फ्रेंच फ्राइज खाण्याची सवय ठरू शकते डिप्रेशनसाठी कारणीभूत ? जाणून घ्या सत्य

Fried Food : जवळपास संपूर्ण जगात तळलेले अन्नपदार्थ मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाते आणि ते सर्वांना खूप आवडतेही. पण हे तळलेले अन्न नैराश्य म्हणजेच डिप्रेशनसाठी कारणीभूत ठरू शकते, हे तुम्हाला माहीत आहे का ?

फ्रेंच फ्राइज खाण्याची सवय ठरू शकते डिप्रेशनसाठी कारणीभूत ? जाणून घ्या सत्य
फ्रेंच फ्राईजमुळे डिप्रेशनचा धोका ?
Follow us
| Updated on: Apr 28, 2023 | 9:22 AM

नवी दिल्ली : समोसा, कचोरी, वडा पाव, फ्रेंच फ्राइज, चिप्स असे तळलेले आणि चटपटीत पदार्थ (fried food) खायला कोणाला आवडन नाही ? जवळपास संपूर्ण जगातील लोकांना तळलेले पदार्थ खायला अतिशय आवडतं. जीभेलाही ते छान लागतंच की ! पण फ्रेंच फ्राईज (french fries) सारखे पदार्थ खायला चवदार वाटत असले तरी या आरामदायी पदार्थांचा आपल्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. चीनमधील हांगझोऊ येथील एका संशोधन पथकाच्या मते, जे लोक नियमितपणे तळलेले अन्न, विशेषत: तळलेले बटाटे खातात त्यांच्यामध्ये अँक्झायटीचा (anxiety) धोका 12 टक्क्यांनी आणि नैराश्य अर्थात डिप्रेशनचा (depression) धोका 7 टक्क्यांनी वाढतो. याचा सर्वाधिक धोका तरुणांमध्ये दिसून आला आहे. तसेच तळलेले अन्न खाल्ल्याने लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि आरोग्याच्या इतर समस्याही उद्भवू शकतात.

तथापि, पोषणाचा अभ्यास करणार्‍या तज्ञांनी सांगितले की हे परिणाम प्राथमिक आहेत. आणि याचा अर्थ असा नाही की तळलेले अन्न मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण करत आहे.

अभ्यासात काय आढळले ?

या अभ्यासात सुमारे 1.40 लाख लोकांचा समावेश करण्यात आला आणि सुमारे 11.3 वर्षे त्यांचा अभ्यास करण्यात आला. पहिल्या दोन वर्षांत नैराश्याचा अनुभव घेतलेल्या लोकांना वगळल्यानंतर, तळलेले अन्न खाणाऱ्यांमध्ये 8,294 चिंता (अँक्झायटी) आणि 12,735 उदासीनतेची प्रकरणे आढळून आली. त्याच वेळी, विशेषतः तळलेले बटाटे खाणाऱ्या लोकांमध्ये नैराश्याचा धोका 2 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले.

अँक्झायटी आणि नैराश्याची लक्षणे असलेले लोक स्वत:ची काळजी घेण्याची पद्धत म्हणून अशा आरामदायी पदार्थांकडे वळू शकतात. मागील संशोधनानुसार, अनहेल्दी पदार्थ आणि खराब पोषण एखाद्याचा मूड खराब करू शकतो, ज्यामुळे मानसिक आरोग्यामध्ये थोडासा बिघाड होऊ शकतो.

तळलेल्या पदार्थांपासून कसला धोका ?

नवीन अभ्यासात, संशोधकांनी नोंदवले आहे की तळण्याच्या प्रक्रियेत (विशेषत: तळलेल्या बटाट्यांमध्ये) तयार होणारे ॲक्रिलामाइड हे रसायन चिंता आणि नैराश्याच्या उच्च जोखमीसाठी जबाबदार आहे.

इतर आजारांचाही असतो धोका

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तळलेले अन्न जास्त प्रमाणात खाल्ल्याने उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉल पातळीसारखे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. तळलेल्या अन्नामुळे टाइप-2 मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता वाढू शकते.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.