Mouth Cancers Symptoms : भारतात वेगाने पसरतोय तोंडाचा कॅन्सर, या लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष

भारतात, फुफ्फुसाच्या कर्करोगानंतर बहुतेक लोक तोंडाच्या कॅन्सरला बळी पडतात, त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे धूम्रपान आणि तंबाखूचे सेवन. ओठ, हिरड्या, जीभ, गालाचे आतील अस्तर, तोंडाचा वरचा भाग आणि जीभेखालील तोंडाच्या कोणत्याही भागात तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो.

Mouth Cancers Symptoms : भारतात वेगाने पसरतोय तोंडाचा कॅन्सर, या लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 9:21 AM

नवी दिल्ली : तोंडाचा कर्करोग अथवा कॅन्सर हा भारतातील सर्वात सामान्य कॅन्सरपैकी एक आहे. गेल्या 10 वर्षांत तोंडाच्या कॅन्सरच्या (oral cancer) प्रकरणांमध्ये एक तृतीयांशपेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्यमागचे सर्वात मोठे कारण म्हणजे धूम्रपान (smoking) आणि तंबाखूचे सेवन होय. हा कॅन्सर ओठ, हिरड्या, जीभ, गालांचे आतील अस्तर, तोंडाच्या वरच्या भागासह आणि जीभेखालील तोंडाच्या कोणत्याही भागात विकसित होऊ शकतो. हा भयंकर रोग टाळण्यासाठी, कॅन्सरची लक्षणे (symptoms of cancer) जाणून घेणे आणि शक्य तितक्या लवकर तपासणी करणे खूप महत्वाचे ठरते

तोंडाचा कॅन्सर  हा प्राथमिक अवस्थेत असतानाच त्याचे निदान केले जाऊ शकते. परंतु बहुतेक लोक कॅन्सरच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्याची मोठी किंमत शरीराला चुकवावी लागते. त्यामुळे तोंडाच्या कॅन्सरबाबत जागरुकता बाळगण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हे सुद्धा वाचा

एका संशोधनानुसार, तोंडाचा कॅन्सर होण्यासाठीचे प्रमुख कारण म्हणजे तंबाखूचे सेवन, तो एक प्रमुख घटक ठरतो. गुटखा, जर्दा, खैनी, सिगारेट, बिडी, हुक्का या सर्व गोष्टींचा तंबाखूमध्ये समावेश होतो, हे ट्युमर होण्याचे मुख्य कारण आहे. तरुण आणि वृद्ध दोन्ही वयोगटातील व्यक्ती या व्यसनांना बळी पडतात. तोंडाच्या कॅन्सरशी संबंधित काही चिन्हे आणि लक्षणे दिसून येतात, ज्याकडे कोणीही दुर्लक्ष करू नये.

व्हाईट पॅचेस

हिरड्या, जीभ, टॉन्सिल किंवा तोंडावर लाल किंवा पांढरे जाड डाग दिसू शकतात. याला ल्युकोप्लाकिया म्हणतात. बहुतेक ल्युकोप्लाकिया पॅचेस कॅन्सर नसलेले असतात. मात्र अनेक चट्टे हे कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. हे तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होऊ शकतात. जर कोणाला अशी चिन्हे दिसली तर उशीर न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

वारंवार होणाऱ्या गाठी

जर तुम्हाला तोंडात किंवा लसिका ग्रंथी (गळ्यातील लसिका ग्रंथी) मध्ये कोणत्याही प्रकारची गाठ वाटत असेल तर ते धोकादायक असू शकते. तुमच्या घशात काहीतरी अडकले आहे किंवा घसा दुखत आहे असे सतत जाणवत असेल तर ताबडतोब डॉक्टरांना दाखवून तपासणी करून घ्यावी.

तोंड व चेहरा सुन्न पडणे

कोणत्याही कारणाशिवाय, जर तुमच्या चेहऱ्यावर, तोंडात किंवा मानेमध्ये वेदना होत असतील आणि त्याभोवती सुन्नपणा जाणवत असेल तर ते तोंडाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते.

दात पडणे

कोणत्याही कारणाशिवाय एक किंवा अधिक दात कमकुवत झाला असेल किंवा पडला असेल तर ते कॅन्सरचे लक्षण असू शकते. तसेच तुम्ही एखादा दात काढला असेल आणि तेथील मोकळी जागा अथवा खड्डा भरला नसेल तर अशा वेळीही त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

शस्त्रक्रिया, रेडिएशन आणि केमोथेरपी यासह अनेक मार्गांनी तोंडाच्या कॅन्सरवर उपचार करता येऊ शकतात. कॅन्सरपीडित व्यक्तीचे वय किती आहे, त्याचे आरोग्य आणि त्याची स्थिती कशी आहे यावर उपचार कसे करावेत, हे ठरवले जाते.

Non Stop LIVE Update
बॅग चेकिंगचा मुद्दा तापला,ठाकरेंच्या प्रचारावर बंदी घाला;राणेंची मागणी
बॅग चेकिंगचा मुद्दा तापला,ठाकरेंच्या प्रचारावर बंदी घाला;राणेंची मागणी.
'दादांची मी माफी मागते...', जाहीरपणे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
'दादांची मी माफी मागते...', जाहीरपणे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?.
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?.
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा.
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला.
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका.
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला.
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?.
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या....
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य.