National Nutrition Week : मुलांच्या आहारात करा ‘ या ‘ 4 पोषक तत्वांचा समावेश ; उद्भवणार नाहीत आरोग्याच्या समस्या !

मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी त्यांच्या आहारात मुबलक पोषक तत्वं असणाऱ्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे.

National Nutrition Week : मुलांच्या आहारात करा ' या ' 4 पोषक तत्वांचा समावेश ; उद्भवणार नाहीत आरोग्याच्या समस्या !
पोषक आहार
Follow us
| Updated on: Sep 01, 2022 | 5:09 PM

मुंबई : दरवर्षी 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण सप्ताह (National Nutrition Week) साजरा केला जातो. शारीरिक व मानसिक आरोग्य (Physical and Mental Health)उत्तम राखण्यासाठी पोषणावर भर देणे, हेच या संपूर्ण सप्ताहाचे उद्दिष्ट आहे. तसेच फास्ट फूड किंवा जंक फूड (fast food / junk down) हे चवीला चांगले असले तरी त्यातून पोषण मिळत नसल्याने ते आरोग्यासाठी बिलकुल चांगले नसते, हे समजावे हाही यामागचा उद्देश आहे. या लेखात त्या पोषक तत्वांचा आणि खाद्य पदार्थांचा (Healthy Food) उल्लेख करण्यात आला आहे, जे विशेषत: लहान मुलांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी (Children’s Health) चांगले आहेत आणि त्यांचे आरोग्य निरोगी व तंदुरुस्त ठेवतात.

मुलांच्या आरोग्यासाठी पोषक आहार –

प्रथिने आहेत गरजेची – वाढीच्या वयातील मुलांसाठी प्रोटीन म्हणजे प्रथिने सर्वात महत्वाचे पोषक तत्व ठरते. हे शरीराच्या अंतर्गत व बाह्य संरक्षणासाठी आवश्यक असते. तसेच शरीर मजबूत करण्याचे कार्यही करते. सीफूड, ड्रायफ्रुटस म्हणजेच सुका मेवा, बीन्स, मटार, सोयाबीन आणि बऱ्याच बियांमध्ये प्रोटीन मुबलक प्रमाणात असते. या पदार्थांचा मुलांच्या आहारात समावेश करावा.

व्हिटॅमिन बी – शरीरासाठी आवश्यक असलेल्या 13 जीवनसत्वांपैकी, जीवनसत्वांतील 8 जीवनसत्वांचा समूह हा व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सने बनलेला असतो. विशेषत: लहान मुलांसाठी हे जीवसत्व अत्यंत महत्वाचे आहे. हे शरीरातील स्नायूंसाठी चांगले असते आणि लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये या जीवनसत्वाचा महत्वपूर्ण भाग असतो. या जीवनसत्त्वाची कमतरता असेल तर ती भरून काढण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, बटाटे व सुकामेवा इत्यादी पदार्थ खाता येऊ शकतात.

धान्याचा समावेश करा – अनेक आवश्यक पोषक घटकांची पूर्तता करण्यासाठी मुलांना धान्य खायला देणे आवश्यक आहे. केवळ गहूच नव्हे तर तपकिरी किंवा जंगली तांदूळ, ओटमील, किनोआ आणि कॉर्न इत्यादी पदार्थांचा आहारात समावेश करावा. तसेच हेही लक्षात ठेवा की मुलांना खूप जास्त रिफाइंड धान्य म्हणजे ब्रेड किंवा पास्ता हे खाण्यास देऊ नये.

दुग्धजन्य पदार्थ – कॅल्शिअमचा प्रमुख स्त्रोत असलेले दुग्धजन्य पदार्थ मुलांना दिले जातात. मात्र त्याशिवाय त्यामध्ये इतर पोषक तत्वेही मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे मुलांना दूध, दही आणि चीज खाण्यास द्यावे. मात्र हे पदार्थ लो फॅट आणि फॅट फ्री असतील तर आणखीनच उत्तम ठरेल.

( टीप- या आर्टिकलमध्ये सुचवण्यात आलेले उपाय व देण्यात आलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. )

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.