Health : नवरात्रीच्या उपवासात गॅस, एसिडिटीपासून वाचण्यासाठी फक्त करा हे एक काम, जाणून घ्या!
Navratra Health News : उपवासाच्या वेळी पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका हवी असेल तर काही उपाय करणे गरजेचे आहे. तर या उपायांबाबत जाणून घ्या. जेणेकरून तुम्हाला गॅस, ऍसिडिटी सारख्या समस्यांचा सामना करावा लागणार नाही.
मुंबई : सध्या नवरात्रीचे दिवस सुरू आहेत. नवरात्रीचे दिवसांमध्ये बहुतेक लोक उपवास करतात. तर उपवास करताना काही लोक निरंकार उपवास करतात किंवा काही लोक फळ किंवा खिचडी खातात यामुळे बहुतेक लोकांना गॅस, ऍसिडिटीची समस्या सतावते. कारण खाण्याच्या सवयीमध्ये अचानक बदल झाल्यामुळे तुमच्या पचनशक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे तुमची पचनक्रिया मंदावते मग तुम्हाला जळजळ, ऍसिडिटी, गॅसची समस्या निर्माण होते. तर अशावेळी काळजी घेणं खूप गरजेचं असतं.
उपवासाच्या दिवसांमध्ये गॅस किंवा ऍसिडिटी पासून बचाव करण्यासाठी सकाळी पुदिन्याचे पाने चावून खावी. पुदिन्याची पाने खाल्ल्यामुळे तुमचा उपवास मोडणार नाही तसेच तुमची ऍसिडिटी आणि गॅस पासून देखील सुटका होण्यास मदत होईल. तसेच तुम्ही पुदिन्याचा पानांचा रस देखील पिऊ शकता यामुळे तुमच्या पोटात थंडावा मिळण्यास मदत होते.
उपवासाच्या दिवसांमध्ये नारळ पिणे फायदेशीर ठरते. नारळ पाणी पिल्यामुळे तुमची गॅस आणि ऍसिडिटी पासून सुटका होण्यास मदत होते. नारळाचे पाणी पिल्यामुळे तुमच्या पोटातील आम्लयुक्त पीएच संतुलित ठेवण्यास मदत होते. तसेच नारळाचे पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची क्षमता वाढते आणि आपली पचनक्रिया देखील सुधारते त्यामुळे आपल्याला गॅसची समस्या होत नाही.
उपवासाच्या दिवसांमध्ये चहा किंवा कॉफीचे सेवन जास्त प्रमाणात करू नये. कारण चहा किंवा कॉफीचे सेवन जास्त प्रमाण केल्यामुळे गॅस, एसिडिटीची समस्या निर्माण होते. तसेच पित्ताचा त्रास देखील वाढतो. त्यामुळे उपवासाच्या दिवसांमध्ये चहा, कॉफी जास्त प्रमाणात पिऊ नये, दिवसातून दोन वेळाच प्यावी जेणेकरून तुम्हाला पित्ताचा त्रास होणार नाही.