Mouth Cancer : फक्त गुटखा-सिगारेट पिऊन नव्हे, या कारणांमुळेही तुम्हाला होऊ शकतो तोंडाचा कॅन्सर
तोंडाचा कॅन्सर फक्त मद्यपान केल्याने, गुटखा खाल्ल्याने किंवा सिगारेट प्यायल्यामुळे होतो, असा समज लोकांमध्ये आहे, मात्र तसे नाही. तोंडाचा कॅन्सर होण्याची इतरही कारणे असू शकतात.
नवी दिल्ली : एप्रिल महिना हा तोंडाचा कर्करोग जनजागृती (mouth cancer awareness month) महिना म्हणूनही साजरा केला जातो. या जनजागृती मोहिमेद्वारे लोकांना सांगितले जाते की त्यांनी तोंडाच्या कर्करोगाबाबत जागरुकता (cancer awareness) बाळगावी. काही गोष्टींची नीट काळजी घेतल्यास ते या गंभीर आजारापासून दूर राहू शकतील. बहुतेक प्रकरणांमध्ये, तोंडाचा कर्करोग पुरुषांमध्ये होतो. भारतातील बहुतांश पुरुषांना सिगारेट (smoking) किंवा गुटख्याचे व्यसन आहे आणि त्यामुळेच देशातील पुरुषांमध्ये हा कर्करोग सर्वात जास्त आहे. एका अहवालानुसार, देशात दरवर्षी सुमारे 1 लाख तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांची नोंद होते.
तोंडाचा कॅन्सर फक्त मद्यपान केल्याने, गुटखा खाल्ल्याने किंवा सिगारेट प्यायल्यामुळे होतो, असा समज लोकांमध्ये आहे, मात्र तसे नाही. तोंडाचा कॅन्सर होण्याची इतरही कारणे असू शकतात. ती कोणती हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
लठ्ठपणा किंवा अधिक वजन
कॅन्सर कधी आणि का होतो हा मोठा प्रश्न आहे. जेव्हा आपल्या शरीरात जास्त पेशी तयार होतात तेव्हा त्या अनियंत्रित होतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ज्यांचे वजन जास्त असते, त्यांच्या पेशींची वेगाने वाढ होते. त्यामुळे अशा लोकांना सर्व प्रकारचे कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. विविध प्रकारची हार्मोन्स तयार होणे रोखायचे असेल तर आजपासून निरोगी दिनचर्या पाळणे सुरू करा. आणि वजन जास्त असेल तर ते कमी करण्याचा प्रयत्न करा.
पोषक तत्वांचा अभाव
वजन कमी केल्यामुळे किंवा बाहेरचे अन्न खाल्ल्याने शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासते. या प्रकारच्या चुकीमुळे गंभीर आजारांना जन्म मिळतो, त्यापैकी एक म्हणजे तोंडाचा कर्करोग. निरोगी राहणे चांगले आहे, परंतु त्याच्या नावाखाली पोषक घटकांपासून अंतर ठेवणे देखील चुकीचे आहे. सकस, पौष्टिक आहार, भरपूर पाणी पिणे आणि चांगली दिनचर्या राखणे, यामुळे ही कमतरता दूर करता येते.
माऊथवॉश
बदलत्या जगात लोक अत्याधुनिक पद्धतीने स्वतःची काळजी घेतात. विशेषत: शहरांमध्ये अशा पद्धती अवलंबल्या जात आहेत, ज्यांचे फायदे कमी आणि तोटे जास्त आहेत. यापैकी एक म्हणजे माउथवॉशचा वापर. त्यामध्ये अनेक केमिकल्स आणि अल्कोहोल असते ज्यामुळे तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. स्प्रे माउथवॉश हे आपलं सर्वात जास्त नुकसान करतात. त्यामुळे कर्करोगाची जोखीम टाळायची असेल तर माऊथवॉशचा वापर न करणेच इष्ट आहे. योग्य काळजी घेतल्यास हा आजार टाळता येऊ शकतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपाय करण्याआधी विषयाशी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)