100 रुपयात कोरोना चाचणी 15 मिनिटात रिपोर्ट, मुंबईच्या स्टार्टअपकडून नवं किट विकसित

सद्यस्थितीत आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजेन टेस्ट या दोन पद्धतीद्वारे कोरोना चाचणी केली जातेय. covid test kit

100 रुपयात कोरोना चाचणी 15 मिनिटात रिपोर्ट, मुंबईच्या स्टार्टअपकडून नवं किट विकसित
corona test
Follow us
| Updated on: May 16, 2021 | 1:57 PM

मुंबई: भारत सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करतोय. सध्या ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, अशा स्थितीमध्ये कोरोना चाचण्या वाढवणं महत्वाचं मानलं जात आहे. सद्यस्थितीत आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजेन टेस्ट या दोन पद्धतीद्वारे कोरोना चाचणी केली जातेय. आता यामध्ये आणखी एका किफायतशीर कोरोना चाचणी किटची भर पडणार आहे. मुंबईतील पतंजली फार्मा संस्थेनं भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या डीएसटीच्या मदतीनं हे किफायतशीर किट तयार केलं आहे. या किटद्वारे चाचणी करण्यासाठी येणारा खर्च केवळ 100 रुपये असून 15 मिनिटामध्ये याचा अहवाल प्राप्त होणार आहे. (Mumbai based start up Patanjali Pharma developed Rapid Antigen covid test kit only in 100 rupees)

100 रुपये खर्च, 15 मिनिटात रिपोर्ट

मुंबईमधील पतंजली फार्मा कंपनीने हे किट बनवले आहे. यासाठी त्यांना आयआयटी बॉम्बेची देखील मदत झाली आहे. किटद्वारे चाचणी करण्यासाठी येणारा खर्च केवळ 100 रुपये असून 15 मिनिटामध्ये याचा अहवाल प्राप्त होणार आहे. यामुळे कोरोना चाचणी करण्यासाठी लागणारा खर्च देखील कमी होणार आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागानं सेंटर फॉर ऑगमेंटिंग वॉर विथ कोविड 19 हेल्थ क्रायसिस जुलै 2020 मध्ये कोरोना विषाणू संसर्ग झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी किट तयार करण्यासाठी स्टार्टअपला पाठिंबा दिला आहे.

8 ते 9 महिन्यात किट विकसित

पतंजलि फार्माचे प्रमुख डॉ. विनय सैनी यांनी एसआईएनई, आईआईटी मुंबई यांच्या सहकार्यानं 8-9 महिन्यामंध्ये संशोधन आणि प्रयोगशाळांमध्ये चाचणी करुन किट तयार केल्याचं सांगतिलं. पतंजली फार्मानं सध्या या किटच्या लायसन्ससाठी अर्ज केला आहे. याशिवाय विविध कोविड सेंटरमध्येही याच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. विनय सैनी यांनी पतंजली फार्मा स्टार्टअपनं विकसित केलेल्या किटची चाणी मुंबईतील विविध कोविड सेंटर केल्याची माहिती दिली.

पुढील महिन्यापासून टेस्टिंगला सुरुवात

पतंजली फार्मा या स्टार्टअपनं पुढील म्हणजेच जून महिन्यापासून रॅपिड अँटिजेन टेस्ट त्यांनी विकसित केलेल्या किटद्वारे करण्यात येतील, असं सांगितलं.रॅपिड अँटिजेन टेस्टद्वारे 10 ते 15 मिनिटात कोरोना झाला आहे की नाही हे समजेल. ग्रामीण भागात ज्या ठिकाणी डॉक्टर, पॅथोलॉजी लॅब, डायग्नोस्टिक लॅब उपलब्ध नाहीत, अशा ठिकाणी या किटचा वापर महत्वपूर्ण ठरेल, असंही विनय सैनी यांनी सांगतिलं.

संबंधित बातम्या:

Post COVID Impact | RTPCR चाचणी निगेटीव्ह तरीही रुग्णाला कोरोना, फुफ्फुस आणि यकृतावर मोठा परिणाम

संपूर्ण राज्यात कोविड चाचणीच्या फिरत्या प्रयोगशाळा: मुख्यमंत्री

(Mumbai based start up Patanjali Pharma developed Rapid Antigen covid test kit only in 100 rupees)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.