जेवल्या जेवल्या झोपू नका, नाही तर… काय घडणार?
जेवणानंतर थोडा वेळ चालणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे पचन सुधारते, वजन नियंत्रित ठेवते आणि चांगली झोप येण्यास मदत होते. नियमित चालण्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो आणि एकूणच शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. दररोज किमान 10 मिनिटे चालणे हे तुमच्या आरोग्यासाठी एक उत्तम सवय ठरू शकते.
अनेकदा लोक जेवणानंतर बसून राहणं किंवा झोपणं पसंत करतात. त्यामुळे अनेक आजार निर्माण होतात. जेवल्या जेवल्या झोपल्याने किंवा बसून राहिल्याने अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. जे लोक रात्री जेवल्यानंतर तात्काळ झोपतात त्यांचं वजन वाढतं. त्यामुळे हेवीनेस ब्लोटिंग सारख्या समस्या निर्माण होतात. व्यक्तीच्या लाइफस्टाइलमध्ये थोडे थोडे बदल केल्याने अनेक फायदे होतात. जेवल्यानंतर फिरायला जाण्याची सवय लावून घ्या. तुमच्या सवयीचा हा भाग बनवा. भलेही काही पावलं चालला तरी चालेल. पण जेवल्यानंतर चाला. त्यामुळे वजन मेंटेन राहील. अन्न पचन चांगलं राहील. इतर आजारांपासून तुम्ही दूर राहाल.
रात्री जेवल्यावर चालण्याचे फायदे
रात्री जेवल्यावर चालण्याची सवय पचन प्रक्रियेला वेग देते आणि पचनतंत्र सक्रिय करते. त्यामुळे अन्न पचन योग्य प्रकारे होण्यास मदत होते. जेवणानंतर नियमितपणे चालल्याने पोट फुगणे, एसिडिटी आणि छातीतील जळजळ कमी होते. यामुळे कब्जाचा त्रासही कमी होतो, कारण हे आतड्यांच्या कार्यक्षमतेला उत्तेजन देते आणि मल त्याग करणे सोपे करते.
चांगली झोप लागते
आधुनिक जीवनशैलीमुळे लोक कितीही वेळ उशिरा झोपायला जातात, तरीही त्यांना पुरेशी शांत झोप मिळत नाही. जर आपले पचनतंत्र चांगले असेल, तर आपल्याला टेन्शन आणि घबराट जाणवत नाही. त्यामुळे झोप चांगली लागते. जेवणानंतर चालल्यामुळे शारीरिक आणि मानसिक फिटनेस सुधारते, ज्यामुळे चांगली झोप मिळवायला मदत होईल. यामुळे, तुम्ही झोपायला जाताच लगेच झोप लागेल.
वजन कमी होते
वॉकिंगमुळे कॅलरी बर्न होणे आणि वजन कमी होणे याबाबत आपण नेहमीच ऐकले असेल. हे खरे आहे, आणि म्हणूनच रात्री जेवणानंतर चालणे वजन कमी करण्यात मदत करू शकते. याशिवाय, नियमित चालण्यामुळे शरीरातील मेटाबॉलिज्म वाढते, ज्यामुळे आपले शरीर अधिक कॅलरी जळण्यास मदत होते.
हृदयाचे आरोग्य
चालण्यामुळे हृदयाशी संबंधित विविध समस्यांचा धोका कमी होऊ शकतो. उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत होते आणि खराब कोलेस्ट्रॉलच्या पातळीला नियंत्रणात ठेवते. हृदयाला बळकट बनवण्यास मदत होते. म्हणूनच, रात्री जेवणानंतर चालणे आपल्या दिनचर्येत समाविष्ट करणे अत्यंत फायदेशीर आहे.
किती वेळ चालावे?
जेवणानंतर सुमारे 10 मिनिटे चालल्याने पचनाच्या समस्यांपासून दूर राहता येईल आणि विविध इतर फायदे मिळतील. दररोज 10 मिनिटे चालून तुम्ही तुमच्या 30 मिनिटांच्या शारीरिक क्रियाकलापांचा उद्दिष्ट पूर्ण करू शकता. परंतु, रात्री जेवण केल्यावर 30 मिनिटांनी चालणे सुरू करा आणि फार जास्त गतीने किंवा कमी वेगाने न चालता, सामान्य गतीने 20 ते 30 मिनिटे चालणे तुमच्या आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर ठरू शकते.