Health : पास्ता खात असाल तर ही बातमी वाचाच, ही एक गोष्ट समजल्यावर फुकटातही तुम्ही नाही खाणार!

तुम्हाला आवडणारा हा पास्ता कोणत्या गोष्टींपासून बनवला जातो. बहुतेक लोकांना याबाबत माहिती नसेल. तर आता आपण पास्ता कशापासून बनवला जातो आणि तो कधी खाल्ला पाहिजे किंवा पास्ता खाण्याची योग्य पद्धत कोणती आणि पास्ता खाण्याचे तोटे याबाबत जाणून घेणार आहोत.

Health : पास्ता खात असाल तर ही बातमी वाचाच, ही एक गोष्ट समजल्यावर फुकटातही तुम्ही नाही खाणार!
Follow us
| Updated on: Oct 26, 2023 | 10:23 AM

मुंबई : पास्ता खायला भरपूर लोकांना आवडतो,  पास्ताचं नाव जरी घेतलं तरी बऱ्याच लोकांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. यामध्ये मग लहान मुले असो तरुण तरुणी असो किंवा जेष्ठ लोक असो पास्ता खायचं म्हटलं की सगळे आवर्जून तयार असतात. त्यात कुठे बाहेर फिरायला गेल्यानंतर देखील लोक पास्ता अगदी चवीने खातात. पण तुम्हाला माहितीये का की, हाच चविष्ट लागणारा पास्ता तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो. होय हे खरं आहे, कारण पास्तामध्ये उच्च कार्ब आणि कॅलरीचे प्रमाण जास्त असते. जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरते.

पास्ता कसा बनतो?

पास्ता हा ड्यूरम नावाच्या गव्हापासून बनवला जातो. तर ड्यूरम हा गव्हाचा बाहेरील थर असतो तो दळून त्याच्यापासून पास्ताचे पीठ तयार केले जाते. तसेच हे तयार पीठ पाण्यात मळून त्याला पास्ताचा आकार दिला जातो. तर काही देशांमध्ये ड्यूरम गहू, अंडी आणि पाणी या तिन्ही गोष्टी मिक्स करून पास्ता तयार केला जातो.

पास्ता खाण्याची योग्य पद्धत कोणती?

पास्ता खाण्याची एक योग्य पद्धत असते तर तुम्हाला पास्ता खायला आवडत असेल तर आधी तो पास्ता पाण्यात भिजवून ठेवा. कारण पाण्यात भिजवल्यामुळे पास्तामधील असलेला जास्तीत जास्त स्टार्च काढून टाकण्यास मदत होते. त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरत नाही. तसेच आपल्या शरीराला एक हेल्दी पर्याय म्हणून तुम्ही पास्ता बनवताना त्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या टाकू शकता.

पास्ता खाल्ल्यामुळे काय नुकसान होते?

पास्ता खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला त्याचे अनेक तोटे होतात. कारण पास्तामध्ये फॅट आणि कॅलरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. याचेच आपल्या शरीरात साखरेमध्ये रुपांतर होते, त्यामुळे अनेक आजार आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात. पास्तामुळे मधुमेहाची समस्या देखील निर्माण होते.

तसेच पास्ता खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील चरबी वाढते आणि त्यामुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होते. तसेच उच्च रक्तदाबाची समस्या देखील निर्माण होते. तर ज्या महिलांना पीसीओडीची समस्या आहे अशा महिलांनी पास्ता खाणं टाळावं. कारण पास्ता त्यांच्यासाठी हानिकारक ठरतो.

मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका.
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?.
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.