Health : तुमच्या ‘या’ एका वाईट सवयीमुळे येऊ शकतो हृदयविकाराचा झटका
हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलेलं दिसत आहे. यामध्ये तरूणांचाही समावेश असल्याचं पाहायला मिळत आहे. आरोग्याकडे दुर्लक्षित करण्यामुळे कोणताही आजार उद्धवू शकतो. मात्र एक वाईट सवय ज्यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
मुंबई : अनेकांना ब्रश करण्याचा कंटाळा असतो, दिवसातून दोनवेळा दात घासायला हवेत. नियमितपणे किमान एकदातरी दात हे साफ करण गरजेचं आहे. ब्रश करण्याचा कंटाळा केल्याने तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही उद्धवू शकतो. यासंदर्भात नेचर या नियतकालीकेत प्रकाशित केलेल्या अभ्यासात समोर आलं आहे
जे दिवसातून दोनदा दात घासततात त्यांच्या तुलनेत जे रुग्ण दिवसातून दोनदा दात घासत नाहीत (किंवा नियमित दात घासत नाहीत) यांच्यामध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी मृत्यूचे प्रमाण अधिक होते. दातांची स्वच्छता ही नक्कीच एक चांगली सवय आहे आहे, पण हृदयविकाराच्या झटक्याचा आणि दात न घासण्याचा नेमका संबंध काय हे जाणून घ्या.दातांच्या अस्वच्छतेमुळे आरोग्यावर होतात दुष्परिणाम
1. नियमित दात न घासल्यास दात किडणे तसेच दातांचे नुकसान होऊ शकते. मौखिक आरोग्य बिघडल्यामुळे अपुरे पोषण होते आणि आरोग्यासंबंधीत समस्या बळावतात. 2. नियमित ब्रश न केल्याने आतड्यांमधील चांगल्या तसेच वाईट बॅक्टेरियाचे संतुलन बिघडू शकते. यामुळे एथेरोस्क्लेरोसिस आणि हृदयविकारांसारख्या समस्या उद्भवू शकतात. 3. क्रॉनिक पीरियडॉन्टल (हिरड्या आणि दात) संक्रमण होऊ शकते. या त्यामुळे होणारी जळजळ हे कोलेस्टेरॉलयुक्त प्लेक्स फुटण्यास कारणीभूत ठरतात आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
आतड्यातील बॅक्टेरियाचे असंतुलन तसेच शरीरातील क्रोनिक इन्फ्लॅमेशन हे दिवसातून दोनदा ब्रश न करणार्या रूग्णांमध्ये ह्रदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूचे मुख्य कारण ठरते.
हिरड्यांच्या आजारांमुळे हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी डॉ. कौशल छत्रपती, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट यांनी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.
1. दिवसातून किमान दोनदा ब्रश करा. सकाळी, रात्री विशेषतः जेवल्यानंतर ब्रश करायला विसरु नका. 2. दात किडणे तसेच हिरड्यांच्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका. 3. वर्षातून किमान एकदा दंतचिकीत्सकांकडून तुमच्या दातांची तपासणी करा आणि दात स्वच्छ करा. 4. इलेक्ट्रिक टूथब्रशचा वापर करा जे तुमचे दात स्वच्छ करण्याचे काम अधिक सुलभतेने करतील. 5. दिवसातून एकदा तरी फ्लॉसचा वापर करा.आपल्या मौखिक स्वच्छतेला महत्त्व द्यायला विसरु नका.