ब्लॅक फंगसचं रौद्ररुप, आतापर्यंत 7000 रुग्णांचा मृत्यू, AIIMS च्या संचालकांकडून अहवाल सादर,

ब्लॅक फंगसचा संसर्गा झालेल्या रुग्णांपैकी जवळपास 7000 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी दिलीय.

ब्लॅक फंगसचं रौद्ररुप, आतापर्यंत 7000 रुग्णांचा मृत्यू, AIIMS च्या संचालकांकडून अहवाल सादर,
Follow us
| Updated on: May 23, 2021 | 8:42 PM

नवी दिल्ली : भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. काही राज्यांमध्ये दुसऱ्या लाटेचा प्रभाव आता काहीसा कमी होत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. मात्र, कोरोना संसर्गानंतर म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंकस) जीवघेणा आजार ठरत आहे. अनेक राज्यांनी या ब्लॅक फंगस म्हणजेच काळ्या बुरशीच्या संसर्गालाही साथीचा रोग म्हणून जाहीर केलंय. आतापर्यंत देशभरात या आजाराच्या एकूण 8 हजार 848 रुग्णांची नोंद झालीय. धक्कादायक म्हणजे ब्लॅक फंगसचा संसर्गा झालेल्या रुग्णांपैकी जवळपास 7000 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी दिलीय (Mucormycosis Black Fungus cause death of 7 thousand of people in India AIIMS).

ब्लॅक फंगसचे कोणत्या राज्यात किती रुग्ण?

एम्सच्या अहवालातील आकडेवारीनुसार ब्लॅक फंगस संसर्गाचत्या सर्वाधिक रुग्णांची नोंद गुजरातमध्ये झालीय. गुजरातमध्ये आतापर्यंत 2 हजार 280 रुग्ण आढळले आहेत. यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात ब्लॅक फंगसचे 2000 रुग्ण, आंध्र प्रदेशमध्ये 910 रुग्ण, मध्य प्रदेशमध्ये 720 रुग्ण, राजस्थानमध्ये 700 रुग्ण, कर्नाटक 500 रुग्ण, हरियाणात 250 रुग्ण, दिल्लीत 197 रुग्ण, पंजाबमध्ये 95 रुग्ण, छत्तीसगडमध्ये 87, बिहारमध्ये 56 रुग्ण, तामिळनाडू 40, केरळ 36, झारखंड 27, ओडिशा 15, गोवा 12 आणि चंदीगडमध्ये 8 रुग्णांची नोंद झालीय.

असं असलं तरी केंद्र सरकारकडून ब्लॅक फंगसमुळे झालेल्या मृत्यूंबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

काळी बुरशी म्हणजे काय?

कोरोना विषाणूमुळे होणारा हा बुरशीजन्य संसर्ग आहे. कोविड -19 टास्क फोर्सच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जे आधीपासूनच काही आजाराने ग्रस्त आहेत आणि ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत आहे अशा लोकांमध्ये हे सहज पसरते. या लोकांमध्ये संक्रमणाशी लढण्याची क्षमता कमी आहे.

किती धोकादायक आहे काळी बुरशी?

कोरोना कहरात काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव प्राणघातक असल्याचे सिद्ध होत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, योग्य वेळी यावर उपचार न केल्यास दृष्टी जाण्याव्यतिरिक्त रुग्ण मरणी पावला. हे संक्रमण सायनसद्वारे डोळ्याला पकडते. यानंतर, हे शरीरात पसरते. हे टाळण्यासाठी, डॉक्टरांना संक्रमित डोळा किंवा जबडाचा वरचा भाग काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते.

काळी बुरशी शिकार कसे बनवते

आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हवेत पसरलेल्या जंतूंच्या संसर्गामुळे एखादी व्यक्ती बुरशीजन्य संसर्गाचा बळी बनू शकते. रुग्णाच्या त्वचेवरही काळा बुरशीचा विकास होऊ शकतो. त्वचेवर जखम, घासल्यामुळे किंवा जळजळ होण्यामुळे हे शरीरात प्रवेश करू शकते.

काळ्या बुरशीची लक्षणे

  • ताप येणे
  • डोके दुखणे
  • खोकला किंवा श्वास घेण्यात अडथळा
  • डोळे लालसर होणे
  • डोळ्यात वेदना होणे
  • डोळा सूजणे, एक गोष्ट डबल दिसते किंवा दिसायचं बंद होणे
  • चेहऱ्याच्या वेदना, सूज येणे किंवा सुन्न होणे
  • दातदुखी, दात हलणे, अन्न चावण्यास त्रास होणे
  • उलट्या किंवा खोकताना रक्त येणे

काळी बुरशीपासून संरक्षण कसे करावे

  • धुळीच्या ठिकाणी मास्क घाला.
  • माती, खत यासारख्या गोष्टींजवळ जाताना शूज, ग्लोज, फुल स्लीव्ह शर्ट आणि ट्राऊजर घाला.
  • स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.
  • मधुमेह नियंत्रित करा, इम्युनोमोड्युलेटिंग औषधे किंवा स्टिरॉईड्सचा कमी प्रमाणात वापर करा

हेही वाचा :

Black Fungus Mucormycosis Symptoms : काळ्या बुरशीची लक्षणे आणि उपाय काय?

या लोकांसाठी ब्लॅक फंगस अधिक घातक, डोळ्यांची दृष्टी जाते, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

कोरोनाचा विळखा सैल, म्युकरमायकोसिसचा कहर वाढता, मालेगावात ब्लॅक फंगसने तिघांचा बळी

व्हिडीओ पाहा :

Mucormycosis Black Fungus cause death of 7 thousand of people in India AIIMS

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.