World Sleep Day : अपुरी झोप देते अनेक आजारांना निमंत्रण, मानसिक तणावही वाढतो

जगात दरवर्षी 18 मार्च हा दिवस वर्ल्ड स्लीप डे (World Sleep Day) म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस साजरा करण्यामागचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे लोकांना झोपेचे महत्त्व कळावे. झोपेबाबत जागृती निर्माण व्हावी आणि चुकीच्या झोपेच्या (Sleep) सवयी टाळल्या जाव्यात हा आहे.

World Sleep Day : अपुरी झोप देते अनेक आजारांना निमंत्रण, मानसिक तणावही वाढतो
अपुऱ्या झोपेमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतातImage Credit source: file
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 10:50 AM

जगात दरवर्षी 18 मार्च हा दिवस वर्ल्ड स्लीप डे (World Sleep Day) म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस साजरा करण्यामागचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे लोकांना झोपेचे महत्त्व कळावे. झोपेबाबत जागृती निर्माण व्हावी आणि चुकीच्या झोपेच्या (Sleep) सवयी टाळल्या जाव्यात हा आहे. एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, कोरोनाच्या (Corona pandemic)आजारानंतर अनेकांना झोपेच्या संबंधित विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. अपुरी झोप ज्याप्रकारे अनेक आजारांना निमंत्रण देते, त्याचप्रकारे अति झोप देखील शरीरासाठी नुकसानदायक असते. कमी प्रमाणात झोप घेतल्याने किंवा नियमितपणे अपुरी झोप होत असेल तर तुम्हाला ऑब्स्ट्रक्टिव स्लीप एपनियाची लागण होऊ शकते. हा एक असा आजार आहे, की ज्यामध्ये तुम्हाला श्वासनमार्गात अडथळा निर्माण होतो, श्वास घ्यायला त्रास होतो. त्यामुळे तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. पुरेश्या प्रमाणात झोप घेणे हाच यावरील एकमेव उपाय आहे.

इतस समस्या

झोप पूर्ण न झाल्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, त्यामध्ये अंग जड पडणे, हातपाय दुखणे, थकवा जाणवने अशा विविध समस्यांचा समावेश आहे. ज्या व्यक्तींची झोप पूर्ण होत नाही. अशा व्यक्तींना ह्रदय विकाराचा धोका अधिक असतो. तसेच एखादा व्यक्ती अधिक झोपत असेल तर त्याला देखील विविध आजारांचा सामना करावा लागू शकतो. ज्यामध्ये लठ्ठपणाचा समावेश होतो. तुम्ही जर सतत झोपत असाल तर अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही, त्यामुळे तुम्हाला लठ्ठापणाचा सामना करावा लागू शकतो. दुसरे म्हणजे अन्न व्यवस्थित न पचल्यामुळे तुम्हाला पचनाशी संबंधित इतर आजार देखील होऊ शकतात. तुमची पचनशक्ती कमी होते. त्यामुळे जादा किंवा अपुरी झोप न घेता प्रमाणातच झोप घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.

चिडचिडेपणा वाढणे

झोप पूर्ण न झाल्यास चिडचिडेपणा वाढतो. कामात लक्ष लागत नाही. दिवसभर अंगात आळस राहातो. परिणाम आपण कामावर लक्ष केंद्रीत करू शकत नाही. काम व्यवस्थित न झाल्याने चिडचिडेपणा वाढतो. अपुऱ्या झोपेचा तुमच्या डोळ्यांवर देखील ताण पडतो. त्यामुळे निरोगी आयुष्यासाठी पुरेशा प्रमाणात आणि ते देखील रात्रीच्यावेळीच झोप घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.

संबंधित बातम्या

Health care : रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडुलिंब आणि हळद एकत्र मिक्स करून खा! जाणून घ्या फायदे

कोरोनाचा संसर्ग आणि व्हायरसला रोखण्यासाठी गायीचं दूध अत्यंत उपयुक्त! नव्या संशोधनानं चकीत करणारी माहिती समोर

सावधान… तो पुन्हा येतोय…डेल्टाक्रॉनने भरली धडकी

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....