शरीराच्या ‘या’ भागावर होतो परिणाम… बसल्या बसल्या पाय हलवता? लगेच सोडून द्या सवय
अनेकजण पाय अनाठायी हलवतात, पण ही केवळ अंधश्रद्धा नाही. मेडिकल सायन्स हे "रेस्टलेस लेग्स सिंड्रोम" (RLS) म्हणून ओळखते. यामुळे मेंदूवर, हृदयावर आणि संपूर्ण आरोग्यावर वाईट परिणाम होतो. आरएलएस मागे अनुवांशिकता, मधुमेह, लोह कमीपणा, किंवा झोपेचे विकार कारणीभूत असू शकतात.
तुम्ही एक निरीक्षण केलंय का कधी? काही लोक खूर्चीवर बसल्या बसल्या किंवा अंथरूणावर पडल्या पडल्या अचानक पाय हलवू लागतात. तुम्ही जेव्हा असं करत असता तेव्हा घरातील ज्येष्ठ मंडळी तुम्हाला टोकत असतात. तुम्हाला पाय हलवण्यापासून रोखत असतात. घरात झगडा होईल, किंवा लक्ष्मी येणार नाही किंवा काही तरी अशुभ घडेल असं सांगून तुम्हाला हे लोक रोखत असतात. पण मेडिकल सायन्सने पाय हलवण्याच्या प्रकाराला शास्त्रीय कारण दिलं आहे. मेडिकल सायन्स या प्रकाराला ‘रेस्टलेस लेग्स सिंड्रोम’ RLS म्हणून संबोधतो. या प्रकारामुळे शुभ आणि अशुभ होण्यापेक्षाही आरोग्यावर त्याचा खूप परिणाम होतो हे तुम्हाला माहीत आहे का? या कृतीचा थेट परिणाम तुमच्या मेंदूवर होत असतो. तो कसा? हेच आपण आज जाणून घेणार आहोत.
कारण काय?
एका संशोधनानुसार, आरएलएस (रेस्टलेस लेग्स सिंड्रोम) (Restless Legs Syndrome) चं नेमकं कारण अद्याप माहीत झालेलं नाही. काही प्रकरणात यामागे अनुवांशिकता असल्याचं सांगितलं जातं. आणि काही प्रकरणात आरएलएसचा संबंध मधुमेह, किडनी आदी समस्यांशी जोडला गेला आहे. आयरनची कमतरता, काही औषधे, गर्भावस्था, झोपेचा आजार आणि दारुची सवय ही सुद्धा या मागची कारणं असल्याचं सांगितलं जातं. पण या सवयी अनेकदा मेंदूसाठी घातक ठरू शकतात.
अस्वस्थता (Restless Legs Syndrome) :
ही एक अशी स्थिती आहे, यात पायात अस्वस्थता आणि मुंगी आल्यासारखं होतं. त्यामुळे पाय वारंवार हलवण्याची इच्छा निर्माण होते.
रक्त प्रवाह धीमा :
जर तुम्ही बराच काळ खुर्ची किंवा पलंगावर बसून तुमचे पाय हलवत असाल तर त्याखालच्या नसा दाबल्या जातात. त्यामुळे या नसातून शरीराच्या ज्या भागात रक्त पुरवठा होतो, तो फ्लो कमी होतो. त्यामुळे पाय दुखणं, पायाला सूज येणे आणि पाय सुन्न पडण्यासारखी समस्या निर्माण होते.
वात (Arthritis) आणि झोपेचा संबंध :
पाय हलवल्याने ज्वॉइंटवर दबाव येतो. त्यामुळे वात होण्याची शक्यता असते. त्याशिवाय बोस्टनच्या हार्वर्ड मेडिकल स्कूलचे प्रोफेसर आणि या शोधाचे प्रमुख डॉ. डब्ल्यू विंकमॅन यांच्या मतानुसार, या आजाराने पीडित असलेले लोक सोन्यापूर्वी सरासरी 200 ते 300 वेळा पाय हलवतात.
एकाग्रता कमी होते (Less Concentration) :
वारंवार पाय हलवल्याने त्याचा मेंदूवर थेट परिणाम होतो. त्यामुळे एकाग्रतेत कमी येते. त्यामुळे कोणतंही काम करण्यात वा शिक्षण घेण्यात अडचणी येतात.
हृदयविकाराचा धोका (Heart Attack) :
या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना लवकरच हृदयाशी संबंधित आजार होतात. सातत्याने पाय हलवल्याने हृदयाची गती कमी होते. त्यामुळे मृत्यूही ओढवू शकतो.