नववर्ष आरोग्यदायी जाण्यासाठी ‘या’ सवयी पाळा, चिरकाळ निरोगी राहा

2025 सुरू होण्यास अवघे काही दिवस उरलेले आहे. अशा वेळी लोक वेगवेगळ्या प्रकारचे संकल्प करत असतात. ज्यामुळे त्यांना आयुष्यात पुढे जाण्यास आणि निरोगी राहण्यास मदत होते. तुम्ही नवीन वर्षाच्या हे संकल्प करून निरोगी आणि तंदुरुस्त राहू शकतात.

नववर्ष आरोग्यदायी जाण्यासाठी 'या' सवयी पाळा, चिरकाळ निरोगी राहा
Follow us
| Updated on: Dec 17, 2024 | 3:17 PM

२०२४ या वर्षाचा शेवटच्या महिन्याचे काही दिवस राहिले असून आता काही दिवसांनी नवीन वर्षाचे आगमन होणार आहे. अशा वेळी अनेक जण आपल्या काही सवयी बदलण्याचा किंवा नव्या सवयी आत्मसात करण्याचा संकल्प करतात, ज्याला नववर्षाचा संकल्प म्हणतात. प्रत्येकजण आपापल्या जीवनशैलीनुसार आणि गरजेनुसार संकल्प करत असतात. त्याचबरोबर काही चांगल्या सवयी अंगिकारण्याचा संकल्प अनेकजण घेतात. विशेषत: तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी, कारण काही लोक निरोगी खाण्याचा किंवा वजन कमी करण्याचा संकल्प करतात.

चांगल्या सवयी आणि जीवनशैलीचा अवलंब केल्याने आपण केवळ मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी राहत नाही, तर सकारात्मक जीवनशैलीचा ही अवलंब करतो. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जर आपण काही खास सवयी अंगिकारल्या तर त्या आपल्या वैयक्तिक आयुष्यासोबतच आपल्याला फिट आणि निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. तर तुम्ही सुद्धा नवीन वर्षाच्या सुरुवातीला या सवयीचा अवलंब करू शकता.

संतुलित आहार

आपल्या सर्वांना माहित आहे की निरोगी जीवनासाठी संतुलित आहार घेणे अत्यंत गरजेचे आहे. प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, फॅट, जीवनसत्त्वे आणि खनिजे यासारख्या सर्व पौष्टिक पदार्थांचा आपल्या आहारात समावेश केला पाहिजे. जेणेकरून शरीराला सर्व प्रकारची पोषक घटक मिळतील. ताजी फळे, हिरव्या भाज्या, धान्य, कडधान्ये आणि नटस यांचा आहारात समावेश करा. तसेच जंक फूड, जास्त मिठाई आणि जेवणात जास्त मीठ खाणे टाळावे. शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि शरीरातील सर्व अवयवांचे योग्य प्रकारे कार्य करण्यासाठी योग्य पोषण आवश्यक आहे. २०२५ मध्ये ही सवय अंगीकारा आणि तुमचा आहार सुधारण्याचा प्रयत्न करा.

हे सुद्धा वाचा

नियमित व्यायाम करा

निरोगी शरीरासाठी शारीरिक व्यायाम खूप महत्वाचा आहे. हे केवळ शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठीच नाही तर मानसिक ताण कमी करण्यास देखील व्यायाम उपयुक्त आहे. त्यामुळे २०२५ मध्ये नियमित व्यायामाची सवय लावा. दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम करा. यामध्ये तुम्ही रनिंग किंवा सायकलिंग, योगा किंवा एरोबिक्स सारखे कार्डिओ करू शकता. वजन कमी करण्यासाठी व्यायाम करायचा विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

पिण्याचे पाणी

शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी तसेच त्वचेवरील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी नियमित पाणी पित रहा. तसेच योग्य आहारानंतर पचन चांगले होण्यासाठी आणि शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी पाणी पिणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे दररोज किमान २ लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाची पाण्याची गरज त्यांच्या शरीरानुसार वेगवेगळी असते, त्यामुळे आपल्या शरीराच्या गरजेनुसार पाणी प्या.

झोप

झोपेचा आपल्या आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. जेव्हा तुम्ही पुरेशी झोप घेत नाही तेव्हा मूड बदलणे, चिडचिड किंवा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दररोज ७-८ तास झोप घ्या. आजकाल लोक रात्रभर जागे राहून मोबाईल वापरतात, मग रात्री उशीरा झोपतात आणि सकाळी लवकर उठतात, ज्यामुळे झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे रात्री वेळेवर झोपण्याची आणि सकाळी वेळेवर उठण्याची सवय लावा.

वेळेवर खाणे

आपण काय खातो तसेच कोणत्या वेळी काय खातो हे देखील खूप महत्वाचे आहे. योग्य वेळ आणि प्रमाणात आहार घेतल्यास पचनसंस्था अधिक चांगल्या प्रकारे कार्य करते आणि शरीरातील ऊर्जा राखण्यास मदत होते. त्यामुळे रोज ठराविक वेळेत जेवण करण्याचा प्रयत्न करा आणि रात्री उशिरापर्यंत जेवण करणे टाळा.

स्ट्रेस मॅनेजमेंट

आजच्या धावपळीच्या जीवनात ताण तणाव हे खूप सामान्य झाले आहे, परंतु त्याचा शरीर आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. तणावामुळे मानसिक थकवा, अस्वस्थता आणि शारीरिक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे ताणतणावावर नियंत्रण ठेवा. कारण नकारात्मक विचारांमुळेही तणाव निर्माण होऊ शकतो. यासाठी तुम्ही मेडिटेशन, योगा आणि अनेक प्रकारच्या स्ट्रेस मॅनेजमेंट तंत्राचा अवलंब करू शकता. याशिवाय कामाचा ताण असेल तर वेळोवेळी विश्रांती घेऊन आपल्या छंदात सहभागी व्हा किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला शांती आणि विश्रांती मिळेल अशा ठिकाणी फिरायला जा. त्यासोबत सकारात्मक विचारांचा अवलंब करा.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.