Oral cancer : तुम्हाला होतोय का तोंडासंबंधी हा त्रास ? लगेच घ्या डॉक्टरांची भेट, असू शकते तोंडाच्या कॅन्सरचे लक्षण
तंबाखूचे सेवन करणाऱ्यांनी महिन्यातून एकदा नियमितपणे तोंडाच्या आरोग्याची तपासणी करावी, असे डॉक्टर सांगतात.
नवी दिल्ली – भारत ही जगाची तोंडाच्या कॅन्सरची (oral cancer) राजधानी आहे, असे म्हणू शकतो. आपल्या देशात तोंडाच्या कॅन्सरच्या रुग्णांची संख्या जगभरातील एकूण कॅन्सरच्या संख्येपेक्षा जास्त आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तंबाखूचे (Tobacco) सेवन. भारत हा तंबाखूचा सर्वात मोठा ग्राहक आणि उत्पादक देश आहे. 90% पेक्षा जास्त डोकं आणि मानेच्या कॅन्सरचे कारण आहे तंबाखूचे सेवन. तोंडाच्या कॅन्सरचा (mouth cancer) शोध सहज लावता येतो. मात्र असे असले तरी सर्वात दुःखद बाब म्हणजे तोंडाच्या कॅन्सरचे बहुतांश रुग्ण शेवटच्या टप्प्यात डॉक्टरांकडे जातात.
तंबाखूचे सेवन करणाऱ्यांनी महिन्यातून एकदा नियमितपणे तोंडाच्या आरोग्याची तपासणी करावी, असे डॉक्टर सांगतात. याची सुरुवातीची लक्षणे ओळखण्यासाठी तुमच्या तोंडांत चार बोट घातली तर ते व्यवस्थित उघडत आहे का, हे तपासा. तसे होत नसेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा. जरी ते ओळखण्याचे इतर अनेक मार्ग आहेत. तोंडाच्या कॅन्सरबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, भारतात तोंडाच्या कॅन्सरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. लक्षणांबद्दल माहिती नसल्यामुळे हे घडते. या कॅन्सरचे अनेक रुग्ण प्रगत अवस्थेत उपचारासाठी येतात. तंबाखूचे सेवन आणि तोंडाच्या आरोग्याची काळजी न घेतल्याने तोंडाचा कॅन्सर वाढतो. तरुणांमध्येही ही समस्या दिसून येत आहे.
तोंडाच्या कॅन्सरची लक्षणे
– तोंडात पांढरे फोड येणे
– लाल ठिपके दिसणे
– अल्सर किंवा रक्तस्त्राव होणे
– मान किंवां गालावर सूज येणे
तुम्हाला वरीलपैकी कोणतीही प्रारंभिक लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांना भेटावे.
प्रतिबंध
तंबाखूचे सेवन करणारी व्यक्ती ही स्वतःसाठी आणि समाजासाठीही धोकादायक असते. धूम्रपान करणाऱ्या आणि तंबाखू खाणाऱ्या लोकांमुळे होणाऱ्या पर्यावरणीय प्रदूषणाचा परिणाम तंबाखू न खाणाऱ्या व्यक्तीवरही होतो. तंबाखू सेवन हा आजार आहे. त्यावर उपचार करावे लागतात. तंबाखू बंद करण्यासाठी योग्य योजना आवश्यक आहे.
या गोष्टींची घ्या काळजी
– धूम्रपान करू नका
– कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांसाठी तुमची तोंडाची नियमितपणे तपासणी करावी.
– तुमच्या दातांच्या डॉक्टरांना नियमित भेट द्या
– तोंडात जखम झाली असेल तर ताबडतोब तपासणी करून घ्या