ई..! घर आहे की किटाणूंचा महाल? घरातील ‘या’ 4 गोष्टींवर असतात सर्वात जास्त किटाणू, तुमच्याकडेही आहेत का ‘त्या’ वस्तू ? आत्ताच करा सफाई

घराची साफसफाई करताना अनेकदा लोकं त्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायला विसरतात, ज्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण या गोष्टींमुळे आजार निर्माण होतात.

ई..! घर आहे की किटाणूंचा महाल? घरातील 'या' 4 गोष्टींवर असतात सर्वात जास्त किटाणू, तुमच्याकडेही आहेत का 'त्या' वस्तू ? आत्ताच करा सफाई
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Mar 28, 2023 | 7:45 AM

नवी दिल्ली : निरोगी राहण्यासाठी, फक्त योग्य आहार (healthy food) आणि हेल्दी जीवनशैलीच आवश्यक नाही, तर त्यासोबत घराची योग्य स्वच्छता देखील आवश्यक आहे. अनेकांना रोज घर साफ (clean) करण्याची सवय असते. तर काही लोक दोन दिवसांच्या अंतराने तर काही जण आठवडाभरानंतर घराची साफसफाई करतात. घराची स्वच्छता (house clean) करताना अनेकदा लोक त्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायला विसरतात, ज्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण या गोष्टींमुळे आजार निर्माण होऊ शकतात.

ओव्हन, कॉफी मेकर, भांडी घासण्याचा स्पंज अशा काही वस्तू आहेत जेथे घाण व जंतू, बुरशी, जीवाणू हे सर्वात जास्त प्रमाणात जमा होतात. अशा काही गोष्टी आहेत ज्यांच्या सफाईकडे नीट लक्ष दिले जात नाही, त्या वस्तू कोणत्या हे जाणून घेऊया.

1) कॉफी मेकर

हे सुद्धा वाचा

अमेरिकेच्या ऑर्गनायझेशन फॉर पब्लिक हेल्थ अँड सेफ्टी (NSF) च्या संशोधनानुसार, कॉफी मेकर हे स्वयंपाकघरातील सर्वात जास्त जीवाणूंनी भरलेल्या वस्तूंपैकी एक आहे. या संशोधनादरम्यान संशोधकांना कॉफी मेकरमध्ये 67 प्रकारचे जंतू आढळले, म्हणजेच जर तुम्ही कॉफी मेकरची वेळोवेळी साफसफाई केली नाही तर हे बॅक्टेरिया तुमच्या शरीरात जाऊन अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतात. यामुळे कॉफी मेकर हा तीन महिन्यांतून एकदा तरी नीट साफ करणे आवश्यक आहे.

2) गादी

मॅट्रेस अर्थात गादी स्वच्छ करणे देखील आवश्यक आहे. कारण मानवी शरीरात दररोज सुमारे 1.5 ग्रॅम मृत त्वचा तयार होते, जी सहसा गादीला चिकटलेली असते. 2018 मध्ये रॉयल सोसायटी ओपन सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, माकडांच्या प्रजातींपेक्षा मानवाने गादी 30 टक्के अधिक घाण केली आहे. त्वचेच्या मृत पेशी, घाम आणि धूळ गादीमध्ये साठून राहते. यामुळे त्यांच्यामध्ये जीवाणू आणि माइट्स वाढण्याचा धोका आहे. गादी धुणे सोपे नसले तरी आपण ती सूर्यप्रकाशात खडखडीत वाळवू शकता.

3) रिसायकल होणारी शॉपिंग बॅग

आजकाल अनेक लोकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात कमी केला आहे. त्याऐवजी, ते पुन्हा वापर करू शकतील अशा पिशव्या वापरत आहेत. मायक्रोबायोलॉजिस्टच्या म्हणण्यानुसार, या पिशव्यांमध्ये एका अंडरवियरपेक्षा ई. कोलाय सारखे अनेक बॅक्टेरिया असतात. जर तुम्ही त्याच रिसायकल केलेल्या पिशवीचा वापर मांस आणि भाज्या आणण्यासाठी केला तर तुम्हाला साल्मोनेला नावाच्या बॅक्टेरियाचा संसर्ग सहज होऊ शकतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की रिसायकल केलेल्या पिशव्या आठवड्यातून एकदा तरी धुवाव्यात.

4) भांडी घासायचा स्पंज

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तुमचा डिशवॉशिंग स्पंज देखील धोकादायक बॅक्टेरिया आणि जंतूंचे घर आहे. सिंकच्या तुलनेत डिशवॉशिंग स्पंजमध्ये शेकडो जंतू आणि बॅक्टेरिया असतात, असे जर्मनीच्या फर्टवाँगेन विद्यापीठाच्या संशोधनात म्हटले आहे. या अभ्यासात डिशवॉशिंग स्पंजमध्ये 362 प्रकारचे बॅक्टेरिया असल्याचे समोर आले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हे जंतूपासून मुक्त होण्यासाठी डिशवॉशिंग स्पंज आठवड्यातून एकदा तरी क्लोरीन किंवा ब्लीचने धुवावेत.

भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....