मान्सूनमध्ये वाढत आहेत श्वसनाचे आजार, या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष..
Respiratory infections in monsoon : पावसाळ्याच्या ऋतूमध्ये अनेक आजार फैलावतात. श्वसनाचेही अनेक आजार होतात. अस्थमा आणि ब्रॉंकायटिसची प्रकरणे जास्त वाढलेली दिसतात.
नवी दिल्ली | 21 जुलै 2023 : मान्सूनममध्ये अनेक तऱ्हेचे इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. पोटाच्या आजारापासून ते डेंग्यू, मलेरियापर्यंत अनेक आजार लोकांना होऊ शकतात. पण पावसाळ्याच्या ऋतूमध्ये श्वसनाचे आजारही वाढताना दिसत आहेत. लोकांना अस्थमा, ब्रॉंकायटिस आणि सीओपीजी सारखे आजार होत आहेत. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, पावसाळ्यात हवेतील आर्द्रता वाढते, यामुळे अनेक बॅक्टेरिया ॲक्टिव्ह होतात, जे रेस्पिरेटरी आजारांसाठी (Respiratory infection in monsoon) कारणीभूत ठरतात.
डॉक्टर सांगतात की सध्या काळात लोकांना दम्याचा झटका येणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि फुफ्फुसात संसर्ग होणे असा त्रास होताना दिसत आहे. या समस्या अगदी वृद्ध माणसांपासून ते तरूण वयातील माणसं आणि लहान मुलांपर्यंत कोणामध्येही दिसत आहेत. अशा परिस्थितीत या ऋतूत लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. जर एखाद्याला आधीच श्वसनाचे आजार असतील तर त्यांनी विशेष काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे.
का वाढतात श्वसनाचे आजार ?
ज्येष्ठ डॉक्टर सांगतात की या ऋतूमध्ये ॲलर्जी आणि वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे हवेत अनेक तऱ्हेचे व्हायरलस आणि बॅक्टेरिया ॲक्टिव्ह होतात. हे श्वासावाटे फुप्फुसात जातात आणि रेस्पिरेटरी आजारांसाठी कारणीभूत ठरतात. ज्या लोकांना आधीपासूनच श्वसनाचा त्रास असतो त्यांचा त्रास या ऋतूमध्ये जास्त वाढतो.
अस्थमाच्या केसेस वाढतात
पावसाळ्यात अस्थमाच्या केसेसमध्ये वाढ होते, असे वरिष्ठ डॉ्कटर सांगतात. हा फुप्फुसासंदर्भातील एक धोकादायक आजार आहे. ज्यावर योग्य वेळी उपचार होणे अत्यावश्यक आहे. जर एखाद्या व्यक्तीला सतत खोकला येत असेल, छाती आखडल्यासारखी वाटत असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ही सर्व अस्थमाची लक्षणे आहेत. अशा परिस्थितीत त्वरित डॉक्टरांकडे गेले पाहिजे.
पहिल्यापासून असेल आजार तर रहा सावध
ज्यांना श्वसनाचा आजार आहे त्या रुग्णांनी या ऋतूत विशेष काळजी घेतली पाहिजे. दम्याच्या रुग्णांना त्यांची औषधे वेळेवर घ्यावीत आणि इनहेलर सदैव सोबत ठेवावे. तसेच लहान मुलांच्या आरोग्याचीही काळजी घेतली पाहिजे. त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत असेल किंवा छातीत घरघर होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण लहान मुलांना श्वसनाचा आजार झाल्यास त्याचे न्यूमोनियातही रुपांतर होऊ शकते, ते अतिशय धोकादायक आहे.
बचाव कसा कराल ?
– धूळ, घाण आणि धुरापासून दूर रहावे.
– धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या जवळ जाऊ नये
– शरीर हायड्रेटेड ठेवा, भरपूर पाणी किंवा द्रव पदार्थ पीत रहावे.
– औषधे वेळेवर घ्यावीत.
– थंड पदार्थांचे सेवन टाळावे.
– जास्त व्यायाम करू नका