर संधिवातामुळे ज्या लोकांना पाठीच्या खालच्या भागात समस्या निर्माण होतात या स्थितीला स्पाइनल स्टेनोसिस असे म्हणतात. अशावेळी तुम्हाला पाठीच्या खालच्या भागात मोठ्या प्रमाणात त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते.