या ब्लड ग्रुपवाल्यांना कोरोनाचा जादा धोका, संशोधनात झाले गुपित उघड
कॉलरा आणि मलेरियासारखे इतर विषाणू देखील विशिष्ट प्रकारच्या रक्तगटांना कसे आणि का पसंत करतात ? याबाबत देखील संशोधन होण्याची गरज आहे असे संशोधकांनी म्हटले आहे.
मुंबई : कोरोना काळाच्या सुरुवातीलाच काही जण दुसऱ्या लोकांच्या तुलनेत अधिक आजारी का पडतायत असा प्रश्न संशोधकांना पडला होता. कोरोना एखाद्या व्यक्तीलाच अधिक धोकादायक का ठरतोय ? यावर संशोधकांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. यासंदर्भात संशोधकांनी केलेल्या अभ्यासात टाईप A रक्तगटाच्या लोकांना टाईप O रक्तगटवाल्यांच्या तुलनेत कोरोनाच्या संसर्गाची अधिक जोखीम किंवा धोका असतो असे उघडकीस आले आहे.
जर्नल ब्लडमध्ये कोरोनाकाळातील नवीन संशोधन प्रकाशित झाले आहे. हार्वर्ड मेडीकल स्कूलमधील पॅथोलॉजीचे असोसिएट प्रोफेसर डॉ. सीन स्टोवेल यांच्या मते टाईप A ब्लड ग्रुपवाल्यांना (अमेरिकेच्या लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोकसंख्ये एवढ्या ) O रक्त गटाच्या तुलनेत नोव्हेल कोरोनावायरस संक्रमणाचा धोका 20 ते 30 टक्के अधिक असल्याचे उघडकीस आले होते. यात काही शंका नाही की कोरोनाचा धोका प्रत्येकाला असतो. अमेरिकन सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी जमा केलेल्या डेटा अनुसार बहुतांशी अमेरिकन नागरिकांना कोरोना झालेला होता. भले मग त्यांना या गोष्टीचा थांगपत्ता नव्हता.
कोणत्या कारणाने कोविडचा धोका अधिक
अशी अनेक कारणे आहेत जी व्यक्तीवरील कोविडचा परीणाम दर्शवितात. यात प्रत्येक व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती देखील सामील आहे. डायबेटीक, जाडेपणा आणि आरोग्याची स्थिती या आजाराकडे व्यक्तीला घेऊन जाते. जसे या आजाराने पीडीत लोक त्यांच्या संपर्कात येतील तसे ते सहज कोरोनाचे शिकार होत आहेत.
ब्लड ग्रुप देखील एक कारण
नव्या संशोधनात ब्लड ग्रुपच्या मुळे ही लोक कोरोनाचे लवकरच शिकार होऊ शकतात. जर रक्तगट A असलेला व्यक्ती आणि रक्तगट O असलेली व्यक्ती एकत्र बसली असेल आणि तेथे कोरोना पिडीत व्यक्ती खोकली तर रक्तगट A असलेला व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता अधिक आहे. तर रक्तगट O असलेली व्यक्ती लढू शकतो. एखाद्याच्या अतिसंवेदनशीलतेमध्ये रक्ताचा प्रकार कसा भूमिका बजावतो तसेच कोविड रक्तगट B किंवा AB या रक्तगटाला काय प्रतिसाद देतोय यावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे.
आजारांबाबतही सत्य समोर येऊ शकते
कॉलरा आणि मलेरियासारखे इतर विषाणू देखील विशिष्ट प्रकारच्या रक्तगटांना कसे आणि का पसंत करतात ? याबाबत देखील संशोधन होण्याची गरज आहे असे संशोधकांनी म्हटले आहे.