तुम्हालाही आहे का युरिक ॲसिडचा त्रास ? चुकूनही करू नका या पदार्थांचे सेवन, नाहीतर व्हाल रुग्णालयात दाखल

3 Foods That Raise Uric Acid : युरिक ॲसिडच्या समस्येशी झुंजत असलेल्या लोकांना खाण्यापिण्याबाबत खूप काळजी घेणे आवश्यक आहे. यूरिक ॲसिडचे प्रमाण जास्त वाढल्याने शरीरात अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. काही खाद्यपदार्थ आणि पेयांचे सेवन केल्याने देखील यूरिक ॲसिडची समस्या उद्भवू शकते

तुम्हालाही आहे का युरिक ॲसिडचा त्रास ? चुकूनही करू नका या पदार्थांचे सेवन, नाहीतर व्हाल रुग्णालयात दाखल
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 7:35 AM

नवी दिल्ली : युरिक ॲसिड हा आपल्या शरीरात तयार होणारा एक टाकाऊ पदार्थ आहे, जो यकृतामध्ये तयार होतो आणि किडनीद्वारे लघवीतून बाहेर पडतो. जोपर्यंत युरिक ॲसिडचे ( Uric Acid ) प्रमाण सामान्य असते तोपर्यंत ते शरीरासाठी फायदेशीर असते. जेव्हा त्याचे प्रमाण सामान्यपेक्षा जास्त होते, तेव्हा ते समस्या निर्माण करू लागते. आजकाल सर्व वयोगटातील लोकांना हाय युरिक ॲसिडची (high Uric Acid) समस्या भेडसावत आहे. अस्वस्थ जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे (unhealthy eating habits) युरिक ॲसिडची समस्या वाढत आहे. जर युरिक ॲसिड मर्यादेपेक्षा जास्त असेल तर ते गाउट आणि किडनी निकामी होण्यासारख्या परिस्थितीस कारणीभूत ठरू शकते. या समस्येकडे दुर्लक्ष करू नये.

काही खाद्यपदार्थ आणि पेयांचे सेवन केल्याने देखील युरिक ॲसिडची समस्या उद्भवू शकते. जास्त युरिक ॲसिड असलेल्या रुग्णांनी या पदार्थांपासून पूर्णपणे दूर राहावे. वेबएमडीच्या रिपोर्टनुसार, या पदार्थांचे सेवन केल्याने युरिक ॲसिडची पातळी वेगाने वाढते आणि त्यामुळे गाउटची समस्या उद्भवू शकते. जर यूरिक ॲसिडचे प्रमाण जास्त काळ राहिल्यास किडनी निकामी होऊ शकते किंवा किडनी स्टोनची समस्या देखील होऊ शकते.

युरिक ॲसिडचा त्रास असेल तर कोणत्या पदार्थांपासून पूर्णपणे दूर रहावे लागेल, हे समजून घेणे प्रत्येकासाठी खूप महत्वाचे आहे. या गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही अनेक समस्या टाळू शकता.

हे सुद्धा वाचा

युरिक ॲसिडच्या रुग्णांनी या 3 पदार्थांपासून रहावे दूर

– लाल मांस आणि सीफूड युरिक ॲसिडसाठी अत्यंत धोकादायक मानले जाते. या पदार्थांमध्ये प्युरीनचे प्रमाण जास्त असते. जेव्हा शरीरात प्युरीनचे विघटन होते, तेव्हा युरिक ॲसिडचे प्रमाण वाढते. अशा परिस्थितीत जास्त प्युरीन असलेले पदार्थ खाणे टाळावे. त्याऐवजी कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ खाऊ शकतात.

– सोडा, कोल्ड्रिंक्स आणि फ्लेवर्ड ज्यूसचे सेवन केल्याने देखील यरिक ॲसिड झपाट्याने वाढू शकते. या गोष्टींमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे गाउटचा धोका वाढतो. या गोष्टींऐवजी युरिक ॲसिडच्या रुग्णांनी जास्त पाणी प्यावे. युरिक ॲसिड नियंत्रित ठेवण्यासाठी पाणी पिण्याने खूप मदत होते.

– युरिक ॲसिडच्या रुग्णांसाठी अल्कोहोलचे सेवन करणे अत्यंत धोकादायक मानले जाऊ शकते. विशेषतः बिअर प्यायल्याने सर्वाधिक नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत मद्यपान न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अल्कोहोलचे सेवन केल्याने शरीराला अनेक प्रकारची हानी होते आणि यकृताचे नुकसान होऊ शकते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.