Health News : दारु न पिणाऱ्यांनाही असतो लिव्हर खराब होण्याचा धोका, नेमकं काय आहे कारण?
फक्त दारू पिणाऱ्यांच्याच शरीराचं नुकसान होत नाही तर सध्याच्या काळात दारू न पिणाऱ्यांच्याही शरीराचं नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. ते कसं असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल
Health News : दारूला अनेकांच्या जीवनातील टेन्शनची मात्रा म्हटलं जातं. तसंच प्रत्येक व्यक्तीला माहीत असतं की दारूचे सेवन केल्याने शरीराचे नुकसान होते. पण तरीही दारू पिणाऱ्यांची काही कमी नाही. मग काहीही होवो दारू पिणारे पितातच. तुम्ही कुठेही बाहेर गेलात तर तुम्हाला भरपूर लोक दारू पिऊन पडलेले दिसतीलच. पण तुम्हाला माहितीये का की, फक्त दारू पिणाऱ्यांच्याच शरीराचं नुकसान होत नाही तर सध्याच्या काळात दारू न पिणाऱ्यांच्याही शरीराचं नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. ते कसं असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल, तर याबाबत आपण जाणून घ्या.
सध्याच्या काळात तुम्ही दारूचे सेवन न करताही लिव्हर संबंधित आजारांना बळी पडू शकता. याबाबत एका नवीन संशोधनात समोर आले आहे. संशोधनानुसार, आत्ताच्या खराब जीवनशैली आणि वाईट सवयींमुळे तुम्ही लिव्हरशी संबंधित आजारांना बळी पडू शकता. आजच्या धावपळीच्या जगात लोक त्यांच्या आरोग्याची फारशी काळजी घेत नाहीत. त्यामुळे आजकाल अनेक लोक हे लिव्हरशी निगडित आजारांचा सामना करताना दिसत आहेत.
बहुतेक लोक फास्टफूडवर ताव मारताना मोठ्या प्रमाणात दिसतात. त्यामुळे अशा लोकांना लिव्हरशी संबंधित आजारांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज, हिपॅटायटीस बी, हिपॅटायटीस ए, लिव्हर कॅन्सर आणि लिव्हर सिरोसिस अशा अनेक आजारांचा समावेश आहे.
सध्याच्या खराब आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक लोक मोठ्या आजारांचा सामना करताना दिसतात. अनेक लोक बाहेर फिरायला गेल्यावर किंवा कामाला जाताना बाहेरचे पदार्थ खातातच. त्यामुळे आजारही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
लिव्हर हा शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. त्यामुळे लिव्हरला हेल्दी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी निरोगी जीवनशैलीचे पालन करणे आवश्यक आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या सवयींमध्ये काही बदल करा जेणेकरून तुम्ही निरोगी राहू शकाल.
तुमचे लिव्हर हेल्दी ठेवायचे असेल तर नियमित व्यायाम करा. दररोज भरपूर पाणी प्या. तसेच बाहेरील अनहेल्दी ड्रींक्स पिणं टाळा. कारण ते आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते. त्याचबरोबर एकाच ठिकाणी जास्त वेळ बसू नये. यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे शरीर नेहमी ॲक्टीव्ह ठेवा. निरोगी राहायचं असेल तर निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा. त्यामुळे तुम्ही फक्त लिव्हरशी संबंधित आजारांपासूनच नाही तर इतर अनेक गंभीर आजारांपासूनही स्वतःचा बचाव करू शकाल. त्यामुळे दररोज नियमित व्यायामासोबत संतुलित आहार घ्या.
*disclaimer : वरील दिलेली सर्व माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित असून Tv9 मराठी याची पुष्ठी करत नाही.*