तुम्हाला मधुमेह असेल आणि साखरेची पातळी वाढत असेल तर इकडे लक्ष द्या; ही एक गोष्ट खाल्ल्याने शुगर लेव्हल कमी होणार

मुंबईः ज्यांना मधुमेहाचा (Diabetes) त्रास असेल तर अशा रुग्णांसाठी अन्नाची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठीच मधुमेह असता अशा रुग्णांना कोणते अन्न वरदान मानले जाते हे ही महत्वाचे असते. मधुमेह ही एक चयापचयाची प्रक्रिया आहे, त्याचा परिणाम रक्तातील साखरेवर होतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळीही (Blood Sugar Levels) मोठ्या प्रमाणात वाढते. रक्तातील साखरेची पातळी वाढत राहिली […]

तुम्हाला मधुमेह असेल आणि साखरेची पातळी वाढत असेल तर इकडे लक्ष द्या; ही एक गोष्ट खाल्ल्याने शुगर लेव्हल कमी होणार
रक्तातील साखरेची पातळी वाढत राहिली तर आधी आहाराची काळजी घ्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 1:55 PM

मुंबईः ज्यांना मधुमेहाचा (Diabetes) त्रास असेल तर अशा रुग्णांसाठी अन्नाची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठीच मधुमेह असता अशा रुग्णांना कोणते अन्न वरदान मानले जाते हे ही महत्वाचे असते. मधुमेह ही एक चयापचयाची प्रक्रिया आहे, त्याचा परिणाम रक्तातील साखरेवर होतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळीही (Blood Sugar Levels) मोठ्या प्रमाणात वाढते. रक्तातील साखरेची पातळी वाढत राहिली तर आहाराची काळजी घेणे महत्वाचे असते. तुम्ही किती कार्बोहायड्रेटयुक्त अन्न खात आहात याची विशेष काळजी घेणे महत्वाचे असते. कारण कार्बोहायड्रेट्सचा थेट रक्तातील साखरेवर परिणाम होतो.

रक्तातील ग्लुकोजची पातळी समप्रमाणात ठेवण्यासाठी असे अन्न खाणे आवश्यक आहे. ज्यामध्ये फायबर आणि पोषक तत्वे जास्त आहेत परंतु अस्वास्थ्यकर चरबी आणि साखर कमी आहे. ओट्स हे एक असेच अन्न आहे जे मधुमेह असणाऱ्यांसाठीही खाण्यास योग्य मानले जाते. ओट्सचे (Oats) जाडे भरडे पीठ किंवा ओट्स हे दोन्ही पदार्थ आहेत जे मधुमेह असणारी व्यक्ती कधीही मुक्तपणे खाऊ शकते.

कॅलरीज खूप कमी

ओट्स मध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि कॅलरीज खूप कमी असतात. यामुळे शरीरात हळूहळू साखर किंवा ग्लुकोज सोडले जाते, त्यामुळे साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता जवळपास नगण्य असते. 100 ग्रॅम ओट्समध्ये 68 कॅलरीज आणि 21 ग्रॅम फायबर आढळतात.

पचनासाठीही उत्तम

याशिवाय, हे खाण्यासासाठीही खूप सोपे आहे, आणि ते विविध प्रकारे सेवन केले जाऊ शकते. त्याच्या गुणधर्मामुळे ओट्स शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देते. ओटस् हे पचनासाठीही उत्तम असे मानले जाते. त्याचबरोबर ओट्सच्या सेवनाने व्यक्तीचे वजनही नियंत्रणात राहत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

अशा प्रकारे ओट्सचे सेवन करा

ओटस् या पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी त्याची रोटी बनवता येते, त्या प्रकारे ती खाऊ शकता. हे खाताना तुम्हाला रोजच्या पेक्षा रोटी वेगळी वाटते, परंतु आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.

ओटस् पासून काय बनवाल

ओटसपासून रोटी बनवण्यासाठी एक वाटी ओट्स, एक वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी कांदा, एक चमचा चिरलेली कोथिंबीर, २ चमचे मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी आणि तेलाचा वापर करा. आता सर्व साहित्य गव्हाच्या पिठात मिसळा आणि पीठ चांगले मळून घ्या. पिठात तेलाचा वापर केला तर ते चिकटणार नाही. हे पीठ 10 मिनिटे बाजूला ठेवल्यानंतर त्यापासून तुम्ही रोटी बनवू शकता.

संबंधित बातम्या 

पन्नाशी ओलांडल्यानंतरही मिलिंद सोमणसारखं फिट राहायचंय? तर वाचा त्याने दिलेला हा लाखमोलाचा सल्ला

Urine Infection | महिलांनाच जास्त युरिन इन्फेक्शन का होते? ही घ्या कारणं अन्‌ उपाय

Water | जास्त पाणी पिणेही आरोग्यासाठी घातक, जाणून घ्या किती असावे प्रमाण

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.