Health News : भारतात 4 पैकी फक्त एकालाच माहितीय ब्रेन स्ट्रोकचा धोका! नेमका का येतो ब्रेन स्ट्रोक?

दरवर्षी 18 लाखापेक्षा जास्त भारतीयांना ब्रेन स्ट्रोकला सामोर जावे लागते. मात्र मुळात ब्रेन स्ट्रोक म्हणजे काय, त्याची लक्षणे कोणती?

Health News : भारतात 4 पैकी फक्त एकालाच माहितीय ब्रेन स्ट्रोकचा धोका! नेमका का येतो ब्रेन स्ट्रोक?
ब्रेन स्ट्रोकचा धोका...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 9:52 AM

आपल्या जीवावर बेतू शकणाऱ्या ब्रेन स्ट्रोक किंवा ब्रेन ॲटॅक सारख्या आजाराबद्दल लोकांमध्ये पुरेशी माहिती नाही. भारतात दरवर्षी 18 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना ब्रेन स्ट्रोकचा (Brain stroke / Brain Attack) त्रास सहन करावा लागतो. मात्र हा जीवघेणा आजार (ब्रेन स्ट्रोक) नेमका आहे काय, त्याची लक्षणे कोणती, याबद्दल लोकांना पुरेशी माहितीच नाही. त्यापासून भारतीय जनता अनभिज्ञच (Indian people are unaware of brain attack) आहे. दर 4 नागरिकांपैकी अवघ्या एका व्यक्तीलाच ब्रेन स्टोकची लक्षणे, त्याामुळे होणारा त्रास याची जाणीव आहे, अशी धक्कादायक माहिती राष्ट्रीय सर्वेक्षणातून समोर आली आहे. दरवर्षी 22 जुलै रोजी ‘वर्ल्ड ब्रेन डे’ (World Brain Day) साजरा करण्यात येतो. त्या पार्श्वभूमीवर 12 शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले होते. अवघ्या 22 टक्के लोकांना या आजाराची तीव्रता, त्याची लक्षणे याबद्दल माहिती होती, असे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

ब्रेन स्ट्रोक म्हणजे काय?

जेव्हा आपल्या मेंदूला होणारा रक्तपुरवठा कमी होतो किंवा खंडित होतो, तेव्हा मेंदूच्या पेशींना ऑक्सीजन आणि पोषक द्रव्ये मिळणे कठीण होते. त्यावेळी स्ट्रोक होतो. ही एक वैद्यकीय इमर्जन्सी असते, ज्यावर तातडीने उपचार करणे अत्यंत आवश्यक असते. त्वरित उपचार केल्यास स्ट्रोकमुळे होणारे नुकसान कमी होते. वेळेवर उपचार झाले तर स्ट्रोकमुळे होऊ शकणारे अपंगत्व रोखण्यासही मदत होऊ शकते.

परळ येथील केईएम रुग्णालयातील न्युरोसर्जरी विभागातील , प्रोफेसर, डॉ. नितीन डांगे यांनी या मुद्यावर प्रकाश टाकला. ‘ब्रेन स्ट्रोक हा हृदयाशी नव्हे तर मेंदूशी संबंधित आजार आहे, याचीच अनेकांना माहिती नाही. भारतात या आजाराबद्दल पुरेशी जनजागृती नाही’, असेही त्यांनी नमूद केले. ‘ (शरीराच्या) एका बाजूला वीकनेस जाणवणे, हे स्ट्रोकचे एक लक्षण असू शकते आणि (स्ट्रोक आल्यास) तातडीने वैद्यकीय उपचार मिळणे अतिशय आवश्यक असते, ही इमर्जन्सी घरी हाताळता येत नाही, हे लोकांनी समजून घेतले पाहिजे,’ असेही डॉ. डांगे यांनी सांगितले. ‘ब्रेन स्ट्रोकच्या रुग्णावर जेवढ्या लवकर उपचार होतील, तेवढा त्यांचा जीव वाचण्याची आणि रिकव्हरीची शक्यता जास्त असते’ असेही त्यांनी नमूद केले.

हे सुद्धा वाचा

दरवर्षी 22 जुलै रोजी ‘वर्ल्ड ब्रेन डे’ साजरा करण्यात येतो. त्याच पार्श्वभूमीवर बोहरिंगर इंगेलहेम या फार्मा कंपनीने 12 शहरांमध्ये ब्रेन स्ट्रोकबद्दल लोकांना किती माहिती आहे, याचे सर्वेक्षण केले. अवघ्या 22 टक्के लोकांना ब्रेन स्ट्रोकचा धोका, त्याची लक्षणे याबद्दल माहिती होती, असे त्यात दिसून आले. मुंबई आणि कोलकाता सारख्या मेट्रो शहरात ही परिस्थिती जरा बरी होती मात्र, छोट्या शहरांमधील नागरिकांना या आजाराबद्दल पुरेशी माहितीच नव्हती. 70 टक्के लोकांना ‘ब्रेन स्ट्रोक’ हा शब्द माहिती होता, मात्र पुणे, चंदीगड आणि लखनऊ या सारख्या शहरातील एक तृतीयांश प्रतिसादकर्त्यांनाच त्याबद्दल माहीत होते.

परळ येथील ग्लोबल हॉस्पिटलमधील न्युरोलॉजिस्ट, डॉ. शिरीष हस्तक यांच्या सांगण्यानुसार, (ब्रेन स्ट्रोक) या आजाराबद्दल पुरेशी जनजागृती गरजेची आहे. हा आजार नेमका कशामुळ होतो, त्याची लक्षणे काय, आणि त्यावरील उपचार, याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे, ही काळाची गरज आहे . त्यामुळे अनेक लोकांचा प्राण वाचण्यास मदत होऊ शकते, असे डॉ. हस्तक यांनी नमूद केले.

स्ट्रोकवर तत्काळ उपचार करणारी, सीटी स्कॅन आणि इतर महत्वाच्या सुविधा 24 तास उपलब्ध असणारी रुग्णालये, यांचे शहरात महत्व वाढत आहे. मात्र ती (रुग्णालये) पुरेशा प्रमाणात नाहीत, त्यांची संख्या आणखी वाढणे गरजेचे आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.