Health : डाग, अंगावरील खाज गेल्यावरही परत का येते? जाणून घ्या कारण

सगळ्यात आधी त्वचेशी संबंधित समस्या म्हणजेच खाज सुटणे किंवा त्वचा लाल होणे हे नेमके कशामुळे झाले आहे हे शोधणे गरजेचे असते. कारण बुरशीजन्य आजारांशी संबंधित अनेक आजार असतात.

Health  : डाग, अंगावरील खाज गेल्यावरही परत का येते? जाणून घ्या कारण
skin care
Follow us
| Updated on: Jul 15, 2023 | 10:27 PM

मुंबई : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. पावसाळ्यामध्ये सर्दी, खोकला, ताप अशा अनेक आजारांचा सामना करावा लागतो. पण या आजारांसोबतच बहुतेक जणांना त्वचेशी संबंधित समस्यांचा देखील सामना करावा लागतो. मग त्वचेला खाज सुटणे, त्वचा लालसर होणे अशा समस्या बहुतेक लोकांना त्रास देतात. कधीकधी तर यावर औषध घेऊनसुद्धा ही समस्या कमी होत नाही.

बहुतेक लोक त्वचेशी संबंधित समस्या निर्माण झाल्यानंतर घरगुती उपाय करतात. मग, घरगुतीच एखादी क्रीम लावणे असे ते वेगवेगळे उपाय करतात. पण यामुळे असे संसर्ग पूर्णपणे बरे होईल असं होत नाही. त्यावर योग्य उपचार करणे गरजेचे असतं. त्यासाठी सगळ्यात आधी त्वचेशी संबंधित समस्या म्हणजेच खाज सुटणे किंवा त्वचा लाल होणे हे नेमके कशामुळे झाले आहे हे शोधणे गरजेचे असते. कारण बुरशीजन्य आजारांशी संबंधित अनेक आजार असतात.

ज्यावेळी त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होतात त्यावेळी खाज सुटणे, लाल डाग दिसणे अशा प्रकारची लक्ष निर्माण होतात. तसेच अशा समस्या निर्माण झाल्याने त्याच्यावर त्वरित उपचार होणे फार महत्त्वाचे असते, नाहीतर ते वेगाने पसरू लागते. तसेच या समस्यांचा शरीराची इतर भागांवर देखील परिणाम होत असतो. तर त्वचेशी संबंधित या समस्या टाळायच्या असतील तर स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यावी लागते.

यासाठी प्रत्येकाने आपले शरीर स्वच्छ ठेवले पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे इतरांनी वापरलेले टॉवेल, कंगवा किंवा ब्रशचा वापर करू नये. स्वतःच्या वस्तू वेगवेगळ्या ठेवाव्यात. दुसऱ्या कोणीही वापरलेल्या वस्तू आपण वापरू नये. तसेच कुठेही बाहेर गर्दीच्या ठिकाणी तुम्ही गेला तर तिथे तुमच्या त्वचेला कोणत्याही अस्वच्छ गोष्टींचा स्पर्श होणार नाही याची जास्तीत जास्त काळजी घ्या. तसेच त्वचेच्या संबंधित समस्या निर्माण झाल्यानंतर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्यांनी दिलेली औषधे वेळेवर घ्यावी. जेणेकरून या समस्या वेळीच कमी होतील.

बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?.
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?.
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल.
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?.
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!.
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...