Morning Routine: जीवघेण्या आजारांपासून जर बचाव करायचा असल्यास, आजपासूनच सकाळी ही काही कामं करायलाच हवी!

अनेकदा घरातील ज्येष्ठ नागरिकाकडून तुम्ही ऐकले असेल की कोणत्याही आजाराची सुरुवात ही तोंडाद्वारे होत असते म्हणूनच तोंडाची स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे आहे. नुकतेच एका डेंटिस्टने सांगितले आहे की, नियमितपणे सकाळी उठल्यावर एक काम केल्याने भविष्यात 3 जीवघेण्या आजारांपासून बचाव करता येतो.

Morning Routine: जीवघेण्या आजारांपासून जर बचाव करायचा असल्यास, आजपासूनच सकाळी ही काही कामं करायलाच हवी!
Mouth Flossing
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 10:46 PM

मुंबई : तोंड साफ करणे (Mouth cleaning) आपल्या दैनंदिन दिनचर्या क्रियांमधील एक प्रमुख क्रिया मानली जाते. आपले तोंड स्वच्छ करण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या पद्धती सुद्धा वापरत असतात. ज्यात जीभ ,दात आणि तोंडाची दुर्गंधी दूर केली जाते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सकाळच्या वेळी काही क्रिया केल्याने आपल्याला जीवघेण्या आजारांपासून सुटका मिळू शकते म्हणून सकाळी उठल्यावर आपल्या तोंडाची स्वच्छता आवर्जून करायला पाहिजे तसेच आपल्या तोंडाची काळजी करणे सुद्धा गरजेचे आहे. ‘आस्क द डेंटिस्ट’ या नावाने चॅनल चालवणारे डॉ. मार्क बुरहेन (Dr. Mark Burhenne) यांनी सांगितले आहे की ,जर तुमचे तोंड स्वच्छ नसेल तर तुमचे आरोग्य सुद्धा उत्तम नसते, तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. फ्लॉसिंग (Flossing) लोकांच्या दिनचर्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. फ्लॉसिंग केल्याने आपल्या दातांची तर स्वच्छता होते त्याचबरोबर काही जीवघेण्याआजारांपासून सुद्धा आपल्याला लवकरच मुक्तता मिळू शकते. डॉक्टरांच्या मते फ्लॉसिंग करण्याचे असे काही कारणं असतात जे दातांशिवाय तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा खूपच लाभदायी ठरतात.

फ्लॉसिंग आहे तरी काय?

फ्लॉसिंग ही अशी प्रक्रिया आहे ,ज्यामुळे आपले दात अगदी स्वच्छ होतात. अनेकदा जेव्हा आपण एखादे अन्नपदार्थ सेवन करतो तेव्हा अनेकदा दातांमध्ये अन्नाचे कण अडकून राहतात त्यामुळे आपल्या तोंडात वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया निर्माण होतात. आपल्या तोंडामध्ये जमा झालेले बॅक्टेरिया दूर करण्यासाठी तसेच आपल्या दातांमध्ये अडकलेले अन्नकण बाहेर काढण्यासाठी पातळ धाग्याने दातांची साफसफाई केली जाते या प्रक्रियेलाच फ्लॉसिंग असे म्हटले जाते.

फ्लॉसिंग, मनोभ्रंश (Dementia), हृदय रोग (Heart disease) आणि हिरड्यामध्ये रक्त जमा होणे (Blood clots) आणि प्रजनन क्षमतेला विकसित करण्यास मदत करतो. वर्ष 2019 मध्ये केले गेलेल्या संशोधनानुसार आपल्या तोंडामध्ये अनेकदा सर्वसामान्य स्वरूपामध्ये असलेले अनेक बॅक्टेरिया उपलब्ध असतात. या बॅक्टेरियामुळे आपल्या तोंडाची हानी होते तसेच दातांचे नुकसान सुद्धा भविष्यात होण्याची शक्यता वर्तवली जाते. या कारणामुळे तुम्हाला स्मृती दोष म्हणजेच अल्जाइमर हा आजार सुद्धा होऊ शकतो तसेच हार्वर्ड मेडिकल स्कूल मधील तज्ञ मंडळींचे म्हणणे आहे की हृदय विकारापासून दूर राहण्यासाठी आपल्या तोंडाचे आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे.

फ्लॉसिंग चे फायदे

डॉ. मार्क बुरहेन यांनी सांगितले की केल्या गेलेल्या संशोधनानुसार असे सिद्ध झाले आहे की ज्या लोकांचे ओरल हेल्थ चांगले असते त्यांना आरोग्यसंबंधित समस्या उद्भवत नाही परंतु ज्या लोकांचे ओरल हेल्थ चांगले नसते अशा लोकांना प्रामुख्याने दात दुखणे, दात किडणे, हिरड्यांमध्ये सूज येणे अशा विविध प्रकारच्या समस्या वारंवार सतावत असतात आणि या समस्यांमुळे भविष्यात हृदय संबधित समस्या निर्माण होण्याची शक्यता असते आणि यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो.फ्लॉसिंग सूज आणि सी-रिएक्शन प्रोटीनला कमी करू शकतो ,जे की आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते.

अशा पद्धतीने राखा आपल्या तोंडाची स्वच्छता

आपल्या तोंडाची नियमितपणे स्वच्छता ठेवण्यासाठी आपल्याला ओरल केअर रुटीनला प्राथमिक स्वरूपाचे प्राधान्य द्यायला हवे तसेच नियमितपणे डेंटिस्टकडे जाऊन आपल्या दातांचे, तोंडाचे आरोग्य कशा पद्धतीने चांगले राहील याबद्दल तपासणी सुद्धा करायला हवी. आपल्या तोंडाचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी दिवसभरातून 2 वेळा कमीत कमी 2 मिनिटे ब्रश करायला हवे यासोबतच प्रत्येक 3 महिन्यानंतर आपल्याला ब्रश बदलायला पाहिजे कारण की जास्त वेळ जर आपण जुना ब्रश वापरला तर यामुळे सुद्धा तुम्हाला तोंडाच्या अनेक समस्या उद्भवू शकतील. दोन दातांच्या दरम्यान साफसफाई करताना फ्लॉसिंगचा अवश्य वापर करा. तोंडातील सूक्ष्मजीव, जीवजंतू नष्ट करणारे टूथपेस्ट प्रामुख्याने वापरा तसेच जास्तीत जास्त आयुर्वेदीक टूथ पेस्ट वापरण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या तोंडाची स्वच्छता तर होईलच पण त्याचबरोबर औषधी गुणधर्माने तुम्हाला कोणत्याही प्रकारचे आजार सुद्धा होणार नाहीत. ज्या टूथपेस्टमध्ये जास्त प्रमाणात फ्लोराइड असतात असे टूथपेस्ट अजिबात वापरू नका यामुळे तुमच्या दातांचे नुकसान होऊ शकते आणि परिणामी तोंडाच्या अनेक समस्या भविष्यात उद्भवतील.

टीप : या लेखामध्ये सांगितलेली माहिती सामान्य स्वरूपामध्ये सांगण्यात आलेली आहे तसेच टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपचार व सल्ला देत नाहीये. या लेखातील माहितीचा वापर करण्याआधी तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत असेल तर घरगुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

इतर बातम्या :

Beauty care: चेहऱ्याच्या समस्या पटकन दूर करतं तमालपत्र! कसा करावा उपयोग? जाणून घ्या!

खरंच सीटीस्कॅनमध्ये खराब झालेलं फुफ्फुस दिसत नाही? असं घडल्यास नेमके काय करावं

कोरोनातून बरे झाल्यानंतर पल्मोनरी फायब्रोसिस होऊ शकतो, प्रकार काय आणि उपचार काय?

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.