Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या 14 हजारांवर, सक्रिय रुग्णसंख्येतही मोठी घट

| Updated on: Oct 12, 2021 | 10:00 AM

गेल्या 24 तासात भारतात 14 हजार 313 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 181 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 26 हजार 579 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या 14 हजारांवर, सक्रिय रुग्णसंख्येतही मोठी घट
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 4 हजारांनी घट झाली. कालच्या दिवसात देशात 14 हजार 313 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 181 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. देशातील सक्रिया कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या सव्वा दोन लाखांच्या आत आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 14 हजार 313 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 181 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 26 हजार 579 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 39 लाख 85 हजार 920 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 33 लाख 20 हजार 57 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 50 हजार 963 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 2 लाख 14 हजार 900 इतके सध्याच्या घडीला सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 95 कोटी 89 लाख 78 हजार 49 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 14,313

देशात 24 तासात डिस्चार्ज – 26,579

देशात 24 तासात मृत्यू – 181

एकूण रूग्ण – 3,39,85,920

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 2,14,900

एकूण डिस्चार्ज (रिकव्हरी) – 3,33,20,057

एकूण मृत्यू  – 4,50,963

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 95,89,78,049

गेल्या 24 तासातील लसीकरण – 65,86,092

देशात कालच्या दिवसात आढळलेल्या 14 हजार 313 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी एकट्या केरळामध्ये 6 हजार 996 रुग्ण सापडले आहेत. तर 181 कोरोनाबळींपैकी केरळमधील 84 जणांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या :

कोरोनाची तिसरी लाट ‘या’ महिन्यांत शिखर गाठेल; शास्त्रज्ञांनी वर्तवला अंदाज