लाल मुंग्यांची चटणी कोरोनावर प्रभावी? आयुष मंत्रालय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
आता एक नवीनच औषध कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचे म्हटले जात आहे. हे औषध आहे ‘लाल मुंग्यांची चटणी’.
मुंबई : जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. सध्या कोरोनावर प्रतिबंध करणाऱ्या लसीचे संशोधन जगभरात सुरु आहे. भारतातही कोरोना लसीचे संशोधन पूर्ण झाले असून, लवकरच ही लस नागरिकांना दिली जाणार आहे. मात्र, आता एक नवीनच औषध कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचे म्हटले जात आहे. हे औषध आहे ‘लाल मुंग्यांची चटणी’. होय, मुंग्यांची चटणी… हा दावा कितपत खरा आहे, हे तपासण्यासाठी आयुष मंत्रालयाने संशोधन करावं, असा आदेश हायकोर्टाने दिला आहे (Red Ant chutney effective on Corona high court orders ayush ministry to research).
त्यामुळे आयुष मंत्रालय लवकरच कोरोना विषाणूचं औषध म्हणून या लाल मुंग्यांच्या वापराला मान्यता देण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गुरुवारी ओडीसा उच्च न्यायालयाने अशा प्रकारच्या औषध निर्मितीवर निर्णय घेण्यासाठी आयुष मंत्रालयाला तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे. ओडिसा आणि छत्तीसगड राज्यातील आदिवासी भागात औषध म्हणून ही लाल मुंग्यांची चटणी खाल्ली जाते.
तीन महिन्यांत निर्णय घ्या…
एका प्रसिद्ध इंग्रजी वर्तमानपत्राच्या बातमीनुसार, ओडीसा उच्च न्यायालयानं आयुष मंत्रालय आणि काउंसिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चच्या संचालकांना याबाबत तातडीने निर्णय घेण्यास सांगितलं आहे. न्यायालयानं कोव्हिड-19च्या उपचारात लाल मुंग्यांच्या चटणी वापरण्याच्या प्रस्तावार तीन महिन्यांच्या आत निर्णय घेण्यास सांगितला आहे. विशेष बाब म्हणजे, देशातील बर्याच राज्यांतील आदिवासी भागांत ताप, सर्दी, थंडी, श्वास घेण्यास त्रास, थकवा आणि इतर आजारांवर उपचार करण्यासाठी लाल मुंग्यांच्या चटणीचा वापर केला जातो.
कशी बनवतात लाल मुंग्यांची चटणी
या चटणीमध्ये लाल मुंग्या आणि हिरव्या मिरच्या असतात. या मिश्रणाला व्यवस्थित ठेचून ही चटणी बनवली जाते. आदिवासी भागांत ताप, सर्दी, थंडी, श्वास घेण्यास त्रास, थकवा आणि इतर आजारांवर उपचार करण्यासाठी लाल मुंग्यांच्या चटणीचा वापर केला जातो (Red Ant chutney effective on Corona high court orders ayush ministry to research).
या चटणी संदर्भात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत लाल मुंग्यांच्या चटणीच्या परिणामाबाबत कोठेही दखल घेतली जात नसल्याने न्यायालयाने हस्तक्षेप करावा, यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका बारीपाडा येथील इंजिनीअर नायधर पाढीयाल यांनी दाखल केली होती. यापूर्वी जूनमध्ये पाढीयाल यांनी विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी चटणी वापरण्याविषयी भाष्य केलं होतं. यानंतर त्यांनी यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली.
लाल मुंग्यांच्या चटणीत औषधी गुणधर्म
या चटणीसंदर्भात याचिका दाखल करण्याऱ्या इंजिनीअर नायधर पाढीयाल यांच्या मते, चटणीमध्ये फॉर्मिक अॅसिड, प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 12, जिंक आणि लोह असते. ही मुलद्रव्ये आपली रोगप्रतिकारक शक्तीत सुधारणा करतात.
(Red Ant chutney effective on Corona high court orders ayush ministry to research)
हेही वाचा :
लस प्रभावी आहे हे कसं समजतं? भारतासाठी कोणती लस चांगली?https://t.co/kSoLCKlAKH #Corona #CoronaVaccine #IndiaCoronaUpdate
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 8, 2020