Pregnancy Care : गरोदरपणातील टेन्शन टाळायचे असेल तर आजच सोडा या सवयी
गर्भवती महिलेने स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे कारण गर्भावस्थेत थोडसाही निष्काळजीपणा हा आई आणि पोटातील बाळाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. अशा परिस्थितीत काही सवयी बदलणे अत्यंत गरजेचे आहे.
नवी दिल्ली – गर्भधारणा (Pregnancy) हा काही आजार नाही ज्यामध्ये आपल्याला प्रत्येक क्षणी एखाद्या व्यक्तीला आपल्या जवळ ठेवणे आवश्यक ठरते. थोडी काळजी आणि सावधगिरी बाळगून गरोदर स्त्री स्वत:ची नीट काळजी घेऊ शकते. प्रत्येक स्त्रीला स्वतःसाठी सुरक्षित आणि निरोगी गर्भधारणेची इच्छा असते. पण काहीवेळा माहितीच्या अभावामुळे, तसेच काही सवयींमुळे महिला स्वत:साठी अडचणी निर्माण करते. गर्भधारणा हा आईच्या आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांसाठी जीवन बदलणारा एक महत्त्वाचा अनुभव असतो. गर्भवती महिलेने स्वतःची काळजी (proper care) घेणे आवश्यक आहे कारण गर्भावस्थेत थोडसाही निष्काळजीपणा हा आई आणि पोटातील बाळाच्या आरोग्यासाठी हानिकारक (harmful) ठरू शकतो
गर्भधारणा झाल्याचे कशताच डॉक्टरांची नियमितपणे भेट घेत रहावी, ज्यामुळे कोणतीही गुंतागुंत होणार नाही. डॉक्टरांचा सल्ला घेणं तर चांगलं असतंच पण गरोदरपणाच्या पहिल्या आठवड्यापासून शेवटच्या टप्प्यापर्यंत काही उपाय केले पाहिजेत, ज्यामुळे कोणत्याही प्रकारची गुंतागुंत होण्यापासून रोखता येऊ शकते.
गरोदरपणातील गुंतागुंत टाळण्यासाठी काही उपाय –
1) कॅफीनचे सेवन
गर्भवती महिलांनी सक्रियपणे डिकॅफीनयुक्त किंवा कॅफीन-मुक्त उत्पादने पिण्यास सुरूवात केली पाहिजे. कारण कॅफीनच्या जास्त सेवनाने गर्भपात होण्याचा धोका असतो.
2) आहार
गरोदरपणात संतुलित सकस आहार घेणे, हे आई आणि बाळ दोघांसाठी आवश्यक आहे. गरोदर स्त्रीने गर्भधारणेदरम्यान कच्चे आणि कमी शिजलेले मांस आणि मासे यांसारखे काही पदार्थ टाळले पाहिजेत. तसेच प्रक्रिया केलेले मांस, पाश्चर न केलेले दूध, चीज, कच्ची अंडी आणि कच्च्या अंड्याचे पदार्थ तसेच साखरेवर आधारित उत्पादने सेवन करणे टाळा. जास्त ग्लुकोजमुळे मधुमेह होऊ शकतो. पोषक तत्वांनी समृद्ध असलेला निरोगी आहार, विशेषत: लोह, फॉलिक ॲसिड आणि कॅल्शिअम, हे पोटातील बाळाच्या वाढीस आणि विकासास प्रोत्साहन देतो. आहारामध्ये फळं, भाज्या, संपूर्ण धान्य ब्रेड आणि कमी दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश असावा.
3)डस्टबिन साफ करणे टाळा
हे विशेषतः त्या माता आणि कुटुंबांना लागू होते ज्यांच्याकडे मांजर पाळली आहे. वैज्ञानिकदृष्ट्या टॉक्सोप्लाझ्मा गोंडी नावाचा एक परजीवी मांजरीच्या विष्ठेमध्ये किंवा कचऱ्यामध्ये आढळतो ज्यामुळे टॉक्सोप्लाज्मोसिस होतो. टॉक्सोप्लाझोसिसच्या संपर्कात असताना गर्भवती महिलेला कोणतीही लक्षणे नसू शकतात, पण न जन्मलेल्या बाळाच्या संपर्कात आल्यास मूदतीपूर्वी प्रसूती होणे, मेंदू आणि डोळ्यांचे गंभीर नुकसान किंवा अंधत्व यासारखे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात.
4) इलेक्ट्रिक ब्लँकेट वापरणे टाळा
गरोदरपणाच्या नऊ महिन्यांत, इलेक्ट्रिक ब्लँकेट वापरणे टाळण्याचा सल्ला दिला जातो कारण त्यातून कमी पातळीचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड उत्सर्जित होते, जे गर्भाशयातील बाळासाठी हानिकारक असते.
5) मद्यपान
अल्कोहोलच्या सेवनामुळे गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासात अडथळा येतो. गर्भधारणेदरम्यान महिलेने काय खावे आणि काय खाऊ नये हे जाणून घेणे खूप महत्वाचे ठरते. कारण आई जे काही पदार्थ सेवन करते, त्यातील काही टक्के पदार्थ वाढत्या गर्भाद्वारे देखील सेवन केले जातात. गर्भधारणेदरम्यान मद्यपान केल्याने गर्भपात होण्याचा धोका वाढू शकतो,
6) निकोटीनचे सेवन
गर्भधारणेच्या अवस्थेत कोणते पदार्थ खावेत, याकडे आईने लक्ष दिले पाहिजे. सिगारेटमध्ये निकोटीन आणि कार्बन मोनोऑक्साइड असते, ज्यामुळे अकाली जन्म, कमी वजन, दमा आणि मृत्यूचा धोका वाढू शकतो. गर्भधारणेतील गुंतागुंत टाळण्यासाठी धूम्रपान देखील टाळले पाहिजे.