Symptoms of lung cancer: जास्त खोकल्याकडे करू नका दुर्लक्ष, असू शकते ‘या’ गंभीर आजाराचे लक्षण

फुफ्फुसाच्या कॅन्सरची सुरूवात फुफ्फुसापासून होते. सुरूवातील त्याची लक्षणे ओळखून त्यावर उपचार करणे शक्य आहे. श्वासोच्छवास करण्यास त्रास होणे, थकवा येणे, सूज, छातीत वेदना अशी लक्षणे सुरूवातीला दिसतात.

Symptoms of lung cancer: जास्त खोकल्याकडे करू नका दुर्लक्ष, असू शकते 'या' गंभीर आजाराचे लक्षण
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Jan 10, 2023 | 10:05 AM

नवी दिल्ली – फुफ्फुसं (lungs) हे आपल्या छातीतील असे दोन अवयव आहेत, जी आपण श्वास घेतल्यावर ऑक्सिजन आत घेतात. आणि श्वास सोडल्यावर कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकतात. अनेक वेळा फुफ्फुसामध्ये कॅन्सरसारखा (lung cancer) घातक आजार होतो. फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या बहुतेक प्रकरणांमध्ये, तो पसरत नाही तोपर्यंत या आजाराची लक्षणे दिसत नाहीत. पण काही केसेसमध्ये त्याची लक्षणे (symptoms) अगदी सुरुवातीला दिसून येतात. ही लक्षणे लक्षात आल्यानंतर ताबडतोब डॉक्टरांकडे गेल्यास त्याचे प्राथमिक अवस्थेत निदान होऊ शकते आणि त्यावर उपचार करणेही शक्य असते. सतत येणारा खोकला हे फुफ्फुसाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते. त्याच्या इतर 5 लक्षणांबद्दल जाणून घ्या.

काय आहेत फुफ्फुसाच्या कॅन्सरची लक्षणे ?

धुम्रपान हे फुफ्फुसाच्या कॅन्सरचे प्रमुख कारण मानले जाते. मात्र, धूम्रपान न करणाऱ्या लोकांनाही हा कॅन्सर होऊ शकतो. फुफ्फुसाच्या कॅन्सरचे नेमके कारणे माहित नाहीत. सतत येणाऱ्या खोकल्याशिवाय, त्याची काही इतर लक्षणेही आहेत, ती खालीलप्रमाणे :

हे सुद्धा वाचा

श्वास घेण्यास त्रास होणे – जर तुम्हाला सतत खोकला येत असेल आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ते फुफ्फुसाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते. मात्र, हे इतर काही समस्यांचे लक्षण देखील असू शकते. म्हणूनच त्याचे योग्य निदान करण्यासाठी डॉक्टरांशी संपर्क साधून आवश्यक त्या चाचण्या करून घ्याव्यात.

वजन कमी होणे – तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत नसाल, तरीही जर तुमचे वजन कमी होत असेल तर हेही फुफ्फुसाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते.

हाडांमध्ये वेदना होणे – हाडांमध्ये खूप वेदना होणे आणि अत्याधिक थकवा येणे हेही फुफ्फुसाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते.

सूज – आपला चेहरा, मान आणि छातीच्य वरच्या भागात सूज येणे हेही फुफ्फुसाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत जराही वेळ न घालवता त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी किंवा डॉक्टरांशी संपर्क साधावा. वेळेवर निदान झाल्यास या कॅन्सरवर उपचार करणे शक्य आहे.

(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.